संपली स्पंदने, संपल्या वेदना!

Submitted by कर्दनकाळ on 3 May, 2013 - 15:08

संपली स्पंदने, संपल्या वेदना!
या मढ्याला कुठे कोणत्या भावना?

गाव मुर्दाड हे, शोधशी तू कुणा?
साद देशी कुणाला? कुठे चेतना?

साथ नाही कुणी, हात द्याया कुणी....
अन्यथा कैक माझ्याकडे योजना!

स्नेह, आपूलकी, मागुनी का मिळे?
या भिका-यांकडे का करू याचना?

तोच गोंधळ पुन्हा चौकडे सावळा!
ऐकतो आजही वांझ त्या वल्गना!!

मी व्रतस्थापरी जीव हा जाळतो!
भोगतो अन् चवीनेच या यातना!!

काम परमेश्वराचेच हातात या!
तोच कर्ता करवता.....मला कल्पना!!

केवढी दांडगाई, बढाई तुझी!
जाण, आहे कुणाशी तुझा सामना!!

देव देईल बुद्धी टवाळांस या!
रोज समजावतो मीच माझ्या मना!!

मायबोली बनो पारदर्शक पुन्हा!
हीच माझी तुला, ईश्वरा प्रार्थना!!

****************************कर्दनकाळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या गझलेचे वृत्त आहे........स्रग्विणी

लगावली: गालगा / गालगा/गालगा/गालगा

************इति कर्दनकाळ

लब्बाड लोक <<<<< Lol

वा रे वा !! ........ लब्बाड लोक म्हणे ! :रागः
वाचून प्रतिसाद देणारे नाही तर न आवडूनही आवडली असा प्रतिसाद न चुकता (मुद्दाम) देणारेच लब्बाड असतात खरंतर ........ Wink

Light 1



(अरविंदजी ....गम्मत करतोय बर्का Happy )

@ वैभवराव....

---खरे मनापासून सांगा-वाचून प्रतिसाद न देणारे लोक आहेत की नाहीत ?

नाही आवडली तरी स्पष्ट तसा प्रतिसाद देणारेही आहेतच ना !

राग मला येतच नाही...

नाही आवडली तरी स्पष्ट तसा प्रतिसाद देणारेही आहेतच ना !<<<<<<

होय अरविंदजी !! ,
पण ......

..... अशा लोकाना आपल्या चांगल्या हेतूने केलेल्या प्रतिसादाचा ककाकाकांवर काहीच परिणाम होत नसल्याचा साक्षात्कार झाला असल्याने ते प्रतिसाद देत नसावेत.......
असे खरे कारण असण्याची दाट शक्यता आहे !!

असो
तुम्हाला राग येत नाही हे मी ओळखलेच आहे सर ....तुम्ही ककाकाकांच्या लेखनावर अतीशय थंड प्रति़क्रिया नेहमीच देता त्यावरून Wink

तरीही पुन्हा एकदा विनवीतो आहे की ... माझ्या कोणत्याही म्हणण्याचा राग नसावा ...माझ्याप्रती व माझ्या गझलेतल्या विठ्ठलाप्रती लोभच असावा Happy

___________________--

'प्रीय' चालते तसे 'प्रती' ही चालते याची संबंधितांनी नोंद घ्यावी !!!!! Wink

अरविंदराव,
मी आंतरजालावर जे वाचतो, त्यावर प्रतिसाद देतो असतो. मात्र प्रा. देवपूरकरांच्या गझलेवर वाचूनही प्रतिसाद लिहायचे आजकाल टाळतो, हे खरे आहे.

तुमचा मान राखून या गझलेवर खालील प्रमाणे सविस्तर प्रतिसाद देत आहे.

*************************

संपली स्पंदने, संपल्या वेदना!
या मढ्याला कुठे कोणत्या भावना?
.............. आवडला.

गाव मुर्दाड हे, शोधशी तू कुणा?
साद देशी कुणाला? कुठे चेतना?
............ मीच एक चेतनेचा झरा आणि बाकीचे मुर्दाड, ही विचारधारा मला नाही आवडली.

साथ नाही कुणी, हात द्याया कुणी....
अन्यथा कैक माझ्याकडे योजना!

............. पुन्हा तेच. केवळ माझ्याच कडे योजना आहे, तुमच्याकडे अक्कल नसल्याने डोक्याने पैदल आहात. तुम्ही फक्त माझ्या योजना राबवा... ही सरकारी किंवा दिडशहाण्यांची विचारसरणी असते असे माझे मत आहे.

स्नेह, आपूलकी, मागुनी का मिळे?
या भिका-यांकडे का करू याचना?

स्नेह, आपूलकीच्या अनुशंगाने श्रीमंत दानशूर असतातच असे नाही किंवा बहुतेक नस्तातच. उलटपक्शी भिकारी,गरीब आणि मध्यमवर्गियाकडे स्नेह, आपूलकी जास्त असते.

तोच गोंधळ पुन्हा चौकडे सावळा!
ऐकतो आजही वांझ त्या वल्गना!!

.......... नाही समजला.

मी व्रतस्थापरी जीव हा जाळतो!
भोगतो अन् चवीनेच या यातना!!

........... पुन्हा मीपणा, अहंकार

काम परमेश्वराचेच हातात या!
तोच कर्ता करवता.....मला कल्पना!!

.............. तो परमेश्वर लब्बाड आहे. शिवाय त्याला नको तिथे घसिटणे चांगले नाही. आपले दुष्कृत्य त्याच्यावर ढकलणे हा धूर्तपणा आहे.

केवढी दांडगाई, बढाई तुझी!
जाण, आहे कुणाशी तुझा सामना!!

हा मात्र जाम आवडला. दिलखोलके सलाम...!!!!!!

देव देईल बुद्धी टवाळांस या!
रोज समजावतो मीच माझ्या मना!!

.............. देव टवाळास बुद्धी देईल आणि मग माझी टवाळी थांबेल, अशी मनाची समजूत घालत बसण्यापेक्षा आपल्या चूका शोधून त्या दुरुस्त करणे, हा आणि हाच सर्वोत्तम उपाय आहे. (टवाळी सुद्धा निष्कारण कुणी कुणाची करत नसते, हे समजून घेणे गरजेचे आहे)

मायबोली बनो पारदर्शक पुन्हा!
हीच माझी तुला, ईश्वरा प्रार्थना!!

............ "मायबोली आता पारदर्शक नाही का?" किंवा "मायबोली पारदर्शक केव्हा होती" याचा शोध घेतल्याबिगर भाष्य करणे शक्य नाही.

****************************