Submitted by राजीव मासरूळकर on 28 February, 2013 - 12:20
जादू
(बालकविता)
एकदा एक परी
उडत उडत आली
दंवाचे मोती
अलगद प्याली
प्यायल्या दवाने
जिरवले लाड
डोक्यावर उगवले
केसांचे माड
माडांना लगडले
नारळाचे घड
परीचे पंख आता
करी फडफड
पंखांच्या टोकातून
सुटले वादळ
माडांचे सगळे
खाली आले नारळ
नारळांचा झाला
मोठ्ठा आवाज
मुलांनी भरून
आले जहाज
जहाजामधून
उतरली मुले
नारळपाणी
पोटात गेले
पोटातल्या पाण्याला
फुटल्या उकळ्या
उमलून आल्या
बागेतल्या कळ्या
बागेतल्या फुलांचा
सुटला वास
माडांच्या मुळांचा
तुटला फास
तुटल्या फासातून
आला फेस
परीला लाभले
कुरळ्या केस
कुरळ्या केसांनी
केली जादू
परीच्या पुढे एक
अवतरला साधू
साधूने म्हटली
झऱ्यांची गाणी
परीला बनवले
पऱ्यांची राणी
पऱ्यांची राणी
हसली खूप
मिळाले तिला तिचे
सुंदर रूप !
- राजीव मासरूळकर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गोष्ट आवडली.
गोष्ट आवडली.
धन्यवाद , समीरजी.
धन्यवाद , समीरजी.
आवडली
आवडली
वर्षा_म , आपले हार्दिक आभार .
वर्षा_म ,
आपले हार्दिक आभार .
वा मासरूळकर जिंकलत
वा मासरूळकर जिंकलत !!!!!!
अप्रतीम बालकाव्य
मस्त कविता!
मस्त कविता!
वैवकु, प्रज्ञा १२३, आपले
वैवकु,
प्रज्ञा १२३,
आपले हार्दिक आभार !
झकास !
झकास !
धन्यवाद विक्रांतजी .
धन्यवाद विक्रांतजी .
आवडलं
आवडलं
मस्त अन मस्तच
मस्त अन मस्तच
जाई आणि रेव्यु , खूप खूप आभार
जाई आणि रेव्यु ,
खूप खूप आभार !