Submitted by सुप्रिया जाधव. on 25 June, 2013 - 10:38
बहुतेकवेळी...
इच्छेला मुरड,
भावनेला आवर,
कृतीला पायबंद घालत घालत
करते सादरीकरण मनाचं !
साकारत जाते जगासमोर
एक फसवी प्रतिमा
संयत, प्रगल्भ, विचारवंत..
निव्वळ बुरखेधारी !
अन मग सुरू होतो शोध..
अंतरमनाच्या घालमेलीचा
निसटलेल्या आयुष्याचा गोषवारा काढताना
चालू वर्तमानाशी नाळ तोडत
भविष्यही होत जातं धुसर
धुक्यात हरवलेल्या पायवाटेसारखं !
अन कुठल्याश्या एका अनभिज्ञ क्षणी
लख्ख प्रकाश पडतो जाणिवांचा
जिवघेण्या वेणा देवून साकारतात
दोन-चार जातिवंत ओळी
वृत्त, छंद, रस...
सा-या वर्णभेदा पलिकडल्या
अन बहाल करतात अस्सल मातृत्व !
त्या खाली स्वतःच्या नावाच शिक्कामोर्तब करताना
उचंबळून येतो थुईथुईणारा पान्हा...
पुन्हा पुन्हा !
अन मी कृतकृत्य...
मातृत्वाच्या परीपूर्णतेने !
( खरोखर, काहीकाही स्वप्न किती विलोभनिय असतात नै ! )
-सुप्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा वा
व्वा वा
मस्तच...
मस्तच...
अहाहा !! शब्द न् शब्द आवडला
अहाहा !! शब्द न् शब्द आवडला !!
खूप दिवस तुमच्या इतक्या आवडणार्या कवितेची वाट पाहत होतो
थुईथुईणारा पान्हा...<<<<<< नतमस्तक !!!!!!
क्या बात है जानेमन
क्या बात है जानेमन ....अफ़लातून !!
क्या ब्बात है ...... ही
क्या ब्बात है ...... ही कविता पुढे मागे....कुमारभारती....युवकभारती वगैरे अभ्यासक्रमात दिसणारच ..
अभिनंदन...
बेफीजी, पिहु, वैवकु, जयुदी,
बेफीजी, पिहु, वैवकु, जयुदी, डॉक.
खुप खुप मनापासून आभार !
-सुप्रिया.
वाह!! आवडली
वाह!! आवडली
वा ! छानच.
वा ! छानच.
लई आवडली.. एकदम भारी
लई आवडली.. एकदम भारी
खुप छान ! शेवट विशेष आवडला !
खुप छान ! शेवट विशेष आवडला !
फार आवडली ..फारच ताकदीचा
फार आवडली ..फारच ताकदीचा मुक्तछंद!!
सुंदरच!
सुंदरच!
फार आवडली ..फारच ताकदीचा
फार आवडली ..फारच ताकदीचा मुक्तछंद!! >>> +१०० ...
"जातिवंत" कविता ....
अप्रतिमच काल म्हणालो होतो
अप्रतिमच काल म्हणालो होतो त्याप्रमाणे!
ह्म्न ! विदिपा आपल्या
ह्म्न !
विदिपा आपल्या चर्चेनंतरच पोस्टलीय इथे
नविन प्रतिसादकांचेही आभार !
-सुप्रिया.
अरे वा, अगदी मनातलं मातृत्व .
अरे वा, अगदी मनातलं मातृत्व .
खूप सुंदर.
खूप सुंदर.
सुरेख!!!
सुरेख!!!
आवडली कविता.
आवडली कविता.
चालू वर्तमानाशी नाळ
चालू वर्तमानाशी नाळ तोडत
भविष्यही होत जातं धुसर
धुक्यात हरवलेल्या पायवाटेसारखं !
थेट ह्रदयापर्येंत पोहचणारी रचना

सूंदर
धन्यवाद मंडळी.
धन्यवाद मंडळी.
हे मातृत्व आम्हा पुरुष
हे मातृत्व आम्हा पुरुष लेखकुंनाहि मिळते खरच जीवनाची असीम कृपा . सुंदर रचना .
अगदी विक्रांत , समस्त कवींना,
अगदी विक्रांत ,
समस्त कवींना, लेखकांना, मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा !!
-सुप्रिया.
सुप्रिया, अत्यंत सुंदर!!
सुप्रिया,
अत्यंत सुंदर!! तुमचे काव्य दिवसेंदिवस खूप अर्थपूर्ण आणि प्रगल्भ होत चालले आहे; यात वाद नाही !
या विषयावरची माझी एक कविता आठवली. तिची लिंक खाली देत आहे.
http://www.maayboli.com/node/14482