वादात या कुणीही सहसा पडू नये (तरही)

Submitted by इस्रो on 25 February, 2013 - 07:28

हद्दीत आमुच्या, त्यांनी कडमडू नये
वादात या कुणीही, सहसा पडू नये

पार्थिव सैनिकाचे, ज्यांनी विटंबिले
साधी शिवी तयांना, मी हासडू नये?

गर्जून येथ कोणी, नाही कधी बरसला
रागात जोरजोराने, बडबडू नये

सरकार मायाबापा, कळणार हे कधी?
'गोध्रा' नि 'खैरलांजी', आता घडू नये

आहे मुलाप्रमाणे, नाही कुठे कमी
जन्मावरी मुलीच्या, कोणी रडू नये

एकेक शब्द यावा, गझलेत नेमका
शब्दांविना गझल, कोणाची अडू नये

-नाहिद नालबंद
[भ्रमणध्वनी : ९९२१ १०४ ६३०]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरकार मायाबापा, कळणार हे कधी?
'गोध्रा' नि 'खैरलांजी', आता घडू नये

आहे मुलाप्रमाणे, नाही कुठे कमी
जन्मावरी मुलीच्या, कोणी रडू नये

खूपच आवडले अगदी समाज प्रबोधक शेर ********