हा छंद जिवाला....

Submitted by शांकली on 23 June, 2013 - 22:53

अगं आई …… चक्क अर्धा तास होऊन गेला, तू एकही शब्द बोलली नाहीयेस!"---- इति कन्यारत्न !!
"अंजू , आता पेपरमध्ये बातमी येणारे की अंजली पुरंदरे आजकाल कमी बोलत असल्याने पुरंदरे यांच्या घरात अधून मधून शांतता असते.!!" --- इति 'अहो'

हो, सध्या मला येत जाता हे असे टोमणे ऐकून घ्यावे लागताहेत. कारण मी एक नवीन गोष्ट शिकतीये आणि ती मला इतकी आवडलीये कि मी त्यात अगदी बुडून गेलेय.

मायबोलीवर अनेकजणी क्रोशाकामाचे फोटो टाकतात. ते अफलातून केलेलं क्रोशेकाम बघून मलाही ते शिकावं असं वाटू लागलं. आणि सुरु झाला शोध ते शिकवणार्‍या व्यक्तीचा!!

जयश्रीताई (अंबासकर), अवल आणि मीन्वा (मीनल हर्डीकर) यांपैकी अवलने 'शिका शिकवा' या ब्लॉग वरून ऑन लाईन शिकवणं चालू केलं आहे तिला जॉईन व्हायचं ठरवलं.

पण………मी जेव्हा अवलचं प्रोफ़ाइल मागे बघितलं होतं ते आठवून माझी तंतरली!

नाही नाही …. तसं नाही …तंतरली अशासाठी कि हि बाई इतिहासाची अभ्यासक आणि अध्यापक! आणि अस्मादिक इतिहास या विषयात दरवेळी नापास होता होता वाचलेली! (म्हणजे शाळेतल्या बाईंनी परत पुढच्या वर्षी हे पार्सल नको बाई आपल्या वाट्याला) या भावनेनं पुढच्या वर्गात ढकललेलं!! त्यामुळे माझ्या मनात शंका की, चुकून या बाईने आपल्याला इतिहासातला प्रश्न विचारलाच तर काय घ्या! भित्या पाठी ब्रह्म राक्षस! तसं माझ्या पाठी इतिहासाचं भूत!

पण शेवटी एकदाचा धीर करून केला फोन अ‍ॅडमिशनसाठी आणि मी निश्चिंत झाले! अ‍ॅडमिशन मिळाल्यामुळे नाही तर इतिहास या विषयावर काही बोलणं झालं नाही म्हणून!!

आणि सुरु झाली ऑन लाईन ट्युशन. बाकी आरती खूप पेशन्स वाली आहे. माझ्यासारखीला शिकवायचं म्हणजे काही सोपं काम नाही! तिला तिचं सगळं स्किल पणाला लावावं लागणार! पण माझ्या दृष्टीने अजून एक महत्वाची बाब आहे ती म्हणजे 'दूर शिक्षण' चालू असल्याने चुकलं तर पाठीवर किंवा हातावर पट्टी बसायची शक्यता अजिबात नाही!!

बाकी हि आरती; दिनेशदा किंवा जागू यांच्या लायनीत बसणारी आहे हं! मला तर दाट संशय येतोय या लोकांचा; कि यांचे नक्की एक दहा बारा तरी क्लोन्स केलेले असणारेत!! त्याशिवाय का इतक्या गोष्टी हि लोकं करू शकतील? Wink

आता आरतीचंच बघाना - क्रोशा, भरतकाम, बागकाम,अनिमेशन, लेखन,वाचन अध्यापन ब्लॉग आणि ब्लॉग संबंधी सगळ्या गोष्टी (बापरे मला लिहूनच धाप लागलीये).

तर मी आरतीकडे दोन महिने जे शिकले त्याचे फोटो....................

हा भाचीच्या मुलीसाठी केलेला स्कर्ट. माझा पहिला प्रयत्न...

IMG_3270.JPG

आणि हा बेबी फ्रॉक....

IMG_3487.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पैली....मी पैली...............
काय गं मलाही "सौंशय" यायला लागलाय हं की तूही त्या क्लोनांच्या लायनीत जाऊन बसणार हं शांकली!
पहिलाच प्रयत्न सुंदर!
आणि लिहिलंस ही सुंदरच!

शांकली खुप गोड विणल आहेस.
लिखाणही गोड लिहील आहेस.

आरती मला पण क्लास लावायचा आहे ग तुझ्याकडे. Happy

शांकली, सुरेखच ! लिहिलंस ही, अगदी ओघवत्या भाषेत, मस्त !
खरं तर मला तुझ्याच पेशन्सचे कौतुक वाटते.
दुसरी कलाकृती तू अननसाची निवडलीस अन अगदी छान निभावलीस. तुला आधी म्हणाले तसं, अननसाचे डिझाईन जमले म्हणजे क्रोशा विणकामातील डिग्री मिळवलीस तू ! अन इतक्या कमी वेळात घर, नोकरी, बाकीची व्यवधानं जपून तू हे करते आहेस, हॅट्स ऑफ टू यू डिअर Happy
जागू ये कधीही. फक्त तुझ्याकडून फि वेगळ्या स्वरूपात घेणार बरं Wink जाणकार ओळखतीलच .

व्वा! शांकली मस्त जमलाय स्कर्ट आणि फ्रॉकही. शाब्बास! Happy

बाकी हि आरती; दिनेशदा किंवा जागू यांच्या लायनीत बसणारी आहे हं! मला तर दाट संशय येतोय या लोकांचा; कि यांचे नक्की एक दहा बारा तरी क्लोन्स केलेले असणारेत!! त्याशिवाय का इतक्या गोष्टी हि लोकं करू शकतील? डोळा मारा>>>>>>>>>>>मला पण. Happy
काय गं मलाही "सौंशय" यायला लागलाय हं की तूही त्या क्लोनांच्या लायनीत जाऊन बसणार हं शांकली!
पहिलाच प्रयत्न सुंदर!>>>>>>>>>>+१ Happy
शांकली, सुरेखच ! लिहिलंस ही, अगदी ओघवत्या भाषेत, मस्त !>>>>>>>>>>>+१ Happy

जागू ये कधीही. फक्त तुझ्याकडून फि वेगळ्या स्वरूपात घेणार बरं जाणकार ओळखतीलच . >>>> मासे काय किंवा इतर डिशेस काय अजून तरी नेटथ्रू पाठवता येत नाहीत - नाहीतर ???? Happy Wink

शांकली.......तुला सुद्धा एक कडक सॅल्यूट !!
फार गोड झालाय स्कर्ट आणि फ्रॉक सुद्धा Happy
लिहिलं सुद्धा किती सुरेख !!
मला वाटतं आपल्याला ज्या गोष्टी करायला आवडतात त्यासाठी आपण कसाही वेळ काढतोच... त्याचा आपल्याला त्रास कधीच होत नाही ....हो ना Happy

बाकी हि आरती; दिनेशदा किंवा जागू यांच्या लायनीत बसणारी आहे हं! >> ही लिस्ट वाढ्वावी लागणार बहुतेक Happy
मला वाटतं आपल्याला ज्या गोष्टी करायला आवडतात त्यासाठी आपण कसाही वेळ काढतोच... त्याचा आपल्याला त्रास कधीच होत नाही ....हो ना Happy >>> +१
सुंदर आहे.

सर्वांना मनापासून धन्यवाद.

आरती, खरंतर हे सर्व क्रेडिट तुझं आहे. तू छान शिकवतियेस म्हणून हे सारं करायला मला जमतंय.

आणि हो एक गंमत सांगायची राहिलीच! 'अहों' कडून तुला खास बक्षीस मिळणार आहे. बायकोचं तोंड बंद करू शकलीस (काही काळ का होईना!) म्हणून!! Wink

खुप छान लिहिले आहेस शांकली :)विणकाम हि सुंदर आणि सुबक Happy
मलाही "सौंशय" यायला लागलाय हं की तूही त्या क्लोनांच्या लायनीत जाऊन बसणार हं शांकली!>>> +१०० अगदी Happy
अन इतक्या कमी वेळात घर, नोकरी, बाकीची व्यवधानं जपून तू हे करते आहेस, हॅट्स ऑफ टू यू डिअर !>>>+१०० खरं तर माझ्या नंतर क्लास सुरु केला आणि किति पट्कन पिकअप केलेस... Happy
आरती, खरंतर हे सर्व क्रेडिट तुझं आहे. तू छान शिकवतियेस म्हणून हे सारं करायला मला जमतंय. >>> +१००००
मलाहि ...

Happy धन्यवाद स्वाती, माशा आणि वंदना...

पट्कन वगैरे नाही गं..आरतीचा पेशन्स खूप आहे. आणि मी तो फ्रॉक बर्‍याचदा उसवा उसवी करुन केलाय.

शांकली तुम्ही खूप हुशार विद्यार्थीनी आहात, २ महिन्यात किती चांगले करून दाखवलेत. दोन्ही एकदम cute आहे.

अंजू, अगं कस्ले गोडुले दिस्तायत दोन्ही... दोन महिन्यांत इतकं कठीण काम जमवलयस... धन्य बायो तुझी.
लगे रहो...
(रच्याकने ते दुसरं माझ्या मापाचं झालं तर मी खुश्शाल जीन्स वर घालून मिरवेन... तुझी शप्पथ).

शांकली, कित्ती क्युट आहे हे! अवलतै, तुस्सी ग्रेटच हो. मला खरच खूप कौतुक वाटतं तुमचं.
दाद Happy हसू आलं तरी तुमच्या पोश्टीत अज्जिबात अतिशयोक्ती नाही बर्का. हे अस्सं गोड क्रोशाकाम पाहीलं की लहान व्हावसं वाटतं.

वॉव..
ए असा मोठा स्कर्ट पन छान दिसेल ना ? Wink
यवतमाळला हमेशा क्राफ्ट सेल येतो...तेथे मग भारतातील लोकल कलाकार स्वतःच्या कला घेऊन बसतात.. राजस्थान कडील लोक बरेचदा स्कर्ट, घागरा अशांचा स्टॉल लावतात... यावेळी मी तेथुन दोन स्कर्ट घेतले.. तेथे क्रोशाच पन भरपूर काम असत काही बाही..
डॉयलीज, छोट्या मोठ्यांचे स्कर्ट, जवळपास ६ ते ७ वर्षीय मुलींना होईल असे क्रोशाचे फ्रॉक वगैरे...
माझी आई करायची डॉयलीज...आता बंदच झालं.
मला तुम्हा लोकांच इतकं बारीक काम पाहुनच धडकी भरते...

मस्त लिहिलयस शँक.. आणि स्कर्ट आणि बेबी फ्रॉक दोन्ही आवडलं.. कलर कॉम्बो छान तर आहेच पण त्या स्कर्ट मधे कॉन्ट्रास्ट रंगाची लेस टाकल्यामुळे आणखी उठाव आला त्याला...वाह...