रेखाटन.....

Submitted by विनार्च on 1 April, 2013 - 14:42

सालाबाद प्रमाणे परिक्षेच्या मोसमात माझ्या लेकीच्या अंगात पिकासो संचारला आहे...... ह्या मोसमातले हे अजून एक चित्र. (आजीच्या वाढदिवसाची भेट आहे ही..... म्हणजे माझं तोंड बंद Happy )

2013-04-002.jpg

ह्याच शेडिंग करताना नवी पद्धत (तिच्यासाठी) तिला सापडली ..... शेडिंग केल्यावर जर त्याच्यावर बोट फिरवले की हवा तो परिणाम साधता येतो.

2013-04-003.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद! सिंडरेला, मृण्मयी,कंसराज , सायो , सशल, शैलजा, आशुतोष०७११ Happy

छानच Happy

Sanjeev.B , माधव , अवल ,इंद्रधनुष्य , pulasti , बिल्वा , डॅफोडिल्स , स्वाती_आंबोळे, मॅक्स प्रतिसादांबद्द्ल खूप खूप धन्यवाद !

मस्तच आलय चित्र, अभिनंदन

सालाबाद प्रमाणे परिक्षेच्या मोसमात माझ्या लेकीच्या अंगात पिकासो संचारला आहे>>> हा तर सार्वत्रीक नियम आहे

ह्याच शेडिंग करताना नवी पद्धत (तिच्यासाठी) तिला सापडली >>> इरेझर वापरून्ही असे इफेक्ट मिळवता येतात प्रयोग करायला सांगा.

तीला स्केचिंगचा हात आहे. भरपूर स्केचेस काढू देत. जितकी बघू शकतील तितकी स्केचेस बघू देत. होलसेल मार्केटमधून कागदाच बंडल आणा.

नो सजेशन्स, नो गाईडन्स जोपर्यंत तीला स्वताचा हात सापडत नाही तोपर्यंत.

चान्गलच काढलय की ग Happy मस्त
मांडी घातलेले अवघड अस्ते, एकुणच तो फॉर्म /ती पोझ चित्रात दाखवायला अवघड आहे, पण चान्गल उतरलय Happy

सुपर्ब!!! मोठ्ठी शाबासकी द्या लेकीला Happy

बागुलबुवा << +१

ह्याच शेडिंग करताना नवी पद्धत (तिच्यासाठी) तिला सापडली >>> इरेझर वापरून्ही असे इफेक्ट मिळवता येतात<<< पातळ कापड, कापसाचा बोळा यांचाही वापर करता येतो.

>>>> नो सजेशन्स, नो गाईडन्स जोपर्यंत तीला स्वताचा हात सापडत नाही तोपर्यंत. <<<
बाबूऽऽ, तिला तिचा हात सापडलाय रे केव्हाच! उलट आता भिती अशी की "एकाच एका ढाच्यात" तो हात साकटू नये!
बाकी पेपरचा गठ्ठा आणून द्याच! अन निरनिराळ्या बी/एचबी/एच ग्रेडच्या सगळ्या पेन्सिली! (वॉव, मला पेन्सिलीचा वास आठवला)

बाबूऽऽ, तिला तिचा हात सापडलाय रे केव्हाच! उलट आता भिती अशी की "एकाच एका ढाच्यात" तो हात साकटू नये!
बाकी पेपरचा गठ्ठा आणून द्याच! अन निरनिराळ्या बी/एचबी/एच ग्रेडच्या सगळ्या पेन्सिली! (वॉव, मला पेन्सिलीचा वास आठवला)>>>> +१०००

माझ्या मुलीनी अशीच सुरूवात केली, भरपूर वह्या भरवल्या, मुख्यम्हण्जे असे करु दिले की अभ्यासही छान होतो.