Submitted by रसप on 10 June, 2013 - 01:29
पर्वतरांगा
तुझ्याच सार्या
तुझी पठारे
तुझ्याच सरिता
वाळवंटही
तूच पसरल्या
शिखरांपासुन
पायथ्यांपुढे
शुभ्र हिमाच्या
अनंत शाली
धरणी भिडते
आकाशाला
असा अनोखा
संगमसुद्धा
तूच घडवला
वैविध्याचे
आश्चर्यांचे
अथांगतेचे
अनंततेचे
असे प्रदर्शन
कधी न दिसले
परंतु येथे
विशालतेच्या
परिसीमेला
मानवतेची
चाहुल नाही
असे भयंकर
रूप तुझे तर
कसे असावे
दानवतेचे
भीषण दर्शन ?
जेव्हा येतो
तुझ्या रूपाने
समोर मृत्यू
तुझ्याच निश्चल
शांतपणाने,
कशी तुझी ही
भीती झटकुन
पुन्हा एकदा
मनात माझ्या
विशुद्ध श्रद्धा
भरून यावी
आणि जुळावे
कर हे दोन्ही
निव्वळ, अस्सल
प्रेमापोटी ?
माझ्यामधल्या
तुझ्याच एका
ह्या अंशाला
सांग तुझ्या ह्या
विशालतेतुन
शोधुन काढुन
तूच स्वत:ला..!
....रसप....
८ जून २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/06/blog-post.html
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त!
मस्त!
____/\______ माझ्यामधल्या तुझ
____/\______
माझ्यामधल्या
तुझ्याच एका
ह्या अंशाला
सांग तुझ्या ह्या
विशालतेतुन
शोधुन काढुन
तूच स्वत:ला..! --- रसप
ऐकना आता ..स्वतःला विठ्ठला ..
लावना ...माझा लळा... तू लावना !!!--- वैवकु
हेच तर सांगतोय मी ह्या शेरातून जे तू या कडव्यातून सांगीतलय्स
जिवंत आहे ही तुझी कविता !!! हिच्यात प्राण आहे !!!
व्व्वाह!!
व्व्वाह!!
छानच..... तिसर्या खंडातील
छानच..... तिसर्या खंडातील "भीती झटकून" यानंतर ..... मस्तच.
२४ मे ते ३१ मे २०१३ दरम्यान
२४ मे ते ३१ मे २०१३ दरम्यान मी सहकुटुंब लडाखला गेलो होतो. 'लडाख'च्या अवर्णनीय सौंदर्याच्या भीषणतेचे एक छोटेसे दर्शन (शुद्ध मराठीत 'झलक') आम्हाला घडलं होतं. ह्या कवितेमागे त्या अनुभवाची पार्श्वभूमी आहे. सर्व कथन न करता 'प्र.अ.' मधील माझ्या त्याबद्दलच्या एका लेखाची लिंक देतो. जमल्यास वाचावे.
'साडे अठरा हजार फूटांवरचं एक फूट....... !! (Unforgettable Ladakh)'
दंडवत .......
दंडवत .......
पर्वतशिखरांच्या
पर्वतशिखरांच्या संकल्पचित्राचाच भास देणारा आकृतीबंध .. खूप तन्मय होऊन लिहिले आहे..