जे जे करावयाचे, ते ते करून झाले!

Submitted by गझलप्रेमी on 27 March, 2013 - 06:50

गझल
जे जे करावयाचे, ते ते करून झाले!
मरणा! खुशाल ये तू, माझे जगून झाले!!

उरलेच काय आता डोळ्यांस काम माझ्या?
नव्हते बघावयाचे तेही बघून झाले!

माझा म्हणून आता हा देह फक्त आहे....
जे काय कनवटीला होते....विकून झाले!

तो चेहरा पुसटसा स्मरतो जरा जरासा....
दिसलास जीवना! पण, दर्शन दुरून झाले!

मरणास काय दुनिये, मी घाबरेन आता?
व्हावा सराव इतक्या वेळा मरून झाले!

ना थांबलीच त्यांची केव्हा टवाळखोरी!
हझलेतुनी कितीदा मी भोसडून झाले!!

आशय मुळात होता गद्यात्म अन् दरिद्री.....
गझलेत कैक कावे त्यांचे करून झाले!

होती मुळात पोकळ गझलेमधील भाषा;
सगळे चतुर पवित्रे पण वापरून झाले!

काही करून नाही भिडलीच लय मनाला!
मिसरे कितीक वेळा ते गुणगुणून झाले!!

जात्या मुळीच नाही मी पुण्यवान कोणी!
हातून पुण्य झाले....तेही चुकून झाले!!

..................गझलप्रेमी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ना थांबलीच त्यांची केव्हा टवाळखोरी!
हझलेतुनी कितीदा मी भोसडून झाले!!

आशय मुळात होता गद्यात्म अन् दरिद्री.....
गझलेत कैक कावे त्यांचे करून झाले!

होती मुळात पोकळ गझलेमधील भाषा;
सगळे चतुर पवित्रे पण वापरून झाले!<<< Rofl

ना थांबलीच त्यांची केव्हा टवाळखोरी!
हझलेतुनी कितीदा मी भोसडून झाले!!

आशय मुळात होता गद्यात्म अन् दरिद्री.....
गझलेत कैक कावे त्यांचे करून झाले!

होती मुळात पोकळ गझलेमधील भाषा;
सगळे चतुर पवित्रे पण वापरून झाले!

काही करून नाही भिडलीच लय मनाला!
मिसरे कितीक वेळा ते गुणगुणून झाले!!

हे चार शेर वेगळ्या गझलेचे चुकून आलेत असं वाटतय.
हे सोडल्यास गझल सुंदर आहे.

आद्याजी,
ही गैरमुसलसल गझल आहे!
येथील प्रत्येक शेराचा स्वतंत्रपणे आस्वाद घेणे अपेक्षित असते!
प्रत्येक शेराचा आशय, विषय, मूड अलग असतो!
प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असते!
विविध शेरांचा एकमेकांशी संबंध नसतो व तो लावायचाही नसतो!

टीप: वरील सर्व शेर एकाच गझलेतील आहेत!

रोज गझल करू नये. सांगण्यासारखे काही राहात नाही. ओढाताण होते.

तिलकधारी रोज गझल करण्याच्या विरुद्ध आहे.

ज्याचा श्वासच मुळी गझल आहे, जो गझल जगत असतो घडीघडीला, त्याला रोजच काय काही मिनिटांनी शेर स्फुरतात! त्याच्या ओठांवर दैनंदीन जगण्यातल्या कडूगोड अनुभवांनी मिसरेच्या मिसरे रेंगाळू लागतात!
मानवी जीवन हा प्रत्ययांचा/शेरांचा/गझलांचा खजिनाच असतो! तबियत गझलकाराची असेल, जो हाडाचा गझलकार असेल, त्याला सांगण्यासारखे काही नाही अशी करंटी वेळ कधीही येत नाही!
कितीही सांगितले/लिहिले तरी काही तरी सांगायचे त्याचे अजून राहिलेलेच असते!
म्हणूनच या अपूर्णत्वामुळेच त्याची लेखणी ही सतत लिहिती असते!
ती एक प्रतिक्षिप्त क्रियाच होत असते, जसे श्वास घेणे सोडणे याची जाणीव नसतानाही श्वासोच्छ्वास चालूच असतो, तसेच दैनिक व्यवहार करताना देखिल त्याच्या मनात शेरांचे/गझलांचे स्पंदन चालूच असते! त्यासाठी वेगळे खटाटोप करावे लागत नाहीत!

टीप: गझला करत नसतात, त्या होत असतात! न राहवल्यामुळे!
कुंथून कुंथून गझला होत नसतात!

ओढ व ताण असल्याखेरीज गझल जन्मतच नाही!

जो हाडाचा गझलकार असेल, त्याला सांगण्यासारखे काही नाही अशी करंटी वेळ कधीही येत नाही!<<<

माझ्या सदस्यत्वाचे चित्र पाहिल्यावर हाडाचा गझलकार म्हणजे काय ते समजेल गझलप्रेमी

तिलकधारी हाडाचा गझलकार आहे

तिलकधारी,

गझलप्रेमींना संताप येईल असे काही बोलू नयेत ही विनंती.

आम्ही सर्वजण नुकतेच ह्या सर्व शब्दगदारोळातून कसेबसे बाहेर पडलो आहोत.

अस्थिपंजर गझलकार वेगळा व हाडाचा गझलकार वेगळा! काही तरी गल्लत होत आहे बहुतेक आपली!
हाडाचा गझलकार ओळखायला कुठलाही एक्सरे वा चित्र पहायची आवश्यकता नसते! त्याचा एखादा शेरच बोलका असतो ज्यातून तो हाडाचा गझलकार आहे, की अस्थिपंजर गझलकार आहे हे लगेच कळते!

हाडाचा गझलकार ओळखायला कुठलाही एक्सरे वा चित्र पहायची आवश्यकता नसते! त्याचा एखादा शेरच बोलका असतो ज्यातून तो हाडाचा गझलकार आहे, की अस्थिपंजर गझलकार आहे हे लगेच कळते!<<<

सहमत आहे.

तिलकधारी न्याय्य गोष्टींशी नेहमीच सहमत असतो.

तिलकधारी न्याय्य गोष्टींशी नेहमीच सहमत असतो.
गझलप्रेमी अशा व्यक्तींचा नेहमीच आदर करतात तिलकधारीजी!

तिलकधारी,
एक शेर आपणास सस्नेह अर्पण......

रक्तात गझल आहे! हाडात गझल आहे!
राखेतही चितेच्या उरणार गझल आहे!!..............इति गझलप्रेमी

ना थांबलीच त्यांची केव्हा टवाळखोरी!
हझलेतुनी कितीदा मी भोसडून झाले!!
.
आशय मुळात होता गद्यात्म अन् दरिद्री.....
गझलेत कैक कावे त्यांचे करून झाले!
.
होती मुळात पोकळ गझलेमधील भाषा;
सगळे चतुर पवित्रे पण वापरून झाले!
Happy Lol Rofl

शेर आवडलेत.

-----------------------------------------------------
कुठल्यातरी एका सिनेमाचा संवाद आठवला.

"इतनी बदलियोके बावजूद हम नही बदले. हम अंग्रेज जमाने के जेलर है."