Submitted by सुशांत खुरसाले on 19 April, 2013 - 01:51
का मना भुललास पाहुन त्या कळीचा चेहरा?
निर्दयी प्रत्येक आहे या जगीचा चेहरा !
पाहुनी बहरास सारे मुग्ध व्हाया लागती
पण बरे विसरून जाती पालवीचा चेहरा..?
चेहरे घेऊन आता शब्दसुद्धा नांदती
सभ्यतेचा एक अन् दुसरा शिवीचा चेहरा!
तोच आहे घोष आणिक पालखीही तीच पण
राहिला नाही विठू त्या पालखीचा चेहरा!
देश हा आहे असा की शांतता नाकारतो
फक्त ठरतो पूज्य येथे यादवीचा चेहरा..!
नेमका आहे कसा तो सांग मज आतातरी
रोज जो अंधार करतो त्या रवीचा चेहरा..
रे 'सुशांता' व्यक्त व्हाया लाख तुजला चेहरे
पण तुला का पाहिजे आहे कवीचा चेहरा?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उत्तम निभावलीत जमीन काफिये
उत्तम निभावलीत जमीन काफिये चपखल आले आहेत रदीफही मस्त आलीये प्रत्येक जागी
मला खूप आवडले सर्वच शेर
धन्यवाद वैभवजी!
धन्यवाद वैभवजी!
अभिनंदन सुशांतजी! सुंदर
अभिनंदन सुशांतजी! सुंदर गझल!
पाहुनी बहरास सारे मुग्ध व्हाया लागती
पण बरे विसरून जाती पालवीचा चेहरा..?
चेहरे घेऊन आता शब्दसुद्धा नांदती
सभ्यतेचा एक अन् दुसरा शिवीचा चेहरा!
तोच आहे घोष आणिक पालखीही तीच पण
राहिला नाही विठू त्या पालखीचा चेहरा!
देश हा आहे असा की शांतता नाकारतो
फक्त ठरतो पूज्य येथे यादवीचा चेहरा..!
नेमका आहे कसा तो सांग मज आतातरी
रोज जो अंधार करतो त्या रवीचा चेहरा..
रे 'सुशांता' व्यक्त व्हाया लाख तुजला चेहरे
पण तुला का पाहिजे आहे कवीचा चेहरा?
अप्रतिम, कामयाब व सुंदर शेर!
अभिनंदन सुशांत!
मतला थोडा बदलायला हवा.............
एक मतला आम्हास सुचला पहा कसा वाटतो ते............हा तुमच्या मतल्याला पर्यायी शेर नव्हे!
का मना भुललास बघुनी भोवतीचा चेहरा?
निर्दयी, निष्ठूर असतो, वळचणीचा चेहरा!..........इति कर्दनकाळ!
तुमच्या गझललेखनास कर्दनकाळाच्या हार्दिक शुभेच्छा! जोमाने व असेच चव घेत घेत लिहा!
************कर्दनकाळ
मनापासून आभार
मनापासून आभार कर्दनकाळजी!
मतल्याबाबत तुमचा उला मिसरा चांगला वाटतोय..
बघतो अजून काही सुचतेय का....
धन्यवाद सुशांतजी, समंजस
धन्यवाद सुशांतजी, समंजस प्रतिसादाबद्दल!
छान आहे!
छान आहे!
प्रॉमिसिंग
प्रॉमिसिंग
तोच आहे घोष आणिक पालखीही तीच
तोच आहे घोष आणिक पालखीही तीच पण
राहिला नाही विठू त्या पालखीचा चेहरा!
मस्त शेर.
शामजी ,विजयजी, समीरजी आभार!
शामजी ,विजयजी, समीरजी आभार!
अपेक्षा वाढवणारी रचना.ले.शु.
अपेक्षा वाढवणारी रचना.ले.शु.
सुंदरच....!
सुंदरच....!
आपणही 'विठू'च्या मागे लागलात
आपणही 'विठू'च्या मागे लागलात वाटते...!
सुरेख!
सुरेख!
आपणही विठ्ठलाच्या मागे लागलात
आपणही विठ्ठलाच्या मागे लागलात वाटते...>>>नाही हो विठूनेच आम्हाला लळा लावलाय..एखादा दुसरा शेर सुचला तर लिहितो त्याच्यावरचा..
बेफिजींचा तो सुंदर शेर वाचलात का?
भाबडा ओवीतुनी रांगायचा
झिंगतो गझलेमधे विठ्ठल अता
सर्वांचे आभार!
देश हा आहे असा की शांतता
देश हा आहे असा की शांतता नाकारतो
फक्त ठरतो पुज्य येथे यादवीचा चेहरा..!
<<
तुम्हाला पूज्य अभिप्रेत आहे का?
कवितेत शुद्धलेखनाच्या सवलती घेतात वगैरे ऐकून आहे, पण इथे पहिला उकार केल्यावर अर्थच बदलतो.
इब्लिसराव अगदी बरोबर पॉइंटाचा
इब्लिसराव अगदी बरोबर पॉइंटाचा मुद्दा काढलात
काही जागी असे होते र्ह्स्व दीर्घामुळे अर्थ बदलतो
ओ हो ...दुरूस्त
ओ हो ...दुरूस्त केलेय..सॉरी!
लक्षात आणून दिल्याबद्दल आभार!
नेमका आहे कसा तो सांग मज
नेमका आहे कसा तो सांग मज आतातरी
रोज जो अंधार करतो त्या रवीचा चेहरा..>>>> भिडला...
खुरसाले , बेफीजींचा अजून एक
खुरसाले , बेफीजींचा अजून एक विठ्ठलाचा शेर आहे तो वाचलात का
अर्ज दरवर्षी कराया लोक नेती पालख्या
विठ्ठलाला सांगती की पंढरी सोडून दे
मक्त्यातील खयाल आवडला.
मक्त्यातील खयाल आवडला.
सर्वांचे आभार! >>>>खुरसाले ,
सर्वांचे आभार!
>>>>खुरसाले , बेफीजींचा अजून एक विठ्ठलाचा शेर
आहे तो वाचलात का
अर्ज दरवर्षी कराया लोक नेती पालख्या
विठ्ठलाला सांगती की पंढरी सोडून दे>>>>>
हो हो वाचला होता ..त्या गझलेतला अजून एक शेर फार आवडला होता
कान राधेचे कुठे पळतात का खोटारड्या
धर्म दे स्थापून आता बासरी सोडून दे
रे 'सुशांता' व्यक्त व्हाया
रे 'सुशांता' व्यक्त व्हाया लाख तुजला चेहरे
पण तुला का पाहिजे आहे कवीचा चेहरा?
हा शेर फार फार आवडलाय
धन्यवाद प्रसादजी..!
धन्यवाद प्रसादजी..!
चांगली आहे !
चांगली आहे !
छान !! मतल्यापेक्षा बाकी शेर
छान !!
मतल्यापेक्षा बाकी शेर जास्त आवडले.
जबरदस्त - खूपच आवडली ही गजल -
जबरदस्त - खूपच आवडली ही गजल - मनापासून धन्स ....
बंडोपंत, जयश्रीताई, शशांकजी
बंडोपंत, जयश्रीताई, शशांकजी सर्वांचे आभार!
'पालवी' आणि 'पालखी' हे सर्वात
'पालवी' आणि 'पालखी' हे सर्वात आवडले.
सुंदर गझल !
सुंदर गझल !
धन्यवाद उकाका आणि शुभानन
धन्यवाद उकाका आणि शुभानन चिंचकर 'अरुण' जी!