अहम् ब्रह्मास्मि

Submitted by अजय सावरकर on 27 June, 2013 - 02:15

गोष्ट माझी तीच पण घटना तरी घडती नव्या
कोळसा काळाच मी उगाळला आहे

घातले मी दळण नेमाने इथे माझ्या कथांचे
क्रमशः हा शब्द मज कंटाळला आहे

नायिका सार्‍याच माझ्या अधीर चुंबण्यास मज
विबासं लेखनात मम बोकाळला आहे

मीच तो ज्याची असे हर स्त्रीस लालसा
माबोकरांनी मज उगा हेटाळला आहे

लेख, कादंबरी असो वा असोत कविता
गुलमोहोर अख्खाच मी विटाळला आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए बाबा गोब्राप्रपा जरा वृत्तात लिहायचे काय घेशील
असो तुझ्यासारखे अनेक आमचा आजवर टाईम्पास करून गेले आता तू आलास..... धन्यवाद !!

त्यांच्या नावावर क्लिकून बघा.. नाव तर ओळखीचं आहे, आता हे तेच का वेगळे ते माहीत नाही. पण तेच असावेत. तेही विडंबित गझला पाडायचे.

ह्याला विडंबन का म्हणताय? एखाद्या रचनेला विडंबन म्हणायला आधी मूळ रचना अस्तित्वात असावी लागते Wink

गोष्ट माझी तीच पण घटना तरी घडती नव्या
कोळसा काळाच मी उगाळला आहे

आशय चांगला आहे. तुम्ही हझला चांगल्या लिहू शकाल.

बाकी शेरांचा संदर्भ माहित नसल्याने कळले नाहीत.

गोब्राह्मणप्रतिपालक किंवा तिरशिंगराव या दोन्ही आयड्याच. कुणाला माहीत असेल मुळ परिचय द्यावा. कळायला सोपे पडेल. लेखनशैलीवरून तर गडी रमलेला कवी किंवा गझलकार असन्याची भारी-मुसळधार शक्यता आहे. Happy