गाणी आणि गम्मत

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

माझ्या आठवणीतल्या दोन मजेशीर घटना ज्या दोन चांगल्या गाण्यांशी निगडीत आहेत.

प्रसंग एक -

ताई, ताई लली म्हणजे काय गं?
लली ... नाव असतं त्या कवितेत नाहीये का 'ललीने बोट लावलं... पिलूने बोट चावलं ' - इति मी
नाही गं ते नाही .. सीता वन वासा चा लली ........

प्रसंग दोन -

ऑफिसचं गेट टुगेदर

एक मध्यप्रदेशातला सहकारी पण होता मराठी बोलता व्यवस्थित येतं पण गाण्यातलं मराठी किंवा कविता असं नीट कळत नाही.

एका सरांनी छान मराठी गाणं म्हणलं "तोच चंद्रमा नभात"

गाणं झाल्यावर आमचा एमपीमधला कलिग म्हणला.

" गाणं छान म्हणलं तुम्ही पण ते चंद्र, मान, भात त्यांचं काय कनेक्शन आहे ते नाही कळलं."

विषय: 
प्रकार: