कॉसमॉस बीएमएम सारेगम २०१३ - श्रेयस बेडेकर (ह्यूस्टन, टेक्सास) यांच्याशी गप्पा

Submitted by अजय on 27 June, 2013 - 21:50

सर्वप्रथम आपली या कॉसमॉस बीएमएम सारेगम २०१३ अंतिम फेरीत निवड झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन
१ श्रेयस ! तुम्ही मुळचे कुठले ?
मी मुळचा साताऱ्याचा. सांगलीच्या वालचंद कॉलेजमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. मग पुण्यात दोन वर्षे नोकरी करून, पदव्युत्तर शिक्षणासाठी इकडे आलो. इथल्या Texas A&M , College station या युनिव्हर्सिटीमधून MS पूर्ण केलं.
२. तुम्हाला संगीताची गोडी / आवड कशी आणि केव्हा लागली ?
२ माझ्या आईने माझ्या खूप लहानपणीच माझी संगीतातली जाण आणि माझी त्याविषयीची विशेष आवड ओळखली. तिलाही तिचे मामा कै. पंडित वसंतराव कुलकर्णी, यांच्यामुळे संगीतात रुची होतीच; त्यामुळे माझा संगीताचा पाया भक्कम करण्याचे तिने तिच्यापरीने सर्व प्रयत्न केले. आई-वडिलांनी मला नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐकायला प्रोत्साहन दिले; त्यामुळे ‘सवाई गंधर्व’ सारखे कित्येक उत्तमोत्त्म संगीत-सोहोळे लहानपणापासूनचं मला ऐकायला मिळाले. Shreyas_bedekar_2.jpg३. संगीताचे शिक्षण तुम्ही किती वर्ष घेत आहात ? आणि कोणत्या प्रकारचे संगीत शिक्षण चालू आहे ?
माझं सुगम आणि उपशास्त्रीय संगीताच्या पहिल्या चार वर्षांचं शिक्षण सातारच्या श्री. दत्तात्रय डोईफोडे यांच्याकडे झालं. पुढे मग सांगली आणि पुण्यातील संगीतक्षेत्रातल्या उत्तमोत्तम दर्दींकडून मिळेल तसं शिकत राहिलो. बाकी चांगलं संगीत ऐकणं हा तर छंदच आहे. आणि अगदी अलीकडच्याच काळात पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांच्या शिष्या सौ. वंदना भागवत इथे टेक्सस मध्ये आल्या होत्या तेव्हा त्यांच्याकडे काही महिने शिकायची संधी मिळाली.
४. तुमच्या संगीतातली विशेष कामगिरीबद्दल काय सांगाल ?
१. १९९९ मध्ये झी टी व्ही च्या सारेगम स्पर्धेत सहभाग
२. २००६ मध्ये श्रीरंग गोडबोले यांनी डॉ . सलिल कुलकर्णी यांच्या सहकार्याने आयोजिलेल्या ' दिवाळी पहाट' ह्या संगीत रजनी त सहभाग .
३ . २००७ मध्ये संगीतातील नवरस दाखविण्यासाठी रसबरसे हा सांगीतिक कार्यक्रम झाला. त्याचे लेखन प्रवीण जोशी यांचे होते. यजमानपद विनय आपटे , मंजिरी जोशी आणि मानसी जोशी यांनी सांभाळले होते . रमाकांत परांजपे , केदार परांजपे व मिलिंद गुणे हे संगीत संयोजक होते तर गायक मी स्वत: , जितेंद्र अभ्यंकर , मधुर दातार होते . आम्ही महाराष्ट्रातील अनेक शहरातून त्याचे प्रयोग सदर केले .
४. २००८ - २०१० या काळात मी टेक्सास A & M University करिता हिंदुस्तानी 'ध्वनी' याचे कार्यक्रम केले .
५. २०१२ मध्ये ह्युस्टन च्या महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमातून (ज्यात नाट्यसंगीत हि होते) सहभाग.


५. संगीताच्या या आवडीसाठी तुमचे काय विशेष प्रयत्न असतात ?

तानपुरा व हार्मोनियम च्या साथीवर गाण्याचा रोजचा सराव. आणि आधी म्हटल्याप्रमाणे चांगले , दर्जेदार संगीत ऐकणे , ह्युस्टन येथील माझ्या संगीत शौकीन मित्रांसमवेत वीकएंड ला मनसोक्त , विविध प्रकारचे संगीत ऐकणे.
६. तुमचे आवडते गायक / गायिका आणि आवडते गाणे कोणते ? तुमचे आवडते एखादे गाणे ? कोणाचे संगीत ऐकायला तुम्हाला जास्त आवडते ?
१ . आवडते गायक - हरिहरन आणि सुरेश वाडकर
२. आवडते संगीतकार - गुलाम आली , श्रीनिवास खळे , पंडित हृदयनाथ मंगेशकर व अजय अतुल
३. आवडती गाणी - मराठी गाण्यामध्ये वर्षानुवर्षे आवडणारी बरीच गाणी आहेत. त्यामध्ये विशेष करून - दयाघना - सुरेश वाडकर , तोच चंद्रमा नभात - सुधीर फडके , देवाघरचे ध्यात कुणाला - पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे संगीत व रामदास कामत यांनी गायलेले
रवि मी - पंडित वसंतराव देशपांडे
७. आपल्या कॉसमॉस बीएमएम सारेगम २०१३ च्या अंतिम स्पर्धेसाठी कशा पद्धतीची तयारी चालू आहे ?
रोजचा रियाज आणि सराव तर चालूच आहे आणि मी जे काही सादर करू शकतो ते १००% देण्याचा माझा प्रयत्न असेल. Antoine de Saint-Exupery यांच्या “Perfection is achieved, not when there is nothing more to add, but when there is nothing left to take away.” या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे.
८ संगीता खेरीज आपले अजून काय काय छंद किवा आवड आहे ?
मला portrait photography चीही विशेष आवड आहे.
९. आपल्या कॉसमॉस बीएमएम सारेगम २०१३ च्या प्राथमिक आणि उपांत्य फेरीची तयारी तुम्ही कशी केलीत ?
प्राथमिक आणि उपांत्य फेरीसाठी तयारी करतानाचा अनुभव खूपच छान होता. विशेषतः उपांत्य फेरीच्या वेळी आम्हाला karaoke tracks वर गायचं होतं; आणि मला मी निवडलेल्या गाण्यांचे tracks मिळतच नव्हते. त्यामुळे ते तयार करण्यापासून सगळी तयारी होती, जी करताना मला गाण्यातले बारकावे लक्षात आले. Tracks recording साठी माझा मित्र अमोल गणपत्ये, याची खूप मदत झाली.
१०. आपला कौटुंबिक परिचय ?
अलीकडेच म्हणजे २०१२ मध्ये माझी मैत्रीण असलेल्या मानसी जोशी हिच्याबरोबर माझा विवाह झाला .

खालील लिंक्स वर आपण माझी काही गाणी ऐकू शकाल .
तुला पहिले मी नदीच्या किनारी - http://www.youtube.com/watch?v=O1ILkzv4Qow
त्या फुलांच्या गंध कोशी - http://www.youtube.com/watch?v=FGqYFBHG46I

कृपया इथे जाऊन मला मत द्या - http://www.bmm2013.org/culturalprograms/saregama.html
शब्दांकन - सुरेश डिके , सरिता देशपांडे (मायबोलीकर: रंगीतसंगीत). फोटो: राहुल जोशी (मायबोलीकर : वाटसरु)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रेयस, अभिनंदन आणि शुभेच्छा!
नुकताच ऑस्टीनमध्ये श्रेयस आणि सायली पानसे यांचा रोमांच हा कार्यक्रम पाहण्याचा योग आला. दयाघना आणि इतर सादर केलेली गाणी आवडली.