व्यसन
व्यसन
वय कस रंगेल असत आपल्या वेगवेगळ्या टप्प्यावर!
तेंव्हा..
जांभळं चाखण्यापेक्षा
जिभ जांभळी होण्याचाच आनंद अधिक व्हायचा
मिटक्या मारत आवळा खाण्यापेक्षा
नंतर गोड लागणार्या पाण्याचीच मजा घोटाघोटाने वाढायची
किल्ला उभारण्यापेक्षा
चिखल मातिने हात माखून घेण्यातच उदंड सूख मिळायचे
मेंदी रंगण्यापेक्षा
ती जागून काढलेली रात्रच अधिक रंगलेली वाटायची
मायेच्या गार सावलीत बसण्यापेक्षा
उन्हातान्हात भटकून काळवंडून घेण्याचीच भुक जास्त असायची
आणि मग येत तुमच विड्याच पान
दात.. ओठ.. जिभ
आणि चक्क बायामाणसांना रंगेल करणार!
देठासहीत असलेल
ओलसर पालवात ठेवलेल
हिरवागार.. टोकदार..धारदार
जरड शिरांनी सुंदरस दिसणार
अडकित्त्यात अख्खी सुपारी धरुन
कातरत कातरत तिच संपून जाण
बोटभर चुना घासून पानाला लावण
कथिया रंगाचा काथ शिंपडण
पारदर्शन रंगाचा मनूका पेरण
दुमडून मस्त घडी पाडून
लवंग खोचून पानाला बंद करण!
सगळ तसच्या तसच आठवत!
ऐटीत मारलेल्या पिचकार्यांसहीत!
उभ्या आयुष्यात कुठलच व्यसन
जडल नाही.. जडू दिल नाही
छे!.. हिम्मतच झाली नाही!
पण रेंगाळत राहणार्या
ह्याच्या त्याच्या स्मृतींच
व्यसन जन्मजात लागलेल असत!
कपड्यावर पानाचा डाग पडावा
निघता निघता न निघवा
तस हे एक व्यसन .. स्मृतीच!
यशवंत/बी
मस्त रे! जमली आहे एकदम.
मस्त रे! जमली आहे एकदम.
सहीच...
सहीच...
आवडली
आवडली
मस्त !!!!
मस्त !!!!
खूपच सुरेख...
खूपच सुरेख...
छान!!!
छान!!!
मस्तच
मस्तच
आवड्ली
आवड्ली
बी, छान कविता.
बी, छान कविता.
छान
छान
मस्तं कविता.
मस्तं कविता.
आवडली.
आवडली.
धन्यवाद सगळ्या सगळ्यांचे
धन्यवाद सगळ्या सगळ्यांचे
मस्तच,वेगळा विचार करणारी
मस्तच,वेगळा विचार करणारी कविता.
छान बी अरे सुरेख जमली आहे.
छान बी अरे सुरेख जमली आहे.
मस्त !
मस्त !
छान आहे.
छान आहे.
आवडली!
आवडली!
मस्त!
मस्त!
सर्वांचे खूप खूप आभार.
सर्वांचे खूप खूप आभार.
मस्त!
मस्त!
सुंदर. प्रामाणिक. निरागस.
सुंदर. प्रामाणिक. निरागस.
छान
छान
अर्रे ........मस्तच!
अर्रे ........मस्तच!
भन्नाट
भन्नाट

सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
छान
छान
खूप खूप आभार सर्वांचे
खूप खूप आभार सर्वांचे
वा!
वा!
Excellent, Super like!
Excellent, Super like!
Pages