कीर्तनकारांचे देशकार्य

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 30 May, 2013 - 22:11

कीर्तन ही कला आद्य पुराण-काळापासून प्रचलित आहे. नारदास आद्य कीर्तनकार मानतात . नामदेव-तुकाराम-एकनाथ -रामदास आणि तत्सम साधूसंतांनी मुघल आक्रमणाच्या काळात हिंदू धर्माला आलेली ग्लानि आणि औदासिन्य/ धोका पाहता कीर्तन /भजन /भारुड /अभंग इत्यादि माध्यमातून लोकजागृती करून धर्मरक्षण केले . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य-निर्मिती च्या मागे संतांनी केलेली लोकजागरुती आणि सामाजिक कार्याची भक्कम पार्श्वभूमी आहे.

१९ -२० व्या शतकात सुद्धा कीर्तन-कारांनी देशभक्ती आणि स्वराज्यासाठी योगदान दिले आहे . यात प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल ते दासगणू महाराज आणि आफळे शास्त्री यांचे . १९८० नंतर भक्तिमार्गाच्या प्रसारात चैतन्य भागवत संस्थेचे बाबा महाराज सातारकर यांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. त्यांची कीर्तने ऐकणे हा आजही दिव्य अनुभव आहे.

आजच्या काळात बिग्रेड सारख्या समाजविघातक संघटना हिंदू धर्माचे वाटोळे करण्यासाठी साम-दाम-दंड -भेद वापरत असताना कीर्तन-कारांचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते . चारुदत्त आफळे आपल्या परीने या आघाडीवर लढताना दिसत आहेत ,पण त्यांना तशीच समर्थ साथ मिळणे आवश्यक वाटते . कीर्तन सममेळण /कीर्तनकार संघटना या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. पण अजून अधिक व्यापक पातळीवर असे प्रयत्न होण्याची गरज जाणवते.

इत्यलम .

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच छान लेख आहे पण आपल्या पेश्का तिकड परदेशात फार जोरात कीर्तन / भजन चालते आहे असे दिसते. येईल आपल्याकडे पण थोडे उशीरा
म्हणतात ना कि फॉरेन सभ्यता फार लवकर येते.कारण आम्हाला आपल्या सभ्यतेची चाड्च नाही.कारण कोणतीही वस्तु असो कि सभ्यता ती बाहेरीलच चान्गली असे असते ना ? नाहीतर या सगळ्या गोष्टि आपणच तर जगाला दिल्या आहेत पण त्या विसरुन गेलो आहे. काही चुकत असेल तर माफ करा पण हे सत्य आहे कि नाही ? चारुदत्त आफळे खुपच छान काम करत आहेत याबद्द्ल वाद्च नाही.

स्वामी विश्वरूपानंद महाराज ,आपण राष्ट्रसंत कीर्तनकार तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबा यांचे कार्याचा उल्लेख केला नाहीत. त्यांचेही कार्य अतिशय मोलाचे आहे.

गोविंदबुवा आफळे यांचे कीर्तन ऐकणे ही एक पर्वणी होती. त्यांचे सुपुत्र चारुदत्त आफळे हेसुद्धा सद्य स्थितीत एकांड्या शिलेदारा प्रमाणे राष्ट्रकीर्तन करत आहेत .

स्वामिजी, मंदार, अभय, लिंबूटिंबू . . . .

छान विषय आणी प्रतिसाद ही साजेसे . . . . किर्तन ही एक फार-फार महत्वाची गोष्ट आहे माझ्या आयुष्यात, लहानपणी मी महाराष्ट्रात जिथे जिथे राहिलो, तिथे तिथे ह्या किर्तनांना मी संध्याकाळी हटकुन जायचो आणी तेही वेगवेगळ्या देवळांत, खूप आनंद वाटायचा किर्तनात, ऐकतांना कसे अगदी हरवून जायचू मी त्यांत, संपल्यावर सुद्धा देवळात बसुन राहायचो, रेंगाळत, रेंगाळत घरी यायचो, सगळे आठवत आठवत, आई-बाबा कधी-कधी म्हणायचे किती वेळ लावायचा ! जेवणाची वेळ ही टळुन जायची.
ही किर्तनेच आहेत बहुतेक ज्यांच्यामुळे मला बहुतेक अध्यात्मात खूप आवड निर्माण झाली.
धन्य ते सर्व किर्तनकार आणी धन्य ती किर्तने . . . . !

गोविंदबुवा आफळे यांचे कीर्तन ऐकणे ही एक पर्वणी होती.
----- मला पण त्यान्चे कीर्तन एकायला मिळाले असे अन्धुकसे आठवते. सिन्नरकर महाराज यान्चे नाव पण बरेच एकले आहे... शिवाजी महाराज/ सभाजी महाराज/ अनेक विर यान्चा पराक्रम अशाच कीर्तना मधुन माझ्या पर्यत आला. मन्त्रमुग्ध व्हायचे त्या दिवसात...

जनजागृती आणि सामाजिक सलोखा राखण्याची कसरत अशा कीर्तनात/ सभात महत्वाची वाटते... समाजाला तोडणे सोपे असते पण जोडणे आणि जोडल्यावर बान्धुन ठेवणे महा कठिण...

चारूदत्त आफळ्यांचे कीर्तन ऐकले/पाहिले होते. चांगले केले होते त्यांनी.

कॅलिफोर्नियामधे स्टॅनफोर्ड विद्यापीठात नुकताच 'कीर्तन' या विषयावर कार्यक्रम होता.
http://events.stanford.edu/events/373/37315/

किर्तनकार चांगला असेल तर आपुसक गर्दी होते. पण आज टिव्हीमूळे लोक तिकडेही फिरकेनासे होत आहेत.

टी. व्ही. वरच जर किर्तने व्हायला लागली तर चांगले नाही का ?

आपली जुनी संस्कृतीही टिकुन राहील, आणी नविन दृष्टीने पाहीले तर, कोणाला किर्तनाच्या जागेपर्यंत जायलाही नको . . . . आजकाल तसेही अडथळे पुष्कळच असतात.

धन्यवाद सर्वा प्रतिक्रिया बद्दल , इकडे मायबोली.कॉम वेब साइटवर जर कोणी टीव्ही संबंधित व्यक्ति सदस्य असल्यास तशी सूचना करावी, म्हणजे सर्वांना कीर्तनाचा आनंद सहजगत्या घेता येईल

Katre क्षमस्व ,तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबा यांचे कार्याचा उल्लेख व्हायला हवा होता . स्मरण राहिले नाही

सिन्नरकर महाराजांची बरीच किर्तने ऐकली. अंगावर रोमांच उभे रहायचे.

किर्तन ही महाराष्ट्राची लोकपरंपरा आहे.

सध्याच्या काळात निवृत्ती इंदूरीकर महाराज यांची किर्तनेही चांगली होतात. अगदी विनोदी, ग्राम्य शैलीतली त्यांची किर्तने ऐकणे म्हणजे एक योग आहे. युट्यूबवरही त्यांची किर्तने अपलोड केलेली आहेत. ऐकाच एकदा.