तोतया

Submitted by सत्यजित on 29 March, 2013 - 03:01

भावनांच्या भाऊगर्दीत
हरवत जातं माझ मन
आणि शोध घ्यावा
लागतो मलाच माझा

नाती धुंडाळावी लागतात
उपकारांचे हिशोब मांडावे लागतात
पालथे करावे लागतात
भुतकाळाचे अनेक खण

अनेक चाव्या लावुनही
न उघडणारे अनेक कप्पे तसेच..
नक्की कुठे दडलोय?
की हरवलोय मी?
काही सुगावा नाही...

जुन्या अल्बमच्या ढिगात
शोधतो मी माझा फोटो
माझ्या सारख्या दिसणार्‍या
एका व्यक्तीच अस्तित्व जाणवतं
पण मी कुठेच नाही
तो तोतया का मी तोतया?

असा कसा काळाच्या ओघात
अख्खा माणुस हरवून जातो
आणि तो तोतया मलाच
त्याच घर करुन रहातो

आता मी सापडण्याची शक्यता नाहीच
ह्या तोतयाचा तोतया तरी सापडावा

-सत्यजित.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा !! अस्वस्थ मनाचं हे आंदोलन छान वाटलं.

"नाती ढुंडाळावी लागतात" >>> इथे धुंडाळावी लागतात असं हवं आहे का ?