जात.

Submitted by महाश्वेता on 23 May, 2013 - 22:13

नमस्कार मायबोलीकरांनो.
आज मी माझी पहिली कथा ईथे प्रकाशित करीत आहे.

''तु जे सांगतो आहेस ते अतिशय बरोबर आहे पण.....''
''पण काय''
''शेवटी जात आडवी येते.''
राकेशला हे ऐकुन धक्काच बसला.
आपला बाप जो समाज सुधारायच्या गप्पा मारतो त्याच्या तोंडून ही भाषा!
मग बाकिच्यांना बोलुन काय उपयोग
राकेश तावातावात नलिनीकडे गेला.
''नलिनी तुझं माझ्यावर प्रेम आहे ना?''
''आता जीव दिला तर तुला कळणार आहे का कि माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते!''
''तर मग नलू जर आपल्या प्रेमात जातीचा एकच अडथळा असेल तर मि आजपासुन माझी जात सोडली.''
''मग मीपण आजपासुन माझी जात सोडली, कारण तुझ्या प्रेमासमोर माझी जात काही नाही.''

पंधरा वर्ष उलटली.
राकेश तावातावाने जातीवादावर भाषण देत होता.
नलिनी अभिमानाने त्याच्याकडे बघत होती.
भाषण संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.
घरी आल्यावर त्याने थोडा आराम केला.
आणि म्हणाला.
''नलू येतो मी, सोनीच्या शाळेत फी सवलतीसाटी जातीचा दाखला मागितलाय!''

चूकभूल माफ असवी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या ओळखीच्या आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या एका दांपत्याचे शब्द - "आपण जात नाही पाहिली तरी सगळे सुरळीत सुरु राहते पण आपली मुले लफडेबाज (हा त्यांनी वापरलेला शब्द. पर्यायी सोबर शब्द माहित असल्यास तो वापरुन वाचावे) नाही निघाली तर मात्र हीच जात आपल्या मुलांच्या लग्नाच्या वेळेस फणा काढुन समोर उभी राहते..!"

इतक्या वर्षानी कुणालातरी माझ्या आयडीच उत्खनन करावंस वाटलं हे बघून आनंद झाला.
पण खरं सांगायला गेलं तर ही कथा माझी नव्हतीच. इथल्याच एका होतकरू आयडीने लिहिलेली कथा, त्याच्या विनंती वरून जशास तशी इथे पोस्ट केली.
बादवे तो आय डी आता बऱ्याच जबरदस्त कादंबऱ्या लिहितो, आणि लवकरच १०० चाहते पूर्ण करेल असा मला विश्वास वाटतो Lol

Love marriage हम्मम.
पण मोठ्या बापाची, वरच्या जातीची पोर फसवून आणली आणि लग्न केलं म्हणूनही मिरवणारे विकृत महाभाग आहेत जगात. बिचाऱ्या मुली कुढत राहतात आयुष्यभर!
एक प्रसंग सांगते, लॉच्या तिसऱ्या वर्षाला असताना एक मुलगा माझ्या मागे लागला होता. अक्षरशः इरिटेट करण्याइतका, पण हेतू एकच होता, वर उल्लेखलेला, आणि गम्मत म्हणजे त्याची बहीणही इतकं इरिटेट करायची, की काय सांगावं.
नंतर त्याचं एका मुलीशी लग्न झालं, तेव्हा ती बहीण मला सांगायला आली, 'बघ तुमच्याच जातीची आहे' आणि फिदीफिदी हसली.
सहा महिन्यात फारकत.
प्रत्येक गोष्टीला पदर असतात जगात! एकच सांगते, प्रेम खरं की खोटं हे बघून प्रेम करा, नाहीतर आपले आई बाप समर्थ आहेत, विहिरीत ढकलून देणार नाही आपल्याला.

श्वेता पूर्ण प्रतिसाद पटला.
(पण तुझी जात बघून तुझ्या मागे लागण्यापेक्षा क्लासमधील सगळ्यात सुंदर मुलगी म्हणून मागे लागला असावा हे स्पष्टीकरण मला जास्त पटलं आणि आवडलं असतं Wink

श्वेता, मला आपले लिखाण अतोनात आवडले. मला वाटतं त्या मुलाला आपल्या व्यक्तीमत्वाने भुरळ घातली असण्याची बरीच शक्यता आहे. कदाचित बहीणीस खरच अभिमान वाटला असेल तिच्या भावजयीचा ( सपोझ तथाकथित उच्च वर्णाला महत्व देणारी असेल तर) पण अर्थात तुम्ही म्हणता त्यावरुन ती कुत्सित हसली होती तेव्हा तुमचा कयास बरोबरच असेल.

@ अज्ञा - बस कर पगले, रुलायेगा क्या. Lol
@सामो - प्रत्येक मुलीला एक सेन्स असतो, समोरच्याच नेचर अथवा हेतू ओळखण्याचा. (बऱ्याचदा मुली तो वापरत नाही, ही गोष्ट वेगळी.) त्यामुळे दुसरी शक्यता नव्हतीच.
आणि तसाही त्याचा किंवा त्याच्या बहिणीचा तसला हेतू जरी नसला, तरीही त्यांच्या बापजन्मात ते शक्य झालं नसतं. I have my own rules.
श्वेता, मला आपले लिखाण अतोनात आवडले. मला वाटतं त्या मुलाला आपल्या व्यक्तीमत्वाने भुरळ घातली
>>>>>
How cute!!!! <3

मुळ मुद्द्याला हात घातलात.

आमच्या कॉलेज मधला मुलगा आरक्षणाविरूध्द बोलायचा. आणि सगळे त्याला बोलू द्यायचे आणि तो बोलतो म्हणून कौतुकही करायचे.
कारण नंतर कळालं. तो स्वतः जात प्रमाणपत्र दाखवून शैक्षणिक फी सवलत मिळवत होता. आणि इथे जे काही तो बोलतो, ते प्रत्यक्षात होण्याची भिती त्याला नव्हती आणि बोलून मिळालेल कौतुक मात्र त्याला मिळणार होतं.

या पिढीचे माय बाप आपण आहोत... आपण आपल्या मुलांना याविषयी संस्कार द्यायला हवे... नाहीतर पुढे आपली मुले ही म्हणतील जातीभेद कसा mitvaycha..

तुमच्या वारसदार या कथेचा नवीन भाग आला का + १
बरा मुद्दा शोधुन काढला ..... Lol
- मी वाट बघते..... महाश्वेतादी जरा लक्ष दे.

या पिढीचे माय बाप आपण आहोत... आपण आपल्या मुलांना याविषयी संस्कार द्यायला हवे... नाहीतर पुढे आपली मुले ही म्हणतील जातीभेद कसा mitvaycha..
>>>>
जरा स्पष्टच बोलते, आजची जी पिढी आहे ना, ती माय बापाला ज्ञान शिकवते. त्यांना जास्त शिकवायची गरजच पडत नाही.
I'm unmarried, आणि केव्हा लग्न करेन किंवा लग्न करेनच याची गॅरंटी नाही. सो, मी पुढच्या पिढीला काय ज्ञान देईल, आय डोन्ट नो, पण एखाद्या मुलीला ज्ञान द्यायचंच झालं तर...
१. सगळ्यात आधी मुलगा नीट पारखून घे, वाहवत जाऊ नकोस.
२. तो नीट स्थिरस्थावर आहे ना, आई बाबा आहेत ना, कमावतो का हे चेक कर.
३. तुला दोन वेळच नीट खायला घालून तुझ्या सगळ्या हौस पूर्ण करेल का हे बघ.
४. फक्त तुझी जात बघून लग्न करतोय का, हेही बघ. (माझी वरची केस)
५. आणि तुझ्या आयुष्यात तू जातीभेद मिटवण्यासाठी परजातीतीलच मुलगा शोधला पाहिजे आणि लव मॅरीजच केलं पाहिजे असा माझा अट्टाहास नाही. किंबहुना असल्या एखाद्या cultच्या नादी लागून आयुष्य बरबाद करून घेऊ नकोस.

> I'm unmarried, आणि केव्हा लग्न करेन किंवा लग्न करेनच याची गॅरंटी नाही. > छान. तुम्ही स्वतः अपारंपरिक मार्ग निवडला त्याच कौतुक आहे.

> १. सगळ्यात आधी मुलगा नीट पारखून घे, वाहवत जाऊ नकोस.
२. तो नीट स्थिरस्थावर आहे ना, आई बाबा आहेत ना, कमावतो का हे चेक कर.
३. तुला दोन वेळच नीट खायला घालून तुझ्या सगळ्या हौस पूर्ण करेल का हे बघ. >
पण हे असलं ग्यान तर स्वतःला स्त्रीवादी समजणाऱ्या इथल्या काकूबाईपण देतातच की. तसलेच पारंपारीक ग्यान तुम्हीदेखील का देताय?
वकील आहात ना? विवाहविषयीचे कायदे काय आहेत ते सांगत जा मुलामुलींना. त्यातले किती तुम्हाला मान्य आहेत ते आधी चेक करून मगच लग्न करा म्हणावं.

आणि तुम्ही जे १-५ संगितलय ते सगळं असेल तरीही ६ महिन्याच्या आत घटस्फोट होऊ शकतो. sexually incompatible हे आजकाल मोठे कारण आहे लग्न मोडण्याच.
===

मूळ लेखाबद्दल,
आरक्षण, दलित विरोधी विचारांचा गट आहे का तुमचा?

< तुला दोन वेळच नीट खायला घालून तुझ्या सगळ्या हौस पूर्ण करेल का हे बघ.>

अजून जन्माला यायच्या किंवा अगदी सध्याच्या पिढीतल्या मुलीपण दोन वेळचं अन्न आणि हौशीमौजींसाठी नवर्‍यावर अवलंबून असणार आहेत? धन्य!

स्वतंत्र विचारांच्या बुरख्याखाली रामतीर्थकर बाई निघाल्या की!

१. जर हे असलं ज्ञान देण्याने मी काकूंबैं होत असेल, तर मी काकूबाईच बरी! नो प्रॉब्लेम!
२. सेकंड मी वकील आहे म्हणून वकिली ज्ञानच मुलांना द्यावं हे म्हणजे डॉक्टर असले तर मेडिकलचंच बोलावं मुलांशी. अपार्ट फ्रॉम माय प्रोफेशन, I have other views, and believe me, my personal life is way too different than my professional life. सो हे ज्ञान कुणाकडूनही घ्यायची मला गरज वाटत नाही, कारण मीच कुणाला ज्ञान वाटायला जाणार नाही. अर्थात इथे प्रत्येक धाग्यावर सो कोल्ड मॉडर्न युगाचे मॉडर्न मत मांडणारे लोक आहेत, प्रवचन देणारे आहेत,त्यात माझी भर कशाला.
३. Sexual incompatibility हम्मम्म! Any data? (आजपर्यंत तरी माझ्याकडे या कारणाने घटस्फोट मागणारी कोणतीही व्यक्तीची केस आलेली नाहीये.)
४. मी कुठल्याही विचारांच्या गटात नाही, कारण ना मला स्वतःवर शिक्के मारून घ्यायला आवडतं, ना कुणावर शिक्के मारायला. स्वतःच्या अनुभवाने जे समजत ते लिहिते, आणि तेच मांडते.
सो, I don't care!!!!
मूळ लेखाविषयी
इतक्या वर्षानी कुणालातरी माझ्या आयडीच उत्खनन करावंस वाटलं हे बघून आनंद झाला.
पण खरं सांगायला गेलं तर ही कथा माझी नव्हतीच. इथल्याच एका होतकरू आयडीने लिहिलेली कथा, त्याच्या विनंती वरून जशास तशी इथे पोस्ट केली.
बादवे तो आय डी आता बऱ्याच जबरदस्त कादंबऱ्या लिहितो, आणि लवकरच १०० चाहते पूर्ण करेल असा मला विश्वास वाटतो Lol
Submitted by महाश्वेता on 24 June, 2019 - 10:25
हा प्रतिसाद वाचला तरी कळून जाईल.

थँक्स फॉर द लेबल भरत, बट, I don't give a damn about that labels.
कोणतीही मुलगी असो, किंवा तिच्या जागी मी असो, मला एक स्टेबल पार्टनर हवाय.Physically, mentally and financially. नसत्या एखाद्या cultला भुलून, विनाकारण कुणाच्याही प्रेमात पडायची इचछा नाही.
आता ज्या वाक्यांनी तुम्ही मला रामतीर्थकर बै म्हणालात, त्याविषयी थोडं सांगते. 2018 मध्ये माझ्याकडे तीन केसेस अशा होत्या, ज्यात मुलीचं वय होतं १८ ते २१ च्या दरम्यान. शिक्षण पूर्ण नाही, हाताशी जॉब नाही, आणि पळून जाऊन लग्न केलेलं. नवऱ्या मुलाच्याही हातात काम नाही, यातून डोमेस्टिक व्हायलन्स आणि आता घटस्फोटासाठी केस टाकलेली.
नीट लाईफ जगण्यासाठी दोघांपैकी एक तरी कमावता हवा ना?
पण असा विचार करताना नेहमीचे कल्टीस्ट ट्रोल करू शकतील, हा विचारच लक्षात घेतला नव्हता.
चलो, लेट्स modify my reply.
तुम्ही एकमेकांना दोन वेळच नीट खायला घालून एकेमकांच्या हौसमौज पूर्ण करू शकत असाल ना? तर लग्न करा.
खुश?
आता तुमच्या वरच्या प्रतिसादावरून मात्र लेखिका मुलींना चूल मूल बाळ पुरुषांचं सेक्स मशीन वगैरे कशी ट्रीट करते, यावर मस्त मस्त प्रतिसाद येतील, लेखिका कशी आरक्षणविरोधी, जातीभेद मानणारी यावर प्रतिसाद येतील. नेहमीचे यशस्वी ट्रोलर्स उलथतील.
But good, I will enjoy it!

ओके. तुमचं म्हणणं त्या तशा केसेस बद्दल होतं, मला ते जनरल वाटलं.

मी त्या मुलींना सांगेत्न, तुम्ही दोघांनी आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याची तयारी करून मग लग्न करा.

या विषयावर मा यबोलीवर भरपूर चर्चा झालेली आहे. सैराटच्या निमित्तानेही आणि ऑनर किलिंगच्या घटना घडतात तेव्हाही. त्यामुळे ते मुद्दे इथे पुन्हा लिहू इच्छित नाही.

वरच्या कथेबद्दल - महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात गेल्या शतकाच्या सुरुवातीला गणपती महाराज नावाचे ए क सुधारक बाबा होऊन गेले. त्यांनी लोकांना इतर गोष्टींसोबतच जात त्यागायची शिकवण दिली. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. त्यांना बर्‍यापैकी संख्येने अनुयायीही लाभले.
पण सरकार दरबारी कागदपत्रांत जात लावणे अनिवार्य असल्याने त्यांची 'अजात' ही एक नवीनच जात तयार झाली.

त्यांच्या पुढच्या पिढ्यांसमोर जगण्याचे प्रश्न निर्माण झाले. आरक्षण, फी माफी शिवाय आपण मागे राहतो, असं त्यांच्या लक्षात आलं. त्यातले काही मग आपली पूर्वीची जात पुन्हा लावू लागले.

तेव्हा पोटाच्या प्रश्ना पुढे प्रेम, आदर्श हे सगळं टिकेलच असं नाही.

अवांतर

समोरच्यांचे प्रतिसाद कसे येतील, हे गृहीत धरून किंवा आलेल्या प्रतिसादांत नसलेले अर्थ शोधून, पूर्णपणे वस्तुनिष्ठ असलेल्या विधानांना व्यक्तिनिष्ठ ठरवून combative mode धारण करणार्‍यांचा एक कल्ट इथे (मायबोलीवर) तयार झालेला दिसतोय.

थँक यू सो मच भरत, माझा मुद्दा समजून घेतल्याबद्दल!
आणि चर्चा घडवण्यात खरंच आता मलाही इंटरेस्ट नाही. सहा एक वर्ष जुना धागा उगळण्यात आता काहीही अर्थ नाही.
अमरावती जिल्ह्यातील ही माहिती नवीनच कळली, धन्यवाद!!!

तेव्हा पोटाच्या प्रश्ना पुढे प्रेम, आदर्श हे सगळं टिकेलच असं नाही>>>
You said it!

अवांतर:

अनुभवाचे बोल, सो battle mode इज अल्वेज ऑन!
But I want to enjoy now. मेरी मर्जी Biggrin

१. सगळ्यात आधी मुलगा नीट पारखून घे, वाहवत जाऊ नकोस.
२. तो नीट स्थिरस्थावर आहे ना, आई बाबा आहेत ना, कमावतो का हे चेक कर.
३. तुला दोन वेळच नीट खायला घालून तुझ्या सगळ्या हौस पूर्ण करेल का हे बघ>>>>>

माझ्या मुलींना मी हाच सल्ला देते. त्या स्वतःचे पोट भरायला समर्थ आहेत, सध्या भरताहेत आणि उद्या तशीच परिस्थिती ओढवली तर रडत न बसता स्वबळावर मार्ग काढतीलच याची खात्री आहे. पण स्वतः समर्थ आहेत म्हणून त्यांनी प्रेमात पडून आळशी, ऎदी, एक वेळचेही जेवण देऊ शकणार नाही अशा मुलाशी लग्न करून नंतर त्याला आयुष्यभर पोसत बसणे म्हणजे मुर्खपणाची परमावधी. मी तर म्हणेन की प्रेम कुणावरही करा पण आयुष्य बांधून घ्यायची वेळ आलयावर मात्र डोळे उघडून विचार करा.

कथा क्लीशे असली तरी ठीक आहे. हे चित्रही पाहिलेले आहे.

यशस्वी आणि अयशस्वी ट्रोल लोकांची व्याख्या काय आहे? कृपया समजावून सांगाल काय? त्या दुसऱ्या होतकरू लेखकाला ही कथा पोस्टायचं धाडस होत नव्हतं काय?

दोन वेळचं जेवण कोणीतरी द्यावं (एक वेळचंवाले तर त्यापेक्षा अजून जास्त!) इतकी भिकारी प्रवृत्ती असणाऱ्यांनी फी सवलत घेणार्याबद्दल लेख लिहणं याला काय म्हणायच? यासाठी कोणतीतरी म्हण असेलच मराठीत...
असो. कल्टी.

अच्छा, स्वतःला हवा असणारा अर्थ काढायचा, आणि कल्टी मारायची. याला मराठीतही काहीतरी म्हण असेलच.
मी भरत याना दिलेला प्रतिसाद आणि साधना यांनी लिहिलेला प्रतिसाद पुन्हा वाच! डोकं कमी असणं प्रॉब्लेम नाहीये, आकलनक्षमता कमी असणंही प्रॉब्लेम नाहीये पण झापड लावून स्वतःला हवं असणारा अर्थ काढणं, स्वतःच्याच तयार केलेल्या प्रतिमेत डुंबत राहणं हा मात्र फार मोठा प्रॉब्लेम आहे!
आम्ही जातीभेद मानत नाही, मात्र जातिआधारीत आरक्षण, फिसवलतविषयी बोलूच नका, हे (भिकारी + सरडा + गिरे तो भी टांग उपर) प्रवृत्तीच उदाहरण नाही का?

यशस्वी आणि अयशस्वी ट्रोल लोकांची व्याख्या काय आहे? कृपया समजावून सांगाल काय?
>>>>>
नाही Lol हु आर यु?

बाळ डुआयडी आहेस बाळा, थोडा मोठा हो, आपोआप समजेल!

Pages