कोण म्हणतो शिस्त नाही?

Submitted by अमेय२८०८०७ on 21 February, 2013 - 06:44

आपल्या देशात शिस्त, सुसूत्रता मुळातून हरपत चालली आहे अशी ओरड अनेक समाजधुरीण नेहेमी मारत असतात. आपण सोडून इतरांनी भयानक शिस्त पाळावी अशी आपली रास्त अपेक्षा असते. कुठल्याही महानगरातील (आता तर अर्ध-नगरांतील देखील) गर्दी अगदी वैताग आणते. गर्दी म्हटली की धक्का-बुक्की, गोंधळ आलाच. स्वतःच्या पैशाने खाण्यासाठी हॉटेलात गेले तरी एकमेकांना कोपरे मारून पुढे सरसावत टेबल पटकवण्याची धडपड आणि जागा मिळताच मुद्रेवर उमटलेले विजयी भाव पाहिले की हसावे वा रडावे हा प्रश्न पडतो.
अलीकडे मीही अशा मौलिक सामाजिक विषयांवर बरेच चिंतन करण्याचा प्रयत्न करीत होतो. वेळही होता. चारचाकीने संप पुकारला होता आणि तिला दवापाणी करायसाठी घेऊन गेलो होतो. बिघाड दुरुस्त होण्यासाठी दोनेक तास लागणार होते. त्यावेळेत जन-जीवनाला पहावे आणि एखादा गंभीर , स्वतंत्र सामाजिक लेख लिहिता येतो का बघावे यासाठी जवळच्या बाजारात फिरत होतो. घाण, गर्दी, गलबल्याने जीव विटला होता.... आणि समोरचे दृष्य पाहून डोळे निवले. सामाजिक शिस्तीचा एक अनोखा अविष्कार पहावयास मिळाला. मन सुपाएवढे झाले. भारतातील परिस्थिति अगदीच आटोक्याबाहेर गेलेली नाही याची सुखावणासुखावणारीझाली. बर्‍याच दिवसांनी पोलीस अथवा सुरक्षा कर्मचारी नसतानाही लोकांची खतरनाक स्वयंशिस्त पाहण्यास मिळाली. मनावरून मोरपीस फिरून जाणे म्हणजे काय याचा (फारा दिवसांनी) सुखद अनुभव आला. ती घटना म्हणजे.....

a1.jpg(प्र. चि. थोडे हललेले आहे, पण दोष माझाच आहे. अचानक झालेल्या या शिस्तीच्या दर्शनाने 'आतून' हललो होतो. मन उत्तेजित झाल्याने हात पाय ई. थरथरत होते, त्यामुळे चित्र धूसर वाटले तरी त्यामागील गहिर्‍या भावनांची नोंद घेऊन इथले मित्र - मैत्रिणी मोठ्या दिलाने माफी देतील याची खात्री आहे.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy Happy

Happy Happy