खडकांचे आकार

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 May, 2013 - 15:15

आपण राहतो त्याच्या अवतीभवतीही निसर्गाने कितीतरी चमत्कार केलेले असतात फक्त ते आपण कलात्मक नजरेने पाहीले पाहीजे ह्याचा अनुभव मी काही दिवसांपूवी घेतला.

एक रवीवार कुठेतरी जाऊ करत आमच्याच समुद्रकिनारी जाऊ असे मिस्टरांनी ठरवीले. मी थोडी कंटाळलेच म्हटल काय ते नेहमी समुद्रकिनारी जायचे. नेहमी प्रमाणे आम्ही तिन जोडपी आमच्याच समुद्रकिनार्‍यावर त्या संध्याकाळी गेलो पण नेहमीच्या ठिकाणी न नेता त्यांनी पलीकडील बाजूस जिथे सहसा भरतीच्या भितीने कोणी जात नाही तिथे नेले. तेंव्हा ओहोटी नुकतीच लागली होती हे माहीत होते म्हणून बिनधास्त आम्ही गेलो आणि खरोखर अगदी लांब कुठेतरी फिरायला आलो असे मला वाटले. तो किनारा पूर्ण खडकांनी भरलेला होता. खडकांवर वर्षोनवर्षे पाणी आदळून प्रत्येक खडकाला वेगवेगळा आकार आला होता. संध्याकाळ होत आल्याने मी भराभर जमतील तेवढे खडकांचे फोटो काढून घेतले.

१) गणपती बाप्पा मोरया ने सुरुवात करुया.

२) मगर पहा कशी वळून पहातेय.

३) छोटे प्राणी एकमेकांच्या अंगावर मस्ती करत आहेत.

४) दगडी कलाकुसरीचे एखादे प्राचीन मंदीर.

५) डावीकडून पायर्‍या तयार झाल्यात का?

६) मालवाहू जहाज.

७) भर उन्हात एखाद्या नदीत प्राणी डुंबताहेत.

८)अबब हा कोणता मोठा प्राणी धाऊन येतोय?

९) किल्ला?

१०) सुचत का काही ?

११) हा कोणता किल्ला?

१२) जाळीदार आंबोळी Lol

१३) मला हलवून दाखवा म्हणतोय तो.

१४) खुप गार आणी शांत आहे.

१५) दगडाच्याच लाटा जणू.

१६) हा कसला सांगाडा?

१७) समुद्री हॅप्पी मॅन.

१८) ही एखादी लेणी वाटली मला.

१९) फुल

२०) कासव.

२१) गार्डनमध्ये असा देखावा मुद्दाम रचलेला असतो कधी कधी हा नैसर्गिक.

२२) भुत$$$$$$$$$$$$$$$$

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाहाहा.. मस्त गं जागु..
जुन्याला च नवीन दृष्टीनं पाहण्याची रसिकता आहे तुझ्यात Happy

मस्तच... आम्ही लहान्पणी असे ढगांचे आकार ओळखायचो.

बदामी, हंपीकडे गेलं की असे अजस्त्र खडक आणि त्यात अनेक गमतीशीर आकार दिसतात. तुला झब्बू देते इथे एक दोन दिवसांत.

मुंढेजी फारच सुंदर नक्षी टिपली आहात तुम्ही.
४था फोटो मधमाश्यांच पोळ
१-३ लोकरीच विणकाम

अविगा पिरवाडीच्या मागचा भाग आहे ग.

श्री थोड पुढे गेले असते तर मासे मिळाले असते. जाळ लावलेल होत Happy

वेका Happy
वर्षू, विद्या, चनस, भाऊ, संदीप्,जो-एस, इंद्रा धन्यवाद.
नंदीनी नक्की टाक फोटो.

शारजहा मध्ये फिरताना १ संग्रालय सापडले. त्याच्या भिंती या दगडापासुन उभारल्या आहेत. भाऊ नमसकर ही नजर माझ्या हिची (पांढरा पोषाख). दुरुन भिंतच दिसत होती, जवळ गेल्यावर हा नजारा दिसला. पुन्हा गेल्यावर प्रत्येकाचे वेगळे प्र.चि. काढतो. जागु धन्यवाद.

sea rocks at sharjah.jpg

व्वा! मस्त फोटो. (जागू, मुंढे) Happy
सौंदर्य टिपण्यासाठी नजर असावी लागते, ती अशी !! >>>>>>>>>>>>>>>>>.१००००० मोदक. Happy
मस्तच... आम्ही लहान्पणी असे ढगांचे आकार ओळखायचो>>>>>>>>>>>>>>.+१००००००००००० Happy

जागू, किशोर छान फोटो.
कुठुन इतका वेळ काढतेस ग जागू. लहान बच्चे, काम घर सगळे सांभाळुन. सो प्राउड ऑफ यु!

जागु, सुरेख! तुझे नाव वाचल्यावर मी खडकांचे आकार ऐवजी चुकुन खेकड्यांचे आकार वाचले! Wink मुंडेजी सुरेख प्रचि.