काजवे एक भन्नाट अनुभव

Submitted by Godeya on 8 June, 2013 - 10:46

काल आंबोली ला गेलो होतो काजवे पहायला एक निसर्गाचा अद्भुत नजारा , लाखो काजवे झाडावर लायटींग केल्यासारखे दिसत होते ! फोटो काढताना जी काही दमछाक झाली अन धम्माल आली ती अशी

DSC_7166.jpgDSC_7166_0.jpgDSC_7167.jpgDSC_7169.jpgDSC_7170.jpgDSC_7185.jpgDSC_7185_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल पाहिले होते काजवे नसल्याने आमच्याच डोळ्या समोर काजवे आले होते.
आज परत पाहीले , फोटो अप्रतिम आहे. अकोल्या पासुन खटकलीच्या जंगलात गेलो होतो रात्री असेच दॄष्य होते. पण वाघ पहाचा मोह त्यात किर्र अंधार धागधुकीमुळे फोटो काढायचेच रहाले.

गावी रात्री तमाशा बघुन आल्यावर काजवे पकडुन शर्टाच्या खिशात ठेवायच्या करामतीची आठवण झाली. छान प्र.चि. गोद्या.

धन्यवाद या प्रचिंसाठी.
लहानपणी कोकणात एसटीने घाटातून जाताना दर्‍याखोर्‍यात हा दैवी लखलखाट पाहिलाय.विसरूच शकत नाही.

पुर्वी एक काजव्याचा प्रकार होता, तो आता नाहिसा झाला कोकणातुन. त्याचा प्रकाश लालसर तांबुस असायचा ,संपुर्ण झाड पेटल्याचा भास व्हावा इतपत काजवे असायचे.

छान फ़ोटो. खूप वर्षांपूर्वीची आठवण झाली. आम्ही कोकणात असताना आम्ही रोज पाहायचो .खूप छान देखावा दिसतो. आश्चर्य म्हणजे हे सगळे एकाच वेळी प्रकाशित होतात आणि एकाच वेळी अप्रकाशित होतात. त्यामुळे लाईटींग होत असल्यासारखच वाटत. आमच्या घरी पण यायचे काजवे. आम्ही बाटलीत भरून बघायचो. कधी कधी वाळत घातलेल्या कपड्यांवर पण चमकत असायचे. Happy

अप्रतिम फोटोज. एव्हढे काजवे पहायला मिळतात हे नशीब आहे.

गेल्या वर्षीपासून आम्ही एक उपक्रम हाती घेतला आहे. जी ठिकाणे काजव्यांची होती असे जुने लोक सांगतात, त्यांना भेटी द्यायच्या. आम्हाला काजवे दिसत नाहीत. सध्या जंगल, सामाजिक वने वगैरे टाळलेले आहे. गावांच्या बाहेर, शहरांच्या बाहेर असा सध्याचा क्रम आहे. इथे लोकांनी काजवे पाहिलेले आहेत. पण काजवे कुठे गेले असा प्रश्न विचारण्यासाठी आणखीही शोध घेण्याची गरज आहे. पानशेत, भीमाशंकर वगैरे ठिकाणी नक्की पहायला मिलतील. रात्रीचा मुक्काम ही अडचण आहे.

पण...
आपल्या सोबतीला असलेले, रात्री रस्ता दाखवणारे आपले शेजारी असणारे काजवे नक्कीच गायब झालेत. अजूनही कुणाच्या गावी दिसत असतील तर नक्की सांगा.

Pages