Submitted by सुप्रिया जाधव. on 16 March, 2013 - 05:12
नाव त्याचे टाकले असते कदाचित...
मी स्वतःला भेटले असते कदाचित !
गिरवले अन खोडले तू नाव माझे
फुरसतीने वाचले असते कदाचित !
मिसळले असतेस जर डोळ्यांत डोळे
आसवांना रोखले असते कदाचित !
भेटला नसतास तू तुकड्यांमधे तर
जीवनाला सांधले असते कदाचित !
घेतले असतेस जर तू हात हाती
मी जगाला सोडले असते कदाचित !
केवढे झाले बरे, ना भेटण्याने...
जे नको ते बोलले असते कदाचित !
अनुभवांनी शाहणी झालेच नाही...
समजुतीने वागले असते कदाचित !
लागला नाही सुगावा वादळाचा
मी किनारे गाठले असते कदाचित !
-सुप्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केवढे झाले बरे, ना
केवढे झाले बरे, ना भेटण्याने...
जे नको ते बोलले असते कदाचित !>> हा शेर ़जब्बर्र्दस्त आवडला.. सहजपणा भावला...
+१ <<<केवढे झाले बरे, ना
+१
<<<केवढे झाले बरे, ना भेटण्याने...
जे नको ते बोलले असते कदाचित >>>
इतकं वाचलं अन प्रतीसाद टायपला, मग पुढचं वाचलं.
खुपच मस्त!
छान आहे हो गझल पण आहे आणि छान
छान आहे हो
गझल पण आहे आणि छान पण आहे
( इथे लिहिता येईल की अनेक शेर छान आहेत )
घ्यायचा होतास सखया हात
घ्यायचा होतास सखया हात हाती
हो!.... जराशी लाजले असते कदाचित !>>व्वा !
केवढे झाले बरे, ना भेटण्याने...
जे नको ते बोलले असते कदाचित !
>>मस्त .!!
मस्तै. आवडली.
मस्तै. आवडली.
ठीकठाक वाटली.
ठीकठाक वाटली.
केवढे झाले बरे, ना
केवढे झाले बरे, ना भेटण्याने...
जे नको ते बोलले असते कदाचित !
व्वा.
गिरवले अन खोडले तू नाव
गिरवले अन खोडले तू नाव माझे
फुरसतीने वाचले असते कदाचित !
केवढे झाले बरे, ना भेटण्याने...
जे नको ते बोलले असते कदाचित !
याचसाठी शांत मी बसते अताशा
शब्द माझे झोंबले असते कदाचित !
सुंदर शेर! आवडले.
केवढे झाले बरे, ना
केवढे झाले बरे, ना भेटण्याने...
जे नको ते बोलले असते कदाचित >>>>> वा फारच छान
छान.
छान.
आणखीन एक सुंदर गज़ल...!
आणखीन एक सुंदर गज़ल...! अप्रतिम!
मस्त!!!
मस्त!!!
केवढे झाले बरे, ना
केवढे झाले बरे, ना भेटण्याने...
जे नको ते बोलले असते कदाचित !........मस्तच
घ्यायचा होतास सखया हात
घ्यायचा होतास सखया हात हाती
हो!.... जराशी लाजले असते कदाचित !
लागला नाही सुगावा वादळाचा
मी किनारे गाठले असते कदाचित !
हे २ शेर सर्वात आवडले.
नको ते बोलले... हा शेर फार
नको ते बोलले... हा शेर फार फार आवडला!!
गझलुमियांचा प्रतिसाद मला नीट
गझलुमियांचा प्रतिसाद मला नीट समजला नाही पण खूप काही सांगणारा / सूचीत करणारा असा वाटला
काही शेर आवडले
वैभवजी अगदी मनापासून आवडली
वैभवजी अगदी मनापासून आवडली गझल हे सांगणे हाच एकमेव उद्देश आहे प्रतिसादाचा.
नुसतेच वृत्त/काफिया/रदीफ जमली म्हणून नाही तर गझलेचा मंत्रही पाळला गेलाय.
मागे एकदा सुप्रियाजींच्याच ५ शेरांच्या रचनेला अनेक शेर चांगले आहेत असा प्रतिसाद आला होता तो सहज आठवला म्हणून सहज गंमत म्हणून तसे लिहिले आहे. कोणास दुखवायचा हेतू नाही ( तसा तो नसतोच माझा कधी )
<<<गझलुमियांचा प्रतिसाद मला
<<<गझलुमियांचा प्रतिसाद मला नीट समजला नाही पण खूप काही सांगणारा / सूचीत करणारा असा वाटला>>>
दुटप्पीपणा सोडा वैवकु
दुटप्पीपणा नाही आहे जे जसे
दुटप्पीपणा नाही आहे जे जसे वाटले ते तसे सांगीतले फक्त
कृ गै न
काही शेर बदलून
काही शेर बदलून
सुंदर.. या गझलेत अजून एक मजा
सुंदर..
या गझलेत अजून एक मजा आहे...
अनेक सानी मिसरे अनेक उला मिसर्यांस नवा अर्थ देतायेत... उदा.
घ्यायचा होतास माझा हात हाती
मी किनारे गाठले असते कदाचित !
लागला नाही सुगावा वादळाचा
मी स्वतःला भेटले असते कदाचित ! ...
ही कशी काय मिस केली होती?
ही कशी काय मिस केली होती?
केवढे झाले बरे, ना भेटण्याने...
जे नको ते बोलले असते कदाचित !<<< मस्त!
भेटला नसतास तू तुकड्यांमधे तर<<< ही ओळ तर फारच आवडली, पण शेर म्हणून नीट लक्षात आला नाही. प्रयत्न करतो पुन्हा
शामजी भा.पो. बेफिजी धन्स
शामजी भा.पो.
बेफिजी धन्स !
-सुप्रिया.