पर्यावरण दिनाचं "शेअर" आणि "लाइक"

Submitted by अनुराधा म्हापणकर on 5 June, 2013 - 08:23

तोबरा भरल्या तोंडातून
मस्त फेकली पिचकारी
पीयुसी नसलेल्या गाडीतून
झोकातच घेतलीभरारी

गाडीतून जाता जाता
बिसलेरीची बाटली
काचेच्या फटीतून
अलगद खाली टाकली

चॊकलेटाचं एक रॆपर
हलकेच दिलं भिरकावून
आणि सिगरेटीचं थोटूक
हवेत घेतलं हेलकावून

हायवेच्या कडेला
मग लघुशंका निरसली
सरलेली सिगारेट तेव्हा
झुडुपांना जाऊन डसली

निवांत एसी गाडीत
रीक्लाइन करुन चेअर
’पर्यावरणदिना’ची पोस्ट
एफबीवर केली शेअर

जाता जाता न विसरता
आणि वर केला कमेन्ट !
"Save our Tree" म्हणे
आणि "वाचवा" environment"

अनुराधा म्हापणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

धन्यवाद !
इब्लिस -- निस्तरली शब्द योग्यच ! पण ती लघु"शंका" आहे. आहे "शंका"निरसन असते त्या अर्थी निरसली हा शब्द वापरला आहे. अभिप्रायाबद्दल आभारी आहे.