कच्चा लिंबू-पक्का लिंबू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 6 March, 2013 - 14:28

१)

२)

३)

४)

५)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, जागू - अगदी सुंदर फोटो काढलेस - फुलापासून फळ कसे तयार होते या प्रक्रियेचे .........

लिंबाचा सुवास इथपर्यंत दरवळला बघ .......

मस्तच ! पुर्वी लिंबाचे दोन झांड होती अंगणात चांगली टपोरी रसदार लिंब लागायची, फुकटात वाटायचो. पण कालांतराने किड लागुन गेली पुन्हा नविन लावलीच नाही !

मस्त फोटो आहे.

आमच्याकडची लिंबाची झाडं जगतच नाहीत. कितीवेळा पप्पांनी कुठल्या कुठल्या नर्सरीमधून आणली. बाकीची झाडं जगतात. पण लिंब सहासात महिन्यात जाते. Sad

जागू, मस्त फोटो!
लिंबाच्या फुलापासून फळ तयार होईपर्यंत किती काळ लागतो? माझ्याकडे कुंडीत जे झाड आहे, त्याला मागच्या जानेवारीत फुलं होती, ती लिंबं तयार व्हायला मे - जून उजाडला. त्यातही बरीचशी फळं अगदी लहान असतांना गळून गेली - फक्त पाच सहा टिकली. त्यानंतर या जानेवारीपर्यंत काहीच नव्हतं झाडावर. सद्ध्या परत फुलं / बाळलिंबं आहेत. काय केल्याने ती लिंबं टिकतील?

सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.

गौरी त्याला खत आणि पुरेस पाणी घाल. शिवाय सूर्यप्रकाशही हवा.

अप्रतिम फोटो!!

एक छोटीशी गोष्ट जाणवली ती अशी, की लिंबाच्या पानाला देठालगत अजून एक पाठराखणी सारखं पान असल्यासारखा भाग आहे नै? इंडियन फर्न ट्री ला पण दोन पानांच्या मधे अशी जोड-पान- साखळी असते.

वा जागू, मस्त फोटो. लिंबाच्या झाडाची वाढ खुप स्लो होते ना? मला एक सांगशील का ? मी लिंबाचे बी रुजवले त्याचे वितभर झाड झाले ते वाढेल का?

विद्या हो सहज वाढते लिंबाचे झाड. वाढ व्हायला वेळ लागतो. पण एकदा का जोमाने वाढले की फळेही चांगली येऊ लागतात.