घराच्या रचनेत फेरफार करुन देणार्‍या कामगारांचे पत्ते

Submitted by हर्ट on 29 May, 2013 - 04:19

नवीन घर मनासारखे मिळतेच असे नाही. तुम्ही जर वास्तुशास्त्र वगैरे पाळत असाल तर घरात थोडाफार बदल करावा लागतो. आम्हाला अशीच गरज भासत आहे.

जर तुमच्याकडे उत्तम कौशल्य असलेल्या.. घराची कामे करणार्‍यांचे पत्ते असतील तर इथे लिहा. आमचे किचन उत्तर दिशेला आहे. ते नको आहे. असे आणखी छोटे बदल करुन घ्यायचे आहे. पुण्यातील कामगारांचे पत्ते हवे आहेत.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्किटेक्ट अथवा कॉन्ट्रॅक्टर कडून करुन घ्या. थ्रु प्रॉपर चॅनेल जा. थेट कामगारांकडून काम करुन घेण्याच्या फंदात पडू नका.यातील अनेक बावी पराधीन असतात. ठरल्याप्रमाणे कामे होतातच असे नाही.

थेट कामगारांकडुन काम करुन घेऊ नका. एकतर त्यांना कुठले काय तोडले तर चालेल / नाहीच्च तोडायचे याची काहीही माहिती नसते. शिवाय अर्धं काम करुन निघुन जायचे / सुट्ट्या घ्यायच्या अशा त्यांच्या सवयी असतात. काम अर्ध सोडुन गेले कामगार तर कुठे शोधायचं त्यांना? नीट ऑफिस/ दुकान असेल तर किमान चारवेळा चौकशी करता येते. दुसरे कामगार बोलावता येतात.
तुम्हाला किचन बदलुन हवेय म्हणजे बरेच काम असणार. ड्रेनेज पाईप्स , नळ सगळंच बदलेल. अनुभवी आर्किटेक्ट कडुन / बिल्डर कडुनच करुन घ्या. ( अगदी गरज नसेल तर ड्रेनेज बदलु नका, त्याचा फार त्रास होतो , बिल्डींगलाही नुकसान होते )

बी.. तुझे घर तयार आहे की अजून बांधकाम चालू आहे? अजून बांधकाम चालू असेल तर तू बिल्डरलाच किचन बदलून द्यायला सांगू शकतोस. पण हल्ली बरेच बिल्डर बदल करून द्यायला नकार देतात. त्या केसमधे किंवा घर तयार असेल तर तुला एखादा इंटिरीयर डिझायनर मदत करू शकेल. माझा पुण्यातला एक मित्र याच क्षेत्रात आहे त्याला विचारून बघ.. स्वप्नील माने - ९३२६९ ७६९८८

थेट कामगारांकडुन काम करुन घेऊ नका >> +१

बी, घर घेतलं का? इन जनरल तुमचा वास्तु ई. वर इतका विश्वास असेल तर त्या हिशोबानेच घ्यायचं ना आता इतकी काँप्लिकेशन्स करण्यापेक्षा! घरात स्ट्रक्चरल चेंजेस करणे तापदायक अन महागडेही पडते!

मैत्रेयी हो घर निवडले आहे. टोकन रक्कम सुद्धा दिली आहे. आता फक्त लोन आले की करारावर सही करायची आहे. घराची दिशा पश्चिम आहे. पुर्वेला मोठी खिडली आहे. बाकी सर्व छान आहे फक्त ओटा उत्तरेला येतो. मला हे माहितीही नव्हते. माझी बहिण आज गेली बघायला तिला तो ओटा आता दक्षिण-पुर्व करायचा आहे. पाईपड गॅस कनेक्षन आहे, नळ आहे, ओटा आहे ह्या तीन गोष्टी आता बदलाव्या लागतील.

मी घर शोधणे माझ्या पुतणीवर .. भाच्यावर सोपवले होते. ही लोक १० घर बघून लगेच कंटाळतात. आणि भारताबाहेर आपण म्हणून वेळ कमी पडतो. इतका त्रास होतो ना खरच. मला आठवत ७ वर्षापुवीच मला घर घ्यायचे होते पुण्यात. पैसेही होते. त्यावेळी २.५ बेडरुम घराच्या किमती ४० लाख होत्या. आता हीच घरे मिळणे अवघड झाले आहे. दूर दूर कुठे घरे बांधतात लोक. मी तर काही घरे इतकी बायपासला लागून पाहिली की तिथे गाडी चालवत जाणे म्हणजे रोज जिवाला जपणे आले. अवघड वाटा, उतार, वाहते रस्ते, चिक्कार गाड्या!