अवांतर[४]: गावोगावी शिवांबू बंधारे-योजना राबवा

Submitted by मी-भास्कर on 8 April, 2013 - 05:56

गावोगावी शिवांबू-बंधारे-योजना राबवा.
खरेच जगाच्या इतिहासात असा अभिनव उपक्रम झाला नसेल. पण जलसंपदा मंत्र्यांनी त्यांच्या खात्याला केवढी मोठी टीप दिली आहे.. बंधार्‍यांचे तपशीलवार आराखडे त्या खात्यातील चतुर मंडळींनी तयार केल्याची आजची ऐकीव बातमी आहे. त्यासाठी खूप मोठा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी लवकरच मंजूर करून घेण्याचे घाटत आहे. दादा-बंधारे असे नावही निश्चित झाले असल्याचे कळते. या योजनेसाठी लोकसहभाग प्रचंड प्रमाणात लाभेल अशी खात्याला खात्री वाटते.
[ नाव न सांगण्याच्या अटीवर सदर गोपनीय माहिती खात्यातील उच्च पदस्थांनी दिली आहे]
खात्याला प्रेरणा मिळाली ती अशी :
लोकसत्ता: ८-४-२०१३: "धरणात पाणी नाही, तर लघवी करायची का? लघवी करायलाही पाणी लागते." - इति उपमुख्यमंत्री मा अजितदादा पवार.
खरेच धरणातील पाणी वाढविण्याचा हाही एक मार्ग असू शकतो आणि जनतेच्या परवानगीसाठीच केवळ तो रखडला आहे याची कोणालाही बित्तंबातमी नव्हती हे केवढे आश्चर्य! यासाठी देखील पाणी लागते याचीही त्यांनी जाणीव करून दिली ते बरे झाले. ते पाणि वॅगनने आणायला काय हरकत आह? आख्या महाराष्ट्रात आता यावर विचारमंथन व्हावे. त्यानिमित्त मनात आलेलं कांही येथे व्यक्त करून ठेवतो.
(१) यासाठी पाण्याऐवजी वाईन चालेल का? महाराष्ट्रात पाणी नसले तरी वाईनचे उत्पादन प्रचंड असल्याचे म्हणतात. नेते मंडळीच या उद्योगात आघाडीवर आहेत असे म्हणतात.
(२) या पद्धतीत गोडे पाणी खारट होण्याची शक्यता नाही का? तसे होऊ नये म्हणून कांही उपाय दादांजवळ असावा. त्याशिवाय का ते असे बोलतील?

(३) या पद्धतीत प्यायलेल्या पाण्यापैकी थोडे इतर मार्गानी वाया जाईल त्याचे काय करायच? का तो लॉसही टाळायचा उपाय त्यांचेकडॅ आहे?
(४) समजा जनतेने अनुमती दिली तर ते एकटे शासकीय जबाबदार्‍या पाळतांना पाणी पिणे आणि धरणात सोडणे यासाठी वेळ कसा काय काढणार? बहुदा उद घाटन करून झाल्यावर कार्यकर्ते, शासकीय कर्मचारी, आणि जनतेच्या सहभागाने योजना पार पाडणार.
हाही उपाय बिकट पण अभिनव आहे खरा!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भास्करराव, तुमचा आण्णा झाला..... तुमचे मित्र जोशी, मास्तुरे वगैरेही गेले.... लोकही नाहीत.. मेडिया नाही... आता तुम्ही एकटे पडलात.

मी-भास्कर,

मला जलसंधारणातलं फारसं कळंत नाही. फक्त एक गोष्ट जाणवते. साहेबांपुढे दोन पर्याय आहेत.

१. स्वत:ची प्रतिष्ठा जपणे. त्याकरिता दादांना दूर करावे लागेल. महाराष्ट्रातल्या कुणालाही दादांचा भरंवसा ठेवणार नाहीये.

२. दादांबरोबर स्वत:ही बुडणे.

बघूया काय होतं ते.

आ.न.,
-गा.पै.

त्यांना जगभरात प्रचंड मागणी आलीये असं ऐकलंय. विशेषतः सहाराचे वाळवंट, टेक्सास, नेवाडा, आफ्रिका, इस्त्रायल, इराक इ.देश जिथे पाणी कमी आहे तिथून.

गामा_पैलवान | 11 April, 2013 - 20:32नवीन

जलसंधारणात झालेला भ्रष्टाचार या आधी साहेबांसमोर आला नसेल यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.
त्यामुळे कांहीही केले तरी खपून जाते हा आत्मविश्वासच दुर्लक्ष करण्यास कारणीभूत झाला असावा.
"विनाशकाले विपरीत बुद्धी."

उद्दाम | 11 April, 2013 - 17:2
भास्करराव, तुमचा आण्णा झाला..... तुमचे मित्र जोशी, मास्तुरे वगैरेही गेले.... लोकही नाहीत.. मेडिया नाही...<<

चार दिवसाच्या नवजात बालका तुझा पुनर् जन्म झालेला दिसतोय.

>> आता तुम्ही एकटे पडलात <<

त्याची चिंता तुम्ही करू नका. दीर्घायुष्य प्राप्त करा. .

सौ. रामप्यारी र... | 11 April, 2013 - 20:36
>>त्यांना जगभरात प्रचंड मागणी आलीये असं ऐकलंय. विशेषतः सहाराचे वाळवंट, टेक्सास, नेवाडा, आफ्रिका, इस्त्रायल, इराक इ.देश जिथे पाणी कमी आहे तिथून.<<

अहो जगभरातील लोकांनी माझ्याप्रमाणेच असलं अवांतर वाचन केलं म्हणूनच त्यांनी मागणी नोंदवली ना? अवांतर वाचनाचे फायदे बघा.

बाप रे ! किती धागे काढावेत एकाच आयडीने !!!! हद्द झाली.

या आयडीचा जन्म फक्त (तत्कालीन) सरकार विरोधी धाग्यांसाठीच झालेला होता कि काय ?
यांना पुन्हा संधी दिली तर सध्याच्या सरकार विरोधात अशीच मोहीम चालवतील का ?

अजित पवारांविषयी कुणालाही कितीही राग असेल तरी आता निवडणुका आल्या आहेत. त्यांच्या विरुध्द प्रचारात्मक / किंवा कुणाच्याही विरुध्दचे प्रचारात्मक धागे निवडणुकीच्या काळात काढु नयेत असे माझे मत आहे.

त्यातुन अजित पवारांनी यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीजवळ बसुन आत्मपरिक्षण इ. केले आहे. हा विषय आता संपला आहे.

अजित पवारांनी गेल्या पाच वर्षात घेतलेल्या त्यांच्या खात्याच्या निर्णयांची परिणामकता यावर लेख आल्यास वावगे नसावे.