Submitted by बागेश्री on 20 April, 2013 - 03:25
तुझ्या माझ्या आठवणींजवळ,
तूही रेंगाळून पहा ना....
भिंतींवरच्या पापुद्र्यांवर,
हात फिरवून पहा ना...
नव्हतंच का कधी काही
तू ही जपून ठेवावंसं,
जपलं असशीलच काही, तर
हलकेच उकलून पहा ना....
उष्ण उसासे, निसटलेले
त्वचेसारखेच मनाला, स्पर्शूनसे गेलेले
क्षणांचीच उब ती
आत जाणवून पहा ना..
हातांची हातांना घट्ट मिठी,
स्पर्शांचे स्पर्शाला होकार अन् नकार
थांबून जरा आज,
ती भाषा पडताळून पहा ना...
डोळ्यांच्या बाहूल्या,
पापण्यांचं लवणं,
कुठलीशी भावना
जपतच हसणं..
तुझ्या मनातलं हे बिंब
पुन्हा डोळ्यांत पहा ना...
तुझ्या माझ्या आठवणींजवळ,
तूही रेंगाळून पहा ना....
-बागेश्री
ब्लॉग: वेणूसाहित्य venusahitya.blogspot.in
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ठिक ठिक वाटली मला..... फारशी
ठिक ठिक वाटली मला.....
फारशी नाही आवडली...
"बागेश्री" नावाकडुन जरा जास्तच अपेक्षा आहेत
रियाशी सहमत आहे, पण तरीही
रियाशी सहमत आहे, पण तरीही कविता आवडली. आर्तता, ओढ, तुटलेपणाची जाणीव इत्यादी भावना सकसपणे आल्या आहेत असे वाटले. धन्यवाद.
तुझ्या माझ्या आठवणींजवळ,
तुझ्या माझ्या आठवणींजवळ,
तूही रेंगाळून पहा ना....
भिंतींवरच्या पापुद्र्यांवर,
हात फिरवून पहा ना...
हे जास्त आवडलं..
खूपच भावभीनी कविता.. बागु,
खूपच भावभीनी कविता.. बागु, बहुत अच्छे!!!
पात्र बदलते विषय तोच राहतो पण
पात्र बदलते विषय तोच राहतो
पण तरीही कवितेला चांगली म्हणावेसे वाटते !
आवडेश
आवडेश
उष्ण उसासे,
उष्ण उसासे, निसटलेले
त्वचेसारखेच मनाला, स्पर्शूनसे गेलेले
क्षणांचीच उब ती
आत जाणवून पहा ना..
सुरेख
मला आवडली.
आवडली. छान!
आवडली. छान!
चांगली आहे कविता. "नव्हतंच का
चांगली आहे कविता.
"नव्हतंच का कधी काही
तू ही जपून ठेवावंसं,
जपलं असशीलच काही, तर
हलकेच उकलून पहा ना...." >>> हे सर्वात आवडलं.
रियाशी सहमत तुमच्या कवितेत
रियाशी सहमत
तुमच्या कवितेत तोच तोच पणा येऊ लागलाय
अर्थात हे वैयक्तिक मत
गैरसमज नसावा
कविता आवडली.
कविता आवडली.
चांगल्या कवितेचे सारेच गुण
चांगल्या कवितेचे सारेच गुण यात आहेत .आवडली .
आभारी आहे...
आभारी आहे...
एका विशिष्ट लयीत कुणीतरी
एका विशिष्ट लयीत कुणीतरी गप्पा माराव्यात तशी वाटली कविता.
अतिसुंदर आहे
अतिसुंदर आहे
अतिशय सुंदर.......
अतिशय सुंदर.......
प्रामाणिक वाटली कविता.
प्रामाणिक वाटली कविता.
संयत, मोहक आणि विरही
संयत, मोहक आणि विरही आर्जव...
आवडली
hmmmm
hmmmm
मंडळ आभारी आहे
मंडळ आभारी आहे
(No subject)
छान आहे.... आवडली....
छान आहे.... आवडली....
आवडली
आवडली
कविता खूपच सरळ सोट आणी छान
कविता खूपच सरळ सोट आणी छान आहे,
पण जसे सर्वजण अपेक्षिताहेत, तशी आणखीन एकदा, एक आणखीन . . . . .
कविता लिहुन पहाना . . . . : )
खूप छान.
खूप छान.
खूप खूप सुन्दर........... खूप
खूप खूप सुन्दर........... खूप भावली............
धन्यवाद, दोस्तहो...
धन्यवाद, दोस्तहो...
बरी वाटली !! फिरवून पहा ना
बरी वाटली !!
फिरवून पहा ना .....जाणवून पहा ना...... उकलून पहा ना ....यात गझलेसारखी मजा आहे