कॉसमॉस बीएमएम सारेगम २०१३ : प्रतिभा दामले ( रिचमंड ,व्हर्जिनिया ) यांच्याशी बातचीत

Submitted by अजय on 13 May, 2013 - 18:03

१. प्रतिभा ! तुम्ही मुळच्या कोणत्या गावाच्या आहात ?
माझा जन्म आणि त्यानंतरच सगळं बालपण मुंबई मध्येच गेलं त्यामुळे मी मुळची मुंबईची आहे असं म्हणता येईल . pratibha_damle.jpg

२. तुम्हाला संगीताची गोडी / आवड कशी आणि केव्हा लागली ?
मुळात माझ्या आई - वडिलांना संगीताची / गाण्याच्या मैफिली ऐकण्याची अतिशय आवड होती. माझ्या लहानपणी मला गाणं ऐकण्याची , गाणी म्हणायची आवड आहे हे त्यांच्या लक्षात आलं असावं . आणि त्यामुळं माझं संगीताचं प्राथमिक शिक्षण माझ्या वयाच्या ८ व्या वर्षी सुरु झालं.
विविध स्वरूपात ,विविध कार्यक्रमांमधून संगीत ऐकल्यामुळे माझी संगीताची आवड , गाण्याबद्दलची ओढ आणखीनच दृढ झाली. अनेक ठिकाणी नाट्यसंगीत , सुगम संगीत गाण्याची संधी मिळाली , रसिकांना ते आवडू लागले आणि माझे गाण्याबद्दलचे प्रेम वाढत गेले. मी माझ्या कॉलेजच्या आणि अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून , संगीत स्पर्धांमधून भाग घेऊ लागले.

३. संगीताचे शिक्षण तुम्ही किती वर्ष घेत आहात ? आणि कोणत्या प्रकारचे संगीत शिक्षण चालू आहे ?
मगाशी सांगितल्याप्रमाणे वयाच्या ८ व्या वर्षापासून मी गाणं शिकतेय . हिंदुस्तानी शास्त्रीय आणि नाट्यसंगीत याचा माझा अभ्यास आहे.

४. संगीतातील तुमचे गुरु कोण ?
तसं म्हटलं तर मला लहानपणापासून अनेक गुरुकंडून संगीत शिक्षणाचा लाभ मिळाला . साधारण ३ ते ४ वर्ष श्रीमती अर्चना कान्हेरे यांच्याकडून शास्त्रीय आणि नाट्यसंगीताचे धडे मी घेतले. आजही अनेकदा मला त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळते .
माझ्या संगीत शिक्षणात पुण्यातील डॉ . मंगला आपटे यांचही बरंच योगदान आहे .

५. तुमच्या संगीतातली विशेष कामगिरीबद्दल काय सांगशील ?
मराठी तील काव्य आणि गीते अशा स्वरूपाचा कार्यक्रम ज्यातील अनेक गीते ही कौशल इनामदार या ने संगीतबद्ध केली आहेत , या कार्यक्रमात मला गायची संधी मिळाली तसाच त्यांच्या एका अल्बम मध्ये ही गाण्याच भाग्य मला लाभलं अनेक मराठी प्रसिद्ध आणि " अमृताचा वसा " आणि "शुभ्र कळ्या मूठभर " या अल्बम साठी लोकप्रिय कवींची गीते गाण्याचा योग आला . जसे कि - पृथ्वीचे प्रेमगीत - कवी कुसूमाग्रज ,बाई या पावसाने - कवी अनिल,विलया जाग हे - कवी शांत शेळके.
६. तुम्हाला मिळालेल्या विशेष पुरस्कारांबद्दल थोडेसे …
१. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा - IIT Mood इंडिया कॅलिडोस्कोप
२.प्रथम पारितोषिक - दादर वनिता समाज, कोकण सेवा संग्राम
३. दादर माटुंगा कल्चरल स्कॉलरशिप

७. संगीताच्या या आवडीसाठी तुमचे काय विशेष प्रयत्न असतात ?
भरपूर प्रमाणात गाणे ऐकणे हा माझा आवडता कार्यक्रम . मी अजूनही अनेक शास्त्रीय , उपशास्त्रीय आणि नाट्यसंगीत मनमुराद ऐकते

८. तुमचे आवडते गायक / गायिका आणि आवडते गाणे कोणते ? कोणाचे संगीत ऐकायला तुला जास्त आवडते ?
माझ्या आवडत्या गायिका - श्रीमती माणिक वर्मा
माझे आवडते गाणे - हे सुरानो चंद्र व्हा -
पंडित जितेंद्र अभिषेकींचे संगीत मला अतिशय आवडते .

९. आपल्या बीएमएम सारेगम २०१३ च्या अंतिम स्पर्धेसाठी कशा पद्धतीची तयारी चालू आहे ?
माझ्या परीने माझ्याकडून सर्वोत्तम देण्याचा माझा प्रयत्न असेल आणि तेच माझे ध्येय आहे .

१० . संगीता खेरीज आपले अजून काय काय छंद किवा आवड आहे ?
मला माझ्या ३ वर्षाच्या मुलाबरोबर खूप फिरायला आवडते . मला तसेही भटकायला खूप आवडते . तसेच व्यवसायाने मी actuary अहे. त्यामुळे माझ्या विषयात अजून शिक्षण घ्यायला आणि त्यात काम करायला मला नक्कीच आवडते

११ . आपल्या बीएमएम सारेगम २०१३ च्या प्राथमिक आणि उपांत्य फेरीची तयारी तुम्ही कशी केलीत ?
सर्वात अवघड होते - गाण्यासाठी track शोधणे. माझे आवडते गाण्याचा track मिळण्याकरता मला खूप शोधा शोध करावी लगलि. आणि मला वाटते गाण्यापेक्षा तेच जास्त कठीण काम होते - :)
खालील लिंक्स वर तुम्ही मी गायलेली काही गाणी ऐकू शकाल .
१. हे सुरानो - http://www.youtube.com/watch?v=BnNmBC4s8iA
२. लपविलास तू हिरवा चाफा - http://www.youtube.com/watch?v=Cek0dbOkhew
३. हिंदी गझल - आज जाने कि - http://www.youtube.com/watch?v=UyYYsw5r9zA
४. विलय जग हे - http://www.reverbnation.com/kaushalsinamdar/song/13481359-vilaya-jag-he)

कृपया मला मत देण्यासाठी - http://www.bmm2013.org/culturalprograms/saregama.html

मुलाखत शब्दांकन : सरिता देशपांडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा प्रतिभाची मुलाखत! Happy

मी प्रत्यक्ष तिचं गाणं ऐकलेलं आहे .. फार सुंदर गाते! प्रतिभा तुला खूप शुभेच्छा! Happy

>>>> हे सुरानो चंद्र व्हा <<< माझेहि आवडते गाणे, शब्दान्च्या अर्थाव्यतिरिक्तही, त्या चालीत कसलीशी आर्तता/व्याकुळता जाणवत रहाते. (म्हणजे मी चूकही असेन, पण मला ते गाणे ऐकताना तसे वाटत रहाते)
स्पर्धेसाठी शुभेच्छा! Happy
मनसोक्त गा, स्वतःच्या मनासारखे गा, सूरसमाधीतील आनंदाकरता गा

Chan