चिंब भिजलेली बुलबुल

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 28 March, 2013 - 14:23

बुलबुल पक्षी म्हणजे हल्ली आमच्या घरचे सदस्यच झाले आहेत. बाळंतपणासाठी आमच्या झुंबरावर गेली ४-५ वर्षे हे पक्षी अधिकार टिकवून आहेत. http://www.maayboli.com/node/21700

आताही त्यांची आमच्या झुंबरावर घरकुल थाटण्याची तयारी चालू आहे. आज सकाळीच बिचारी बुलबुल घरट्याच्या काड्या गोळा करून रचून थकून भागून बाहेरच्या आवारात झाडांवर जरा विश्रांती घ्यायला गेली. बाहेर आमच्या झाडांना पाणी घालण्याचे काम चालू होते. पाईपच्या तुकड्याला पडलेल्या चिरेच्या कृपेने त्यातील पाण्याचा फवारा उर्फ कारंजा उंच पेरूच्या झाडावर उडत होता. बुलबुलला तो कारंजा पाहून अगदी आनंदाला उधाण आले. न राहवून तिने त्या कारंज्यावर धाव घेतली आणि चिंब भिजलेले रुप सजलेले गीत गाउ लागली. तिचा सगळा थकवा, मरगळ त्या जलबिंदूंमध्ये विरघळून गेला. त्या कारंज्याच्या थेंबांनी ती चिंब भिजत होती, आनंदाने ह्या फांदीवरून त्या फांदीवर बागडत होती.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

चिंब होऊन प्रसन्न झालेली बुलबुल.
८)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा जागू, किती छान फोटो आणि तुझी कल्पनाही. निसर्गाशी किती एकरुप होतेस हे पुन्हा एकदा जाणवले. खुप छान लिहीलेस.

मस्तच फोटो आहेत. जुना धागा पण बघीतला मस्तच एकदम.
१०-१२ वर्षांपुर्वी आमच्या जुन्या घरीसुद्धा असच पण चिमण्यांच अधिराज्य असायच. तेव्हा एवढ काही वाटायच नाही पण ते घर सोडल्यानंतर चिमण्यांनी मनात निर्माण केलेली पोकळी अधुन मधुन सतत जाणवत राहते.

रोहीत, प्रज्ञा धन्यवाद.

बंडूपंत माझ्या लहानपणी मला आठवतात चिमण्या आमच्या घरात येऊन तसबीरींच्या मागे घरटे करायच्या. आता चिमणी दिसणेही मुश्किल झाले आहे.

तू हे फोटो "हा पक्षी कोणता" वर आधी टाकले असतेस अन मग हा धागा टाकला असतास तर मज्जा आली असती.
मस्त फोटो़ज Happy