पुण्यात फ्रेश पदवी धारकान्नी नोकरी कशी शोधावी!!!!

Submitted by हर्ट on 1 March, 2013 - 02:18

माझी पुतणी ऐम आय टी मधून बी सी ऐ पुर्ण झाली आहे. ती पुण्यात नोकरी शोधते आहे. नोकरी शोधायला चान्गल्या साईट्स कुणी सान्गू शकेल का? आणि मार्गदर्शनही करा. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी अरे तू स्वतः उच्चशिक्षीत पदवीधर आहेस आणी परदेशात नोकरी करतोस, मग तुला माहीत असतीलच की या साईटस. नौकरी. कॉम, मॉन्स्टर आणी अनेक आहेत. जरा गुगलवर सर्च मार.

आणी ती जर कॉम्प्युटर प्रशिक्षीत आहे तर तिलाच सोधायला सांग ना. प्रत्येक वेळेस तू का तिची कुबडी बनायचा प्रयत्न करतोयस? रागवु नकोस मनमोकळे आणी स्पष्ट लिहीले म्हणून. तिलाच आता स्वतः धडपड करु दे. स्वतःच्या मेहेनतीचा आनंद वेगळाच असतो हे तुला माहीत आहेच की.

अग मी तिला फक्त गाईड करतो आहे. तू म्हणते आहेस ते अगदी बरोबर आहे. मला ह्या दोन्ही साईट्स माहिती आहेत.

मलाही टुनटुनसारखंच वाटलं हे वाचून. चमच्याने भरवणे बरोबर नाही. पण तरी तू विचारतोय्स म्हणजे काहीतरी कारण असेल म्हणून सांगतेय.. प्रत्येक कंपनीच्या वेबसाइटवर फ्रेशर्ससाठी सीव्ही अपलोड करायचा पर्याय असतोच. शिवाय त्या त्या कंपनीचे वॉक-इन इंटरव्ह्यु असल्यास त्याची माहितीही असते. नौकरी अन मॉन्स्टरवर ही फ्रेशर्स वॉक-इन च्या जाहिराती असतात. शिवाय तिथे फ्रेशर्स साठी प्रत्यक्ष ओपनिंग्जही असतात.तिथे अप्लाय करता येते.
याशिवाय पुणे ओपन कॉफी क्लब वरती बरेच ओपनिंग्ज आहेत जे छोट्या स्टार्टप कंपन्यासाठी आहेत. तिथला अनुभव मोठ्या कंपन्यांपेक्षा वेगळा असला तरी भविष्यासाठी अमुल्य असु शकतो.

पुणे ओपन कॉफी क्लब>> मला ह्याबद्दल माहिती नाही. मी ह्याची लिन्क शोधतो गुगलवर. पण जर कुणाकडे असेल तर इथे चिकटवा.

ता. क. दिपालीला, माझ्या पुतणीला, सध्यातरी स.न्गणकातला कुठलाही जॉब चालेल. त्या अनुभवाच्या आधारावर पुढे तिला चान्गली मनासारखी नोकरी लागू शकते.

सॉरी बी आधी तिचे अभिनंदन करायचे राहुन गेले. तुझ्या पुतणीला अनेक शुभेच्छा आणी तिचे अभिनंदन. तिला तिच्या मित्र मैत्रिणींच्या पण संपर्कात राहु दे, त्यातुन तिला बरीच माहिती मिळेल. वर नताशा ने माहिती दिलीच आहे, दिपालीला त्यातुन नक्कीच फायदा होईल.