दर वर्षी भारतात येणं होतं, पण ह्या वर्षी मार्च-एप्रिल मध्ये घरी जाण्याचा योग आला. कोकणांत ह्या दिवसांत म्हणजे नुसती धम्माल. ह्या वेळी बाहेर खूप फिरणं नाही झालं, बहुतेक वेळ घरीच गेला. त्यातूनही घरी आणि आजूबाजूला काढलेली काही छायाचित्रं टाकत आहे.
1. ओले काजूगर म्हणजे जीव की प्राण. काजू सोलताना अंगठ्याची नखं चिकानं(डिंकानं) थोडी खराब करायची तयारी असेल की झालं तर. बसल्या जागी किती खाल्ले ह्याचा हिशोबाच लागत नाही. आणि उन्हाळ्यात काजू उसळीची मेजवानी असतेच.
2. रविवार स्पेशल - मटण वडे
3. बागेतील कल्पवृक्ष
4. फळांनी भरलेले हापूस आंब्याचे झाड
सुटलं ना तोंडाला पाणी?
झाडाच्या इथे असताना समोरच एक कैरी पडली, मग काय लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या, त्यावेळी मीठ तिखट मिळालं तर मिळालं नाहीतर हाण तशीच.. आता मात्र मस्तपैकी कापून, तिखट मीठ लावून आस्वाद घेतला.
नारळ.
मार्च अखेर असल्यानी आंब्याची आवक कमी होती खरी पण जे काही मिळालं त्यात तृप्त झालो.
अननस
वर म्हटलेली "काजूची उसळ"
फणसाची (कुयरी) भाजी तितकी आवडत नसल्याने फणस झाडावरच होते..
शिंपल्या आणि भाकरी.. काही लिहायला शब्द नाहीत.
रत्नागिरीला गेलो आणि सुरमई नाही, कसं शक्य आहे? ताज्या सुरमईची कापं
सुरमई थाळी तयार
ऑल टाईम फेव्हरीट - बांगडा
फ्रीजमध्ये एक कणस मिळालं. गच्चीच्या कोप-यात कोळश्याचं पोतं होतंच. मग काय.. लागलो कामाला. कोळशे पेटवून त्यावर कणस भाजायला चांगला अर्धा तास श्रम घेतले. एक/दोनदा बोटाला चटकाही बसला पण तिखट मीठ आणि लिंबू लावलेल्या कोळश्यावर भाजलेल्या कणसाचे ४ दाणे तोंडात जाताच श्रमपरिहार झाला
थोडफार फिरणं पण झालं.
रत्नागिरीपासून ३० किमी अंतरावर असलेल्या गावखडी बीच वर जाणं झालं.
ऐन भरतीची वेळ मिळाली.
तिथेच हे महाशय.. एकटा जीव सदाशिव
तसाच पुढे २० किमी वर आडीवरे ला चक्कर मारली. तेथील प्रचि
इतक्या वर्षांत पहिल्यांदा गुरांना बीच वर फिरवताना पाहिलं
रत्नागिरी-गणपतीपुळे कोस्टल हायवे वर लागणारा आरे-वारे बीचची प्रचि
मार्च महिन्यातही सकाळी थोडी थंडी होती. एका पहाटे मुंबई-गोवा महामार्गावर धुकं होतं..
रत्नागिरीतील भगवती किल्ला
रत्नागिरीहून अक्कलकोट ला जाणं झालं..
सोलापूर रस्त्यावर ऊसाच्या रसाच्या ब-याच टपरी दिसतात. ४२ टेंप्रेचर मध्ये गाडीतून उतरायची हिम्मत होत नव्हती, तरी एके ठिकाणी थांबलो. रस विक्रेत्याकडून कळालं की तिथं मागील ३ वर्षं पाऊस नाही पडला. तरी येणा-या जाणा-यांसाठी विक्रेत्याने पाण्याचे माठ ठेवले होते. त्याला दिलसे सलाम!! त्या गरम्यात नुसत्या माठाकडे पाहिले तरी थोडा थंडावा मिळाला.
घाटमाथ्यावरून कोकणातला सूर्यास्त..
मस्तच. कोकणात पळावे असे
मस्तच. कोकणात पळावे असे वाटतेय हा धागा वाचून्/पाहून. शिंपले, सुरमई, बांगडे, मटण-वडे जबरदस्त. कोस्टल हायवेचा फोटोही एकदम छान.
झकास...अप्रतिम!!
झकास...अप्रतिम!!
क्या बात है!!!! निव्वळ
क्या बात है!!!! निव्वळ अप्रतिम!!!!
मस्तच.
माबोच्या मुख्यपृष्ठावर झळकण्याइतके सुरेख प्रचि
आई ग्ग! मेले एकदम. अहाहा
आई ग्ग! मेले एकदम. अहाहा जेवणाची ताटं बघून हळहळले. कधी मिळणार असे हे खायला.
सुरमय एकदम खल्लास!! ओले काजूगर... (मी चालले आहेच पुढच्या महिन्यात, तेव्हा मिळेलच हि अशा).
कोकणात मार्च ते मे (खास ह्या महिन्यात) मध्ये मस्त मेनु बनतात घरोघरी...
मस्त!
मस्त!
वाह वाह .....आम्ची पन कोकण
वाह वाह .....आम्ची पन कोकण सहल झाळी इथे बसुन .....मस्त मस्त वाटल......
वा काय मस्त फोटो आलेत!
वा काय मस्त फोटो आलेत! कैरी,आंबा,फणस,सुरमयी,बांगडा.....तोंपासु अगदी. खरच तुम्ही कोकणवासी किती भाग्यवान आहात.
व्वाव ! मस्त फोटोज !
व्वाव ! मस्त फोटोज !
अप्रतीम फोटो.
अप्रतीम फोटो.
वा मस्त, आम्हालाही सफर
वा मस्त, आम्हालाही सफर घडवलीत...
अत्यंत सुखद फोटो आहेत यंदा
अत्यंत सुखद फोटो आहेत

यंदा कोकणवारी करायचं मागच्या वर्षीच ठरवलय, या प्रचिंमुळे जायची घाई झाली मात्र...
मस्तच..
मस्तच..
अप्रतिम सुन्दर
अप्रतिम सुन्दर
अतिशय सुरेख प्रकाशचित्रं.
अतिशय सुरेख प्रकाशचित्रं. मस्त कोकण सफर घडली यांच्या माध्यमातून.
सगळेच फोटो अप्रतिम आहेत.
सगळेच फोटो अप्रतिम आहेत.
सुंदर.
सुंदर.
अ मे झिं ग!! ऑसम!!! कोकणातला
अ मे झिं ग!! ऑसम!!!
कोकणातला मेवा झाडावरचा आणी समुद्रातलाही.......... जोडीला अपार सुंदर निसर्ग, समुद्र, सूर्य.. लाजवाब!!!
सुपर्ब
सुपर्ब
सगळेच फोटो अप्रतिम. फोटो क्र.
सगळेच फोटो अप्रतिम.
फोटो क्र. २. हा फोटो नं वन आहे. खल्लास. कातील. तोंपासु.
मस्तच. कोकणात पळावे असे
मस्तच. कोकणात पळावे असे वाटतेय>>+११११ ( हो आत्ता जानारच आहे मे मध्ये )
व्वा! आंबे, फणस, काजू,
व्वा! आंबे, फणस, काजू, समूद्र, सूर्य, धुकं, कणिस, मस्त फोटो.

काजूगर,आणि काजूगरांची ऊसळ. या फोटोंचा निषेध. (मला जळवल्याबद्दल)
सुंदर प्रचि..
सुंदर प्रचि..
लै भारी .. कैरी तर खासच
लै भारी .. कैरी तर खासच
मस्तच ... कोकणात फेरफ़टका
मस्तच ... कोकणात फेरफ़टका मारल्यासारख़े वाटले..
मस्त फोटो...
मस्त फोटो...
डोपाफि... अगदी तोंपासू...
डोपाफि...
अगदी तोंपासू... सगळेच प्रचि १ नं. आहेत.
ते मासे एकदम तोंपासु आहेत.
ते मासे एकदम तोंपासु आहेत.
अप्रतिम.......
अप्रतिम.......
धन्यवाद मंडळी!
धन्यवाद मंडळी!
सगळेच प्रचि सॉलिड आहेत. घरची
सगळेच प्रचि सॉलिड आहेत. घरची आठवण आली.
रत्नागिरीला पुढच्या महिन्यात तरी जायला मिळेल अशी आशा
Pages