पाऊस आला ..... सरसर

Submitted by पुरंदरे शशांक on 6 May, 2013 - 02:32

पाऊस आला ..... सरसर

वार्‍याची ..... सळसळ
ढगांची .... धावपळ

वीजबाई .... सर्कन
चमकतात ..... लखकन

आकाशात .... काळे ढग
करतात ..... लगबग

आपटतात .... धडाधड
सुरु होते ..... रडारड

थेंब आले ..... टपटप
पाऊस पडतो .... रपरप

पाऊस आला ..... सरसर
भिजू चला ..... भरभर

नाचू मस्त ..... पटापट
गारा वेचू .... सटासट

गारा खाऊ ..... कडाकड
कोण म्हण्तं मला .... माकड ????

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.