घरगुती उपचाराने वजन कमी करणे

Submitted by मधुरीता on 13 April, 2013 - 09:46

आजिबाईंचा बटवा पुर्वापार चालत आलेले घरगुती उपाय आणि उपचार नक्कीच उपयोगी असले पाहिजेत.
व्यायामाला याची जोड असल्यास जाड लोकांना नक्कीच उपयोग होऊ शकतो.
मी असे ऐकले आहे की मेथीचे दाणे भरडुन त्याची पुड वजन कमी करण्यास त्याचा उपयोग होतो.
मध आणि लिंबु यांचा एकत्रित फायद्याविषयी तर बरेच ऐकले आहे.
असेच काही तुम्हाला माहीत आहे का?
Light 1

(मायबोलीवरचे वजन कमी करण्याचे इतर अनुभव
वजन कसे कमी केले - एक स्वानुभव !
खाऊन पिऊन वजन कमी करा !
दिक्षीत डाएट आणि अनुभव
-वेमा)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेथीचे दाणे भरडल्याने आपले वजन कमी होते? वा वा..उत्तम उपाय Wink
असेच अजुन काही उपायः
१. आपल्याला हवे ते खावे. फक्त तोंडाने म्हणावे की मी तर कमीच खातो/ते. म्हणजे आपोआप सायकॉलॉजीकली वजन कमी होते.
२. व्यायाम बियाम करायची गरज नाही. नुसतं घरी ट्रेडमिल आणायचं किंवा जिमचे पैसे भरायचे. मग काय दर आठवड्याला आपोआप किलोकिलोने वजन कमी! आहे का नाही सोप्पा उपाय?
३. आपल्याला ज्या साइझच्या जिन्स मध्ये फिट व्हावेसे वाटते, ती विकत घ्यायची. अन त्यात आपण एकदम हॉट दिसतोय अशी कल्पना कराय्ची. म्हणजे वजन कमी व्हायला सुरु होते. गेलाबाजार वेस्ट्(कंबर) तरी नक्कीच कमी होते.
४. आपल्याला ज्या हिरो/हिरोइनसारखे दिसावे वाटते त्या/तिचे पोस्टर्स घरात लावावे. अन त्या/तिच्या चेहर्‍यावर आपल्या चेहर्‍याचा फोटो चिकटवावा. म्हणजे आपणच तसे दिसु लागतो. वजन कमी करायची काय गरज?
Light 1
व्यायाम करायला नको, बॅलन्स्ड डाएट घ्यायला नको मग चालले सोप्या उपायानी वजन कमी करायला. झालं की सांगा Proud Light 1

@ नताशा.. सल्ले आवडले.. आज पासून माझा साइज झिरो... वाह वाह.. वाचायला पण कसले सही वटते आहे!

जेवणा पुर्वी आर्धा तास फळे खावित किवा २ ग्लास पाणी प्यावे.
जेवण झाल्यावर शतपावली घालावी... निदान दशपावली तरी...

व्यायाम करायला नको, बॅलन्स्ड डाएट घ्यायला नको मग चालले सोप्या उपायानी वजन कमी करायला. झालं की सांगा
<<
"वजन कमी करण्यासाठी काय खावे?" असा एक धागा होता का पूर्वी माबोवर?

नताशा, ईब्लिस तुमच्या सल्ल्याबद्द्ल आभार. पण मी आधीच स्पष्ट केले आहे की व्यायामासोबत जोड म्हणुन घरगुति उपचार हवे आहेत. आणि आधिच्या धाग्यांमध्ये आहाराबद्द्ल सांगीतले आहे. इथे औषधांबद्द्ल/ औषधी काढे किंवा घरगुती उपायांबद्द्ल बोलायचे आहे.

त्रिफ़ळा काढा- सकाळी अंशपोटी घ्यायचा.
१ चमचा त्रिफ़ळा चूर्ण रात्री १ ग्लास पाण्यात भिजत घालायचे. सकाळी ते उकळवून निम्मे होइ पर्यन्त आटवायचे, नंतर गाळून त्यात १ चमचा मध ( जुना ) घालून गरम गरम प्यायचे. त्यानंतर १५-२० मिनीटे तरी काही घेऊ नये. खूप कडू असेल तरी खूप उपयोगी पण आहे.
बरोबर व्यायाम चालू असेल तर भराभर वजन कमी होते, हा स्वानुभव.
अजून जसे आठवतील आणि वेळ मिळेल, तसे उपाय सूचविनच.

घरगुती कमी खरचाच नव्हे तर सेव्हींग करणारा उपाय सांगु?

सगळ्या कामांची बाई काढुन टाका म्हणजे व्यायाम होईल. आणि तोंडाचा तेव्हडा व्यायाम कमी करा Light 1

आम्ही मात्र डाय फॉर ईटींग वाले Sad

मुग्धा तु खरंच खुप छान उपाय सांगीतला आहेस. आणि तो स्वानुभवातुन आला आहे हे तर आणखीनच छान!!!
आपले वाचक तो उपाय नक्कि करून पाहतील.
बरे, दालचीनीची पुड दररोज जेवणाबरोबर चिमुटभर खाल्ल्याने कॉलेस्ट्रोल कमी होते याबद्द्ल कोणाला अधिक माहिती आहे का?

दालचीनीची पुड दररोज जेवणाबरोबर चिमुटभर खाल्ल्याने कॉलेस्ट्रोल कमी होते याबद्द्ल कोणाला अधिक माहिती आहे का?
>>>>>>>>>>>>>>> हे खरं आहे....दाल्चिनी पूड गरम पाण्यातुन घेतल्याने पण वजन कमी होते असं वाचलय...

दालचीनीची पुड दररोज जेवणाबरोबर चिमुटभर खाल्ल्याने कॉलेस्ट्रोल कमी होते याबद्द्ल कोणाला अधिक माहिती आहे का?
>>>>>>>>>>>>>>> हे खरं आहे....दाल्चिनी पूड गरम पाण्यातुन घेतल्याने पण वजन कमी होते असं वाचलय...>>>>>>>>>>>>>

कृपया असं काही करु नका, दालचिनी खूप उष्ण आहे, दालचिनी पूड घ्यायची एक पद्धत आहे.
२ ग्रॅम दालचिनी पूड अर्धा कप कोर्‍या चहात (बिनसाखरेचा) उकळवायची आणि त्यात १ छोटा चमचा जुना मध घालून ते घ्यायचे हे फ़क्त आठवड्यातून २ वेळा घ्यायचे.
२ ग्रॅम दालचिनी पूड म्हणजे साधारण तांदळ्याच्या दाण्यापेक्षा थोडी जास्त.
ह्यामूळे हॉर्मोनल इमबॅलन्स सुद्धा कमी होतो.

अजून काही टीप्स-
१. जेवण, झोप या वेळा नियमीत ठेवा.
२. जे काही खालं ते चावून-चावून आणि सावकाश खा.
यामुळे वेळेवर पोट भरल्याची जाणीव होते आणि अतिरीक्त खाणे टाळता येते.
३. दोन्ही जेवणाच्या आधी काकडी- टॉमेटो खूप चावून चावून खा.
४. ताक व दही जेवणात अवश्य घ्या.
५. जे आवडत ते योग्य प्रमाणात खा फ़क्त आपण जे खातोय ते नीट पचतयं का? आणि तेवढ्या प्रमाणात रोज चरबी बर्न होतेय का? या कडे लक्ष ठेवा.
६. दोन खाण्या-दरम्यान ३ तासांपेक्षा कमी किंवा ६ तासांपेक्षा जास्त अंतर ठेवू नका.

यातील बर्‍याचश्या गोष्टी माहिती असतील तरी मी जे फॉलो करते ते सांगितलं आहे.

मुग्धा, धन्यवाद
तु खुपच छान माहिती दिली आहेस. इंटरनेटवर बर्‍याच ठिकाणी दालचिनी खावी असे लिहिले आहे पण त्याचे योग्य प्रमाण दिलेले नाही. त्यामुळे उष्णता वाढते हेही mention केलेले नाही. चुकीच्या माहितीने side effect होण्यापेक्षा योग्य पध्द्तीने आणि योग्य प्रमाणात औषधी घेणे कधिही चांगलेच.

तु असेही लिहिले आहेस की जेवणाअगोदर काकडी वगैरे खावी. या आणि इतर टिप्स तु आमच्यासोबत share केल्या आहेस आणि त्या नियमीत पाळतेस असेही लिहीले आहेस. पण त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते की कमी केलेले वजन maintain करण्यास मदत होते? प्लिज तुझा अनुभव सांग.

दोन्ही जेवणाच्या आधी काकडी- टॉमेटो खूप चावून चावून खा.>> यामुळे पोट भरल्यासारखे वाटेल आणि जेवण कमी जाईल Happy

घरगुती उपचारांनी वजन कमी होऊ शकेल का याबद्द्ल मी साशंक आहे. योग्य आहार आणि नियमित व्यायाम हीच वजन नियंत्रणात ठेवण्याची गुरुकिल्ली आहे.

हे सगळे उपाय करताना बरोबरीने व्यायाम केलाच पाहिजे, पण या उपायांमुळे, वजन लवकर कमी करण्यात मदत होते हे नक्की.
हे सगळे उपाय आणि रोज १ तास व्यायाम मी रोज करत होते आता हे बर्‍यापैकी पाळते, पण व्यायाम अर्धा तासचं होतो.

माझे वजन १ दीड वर्षापुर्वी साधारण ७०-७१ किलो होते, खाणे- पिणे खुप नसले तरी चवीने होते.
लग्न ठरल्यावर जरा मनावर घेतले आणि आता ५८ किलो वजन आहे उंची ५'४' आहे.