गाज सागराची (अंतिम) — ३१ डिसेंबर २०१२चा सूर्यास्त (रॉक गार्डन)

Submitted by जिप्सी on 19 February, 2013 - 09:52

१. गाज सागराची — "मालवणमय"...

२. गाज सागराची — "मालवण मासळी बाजार"

३. गाज सागराची — "देवबाग आणि किल्ले निवती (सूर्यास्त-सूर्योदय)"

४. गाज सागराची — "किल्ले निवती"

५. गाज सागराची — "भोगवे समुद्रकिनारा"

६. गाज सागराची — "सागरतीर्थ"

७. गाज सागराची — "तोंडवली-तळाशील समुद्रकिनारा"
=======================================================================
=======================================================================

"गाज सागराची" या मालिकेतील हा शेवटचा भाग. सांताक्लॉज थोडा बिझी असल्याने हा भाग थोडा उशीरा प्रदर्शित केल्याने क्षमस्व. ;-). अर्थात या वेळेत तुम्ही संदेशच्या नजरेतुन अप्रतिम असा "मालवण"चित्र स्वरूपात पाहिला असेलच.

२०१२ वर्षातील शेवटचा सूर्यास्त मालवणच्या रॉक गार्डहुन. Happy

सूर्य अस्ताला जाण्याच्या मार्गावर होता आणि मला सूर्यास्ताचा नजारा चुकवायचा नव्हता. निसर्गसृष्टीचा आनंद मनमुराद लुटायचा असेल तर घराबाहेर पडाव लागत आणि एकदा घराबाहेर फिरायचे म्हटलं कि नवीन स्थळ शोधाव. एकदा का त्या इच्छित स्थळी पोहचलो कि तेथे काय पहाव हे स्वत:च्या आवडीनुसार ज्याने त्याने ठरवावे. मला समुद्रकिनारी गेल्यावर जास्त काय पहायला आवडतं तर सूर्यास्त आणि त्यानंतर क्षितिजावर होणारी रंगांची उधळण. प्रत्येक ठिकाणच्या सूर्यास्तात वेगळेपणा असतो. फक्त नजर पाहिजे तो पाहण्याची, अनुभवण्याची. याही वेळेस असंच झालं. सायंकाळची विलोभनीय वेळ, रूपेरी वाळुचा मऊशार समुद्रकिनारा, आकाशात बदलत जाणारे रंग, विविध छटा, पाण्यावर उमटणारे प्रतिबिंब, माझी पावलं नकळत त्या ओल्या मऊशार वाळुत खेचली जाऊ लागली. एरव्ही स्वत:कडे कुणाला पाहुही न देणारा हा तेजाचा गोळा हळुहळु आपलं रूप बदलु लागला. आता त्याचा लालबुंद आणि भव्य आकार सहज स्पष्ट दिसू लागला. सूर्य हळुहळु खाली येऊ लागला. माझी पर्यायाने कॅमेर्‍याची नजर फक्त आणि फक्त त्याच्याकडेच. भव्य व लोभस सूर्याचा लालबुंद गोळा पाण्याजवळ आला. त्याचं पाण्यातलं प्रतिबिंबही तेव्हढंच लोभस. पाहता पाहता सूर्याचा अस्त झाला. जाता जाताही तो आकाशावर विविध रंगाच्या छटा , वेगवेगळ्या आकाराच्या रंगीबेरंगी रांगोळ्या काढुन गेला. निसर्गाचा हा अविष्कार डोळ्यात साठवू कि कॅमेर्‍यात अशी संभ्रमावस्था माझी झाली. अगदी काळोख होईपर्यंत निसर्गाचा हा खेळ पाहत होतो.
(माझ्याच एका लेखातील पूर्वप्रकाशित Happy )

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

या मालवण सफरीतील आमची "स्विफ्टुकली"
प्रचि १९

पुन्हा भेटुच...... अशाच एका वळणावर Happy

सान्निध्य सागराचे आकाश पांघराया
या रम्य भूप्रदेशी मित्रांसवे पुन्हा या

प्रचि २०

(शेवटचे दोन्ही प्रचि संदेशने काढलेत)

=================================समाप्त==================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणतं प्रचि सर्वात जास्त आवडलं..४?५?१४?१५?१६?.......... अटर्ली कन्फ्यूज्ड!!!!!!!!!!!!!सरतेशेवटी................ सर्वच्यासर्व नं १ Happy

हे रॉक गार्डन आहे..? काहीतरी गडबड आहे.. मालवण रॉक गार्डन म्हणजे माझ्या मते वेगळा परिसर आहे.. तिथे मुलांसाठी टॉय ट्रेन वै. आहे..
असो.. प्रचि नेहमीसारखेच.. आवडले..

प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स Happy

मालवण रॉक गार्डन म्हणजे माझ्या मते वेगळा परिसर आहे..>>>>>सतिशजी, हा रॉक गार्डनच्या मागचाच भाग आहे. त्याच गार्डनमधुन येथे येता येते.