नाटकी बोलतात साले!

Submitted by अभय आर्वीकर on 25 April, 2013 - 02:05

नाटकी बोलतात साले!

कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे

भुकेचा प्रश्न सुटणारा नाही, तुझ्या भाषणाने, पण;
तू वाचाळ नाहीस अशी, खात्री तर पटली पाहिजे!

राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर
तुझी शक्ती मनगटात तू, पूर्ण एकवटली पाहिजे

रावणांच्या राज्यात पुन्हा, सीता एकाकी पडलीय
भूमीच्या मुक्तीसाठी, तुझी काया झटली पाहिजे

देच तुतारी फुंकून तू, इथेच, याच स्थळी, अशी की;
क्रिया येथे आणि प्रतिक्रिया, दिल्लीत उमटली पाहिजे

मामला तीन पद भूमीचा, तुझ्या सिंगावर घेच तू
त्या बटू वामनाची सत्ता, "अभय" पालटली पाहिजे

                                                    - गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------
बटू वामन - शेतकर्‍यांना आत्महत्तेस बाध्य करून पाताळात गाडणारे सर्व सत्ताधारी म्हणजे बटू वामनाचेच वारस होय.
बटू वामन हा हिंदूचा देव आणि त्यावरच मी फक्त टीका केली आहे असे समजून हिंदूव्देष्ट्यांनी निष्कारण हुरळून जाऊ नये. कारण सर्वच धर्मांनी शेतकर्‍याला पाताळात गाडण्यासाठी कुठलीही कसर बाकी ठेवलेली नाही, यावर माझा प्रगाढ विश्वास आहे. एका शेरात सर्वच धर्माच्या प्रेषितांचा उद्धार करणे मला शक्य नसल्याने अपरिहार्यतेपोटी मी ’दुधाची तहान ताकावर’ या न्यायाने केवळ वामनाचाच उल्लेख करू शकलो, याची मला जाणीव आहे.

तसा मी आस्तिक, बर्‍यापैकी धार्मिक आणि देवपूजकही आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भुकेचा प्रश्न सुटणारा नाही, तुझ्या भाषणाने, पण;
तू वाचाळ नाहीस अशी, खात्री तर पटली पाहिजे!

वास्तव प्रभावीपणे आले आहे.

देच तुतारी फुंकून तू, इथेच, याच स्थळी, अशी की;
क्रिया येथे आणि प्रतिक्रिया, दिल्लीत उमटली पाहिजे>>>>
क्या बात!!
खरोखर तळमळ उमटली आहे गझलेत....

किरणजी, समीरजी, वैभवजी, उल्हासजी, अरविंदजी, सुशांतजी, टूनटुनजी

हौसला अफजाई के लिए तहे दिलसे शुक्रिया. Happy

कवितेतला अंएकद, विखार ........जबरी !!
तुमच्या कविता नेहेमीच समाजावर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडणार्‍या, पोटतिडीकीने लिहिलेल्या असतात.

तिलकधारी आला आहे.

गझल म्हणण्यासारखे यात काहीच नसल्यामुळे तिलकधारी निघत आहे.

तिलकधारी,

ही गझल आहे काय?

हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए
इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए

आज यह दीवार परदों की तरह हिलने लगी
शर्त लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए

हर सड़क पर, हर गली में, हर नगर, हर गांव में
हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए

सिर्फ़ हंगामा खड़ा करना मेरा मक़सद नहीं
मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए

मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही
हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए

<<गझल म्हणण्यासारखे यात काहीच नसल्यामुळे तिलकधारी निघत आहे.>>

हा प्रतिसाद मला खोचक आणि "खुटीउपाड" वर्गवारीतील वाटत आहे.

मुटे,

दुष्यंतकुमारांची गझल ही आपल्या गझलेची प्रेरणा आहे काय?

असल्यास, दुष्यंतकुमारांचा प्रत्येक शेर पुन्हा वाचावात अशी विनंती. कुठल्याही एका विशिष्ट सामाजिक बाबीला धरून केलेले भाष्य नाही ते...

अर्थात हे माझ्या अल्पमतीनुसार माझे वैयक्तिक मत आहे.

आपल्या विचारपूर्ण चर्चेचे स्वागतच आहे.

<<< दुष्यंतकुमारांची गझल ही आपल्या गझलेची प्रेरणा आहे काय? >>>

नाही. मी कुण्या एकाचा कधीच प्रभाव स्विकारत नाही.

मात्र माझ्या शेकडो प्रेरणास्त्रोतापैकी ही गझल एक असू शकते.

मला माझी गझल लिहायचीय. इतरांची नाही.

(अगदी स्पष्टच सांगायचे तर - माझ्या गजलेचे भविष्य मी ठरविणार. माझ्या गजलेला माझं भविष्य ठरवू देणार नाही. गझल माझ्यासाठी आहे, मी गझलेसाठी नाही.)

गझल माझ्यासाठी आहे, मी गझलेसाठी नाही.<<<

कलाकाराने कधीही घेऊ नये अशी भूमिका आहे ही. क्षमस्व!

मुटे,

मी सांगतोय काय? तुम्ही बोलताय काय? Angry

प्रत्येक ठिकाणी शेतकरी मेळाव्यातली भाषणांची भाषा ठोकण्यात काय मतलब आहे? तुम्हाला चर्चा करायची नसेल तर माझी जबरदस्ती नाही. उगाच मला भूमिका बिमिका सांगत नका बसू.....

<<<< कलाकाराने कधीही घेऊ नये अशी भूमिका आहे ही. >>>>

शतप्रतिशत मान्य.

पण मी घेतलेली भुमिका ही व्यक्तिगत स्वरूपाची माझ्यापुरती मर्यादित आहे. मी अंगिकारलेल्या भूमिकेने इतरांचे नव्हे तर माझ्यातील कलाकाराचे नुकसान होणार आहे, हे तुम्ही समजू शकता.

मी स्विकारलेली भूमिका ही निव्वळ भूमिका नसून माझी जीवनशैली झालेली आहे. ही भूमिका मी अजाणतेपणाने नव्हे तर विचारपूर्वक स्विकारलेली आहे. त्याचे प्रचंड दुष्परिणाम माझ्यातील कलाकाराला भोगावे लागेल, याची मला जाणिव आहे.

<<<< प्रत्येक ठिकाणी शेतकरी मेळाव्यातली भाषणांची भाषा ठोकण्यात काय मतलब आहे? >>>>

अरेव्वा. माझी भाषा सर्वत्र सारखीच असते म्हणायची. करणी आणि कथणीमध्ये फरक येत नसावा. मी माझ्या कर्तव्यनिष्ठेशी प्रामाणिक आहे, याचे प्रमाणपत्र दिलेय राव तुम्ही. धन्यवाद. Happy