निसर्गाच्या गप्पा (भाग - १२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 January, 2013 - 02:12

निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी..अतिशय सुर्रेख आलाय फोटो, सन च्या प्रकाशात न्हाऊन निघालेला शेवगा आणी सनबर्ड.... अक्षरशः आँखोंकी ठंडक!!!!!!!!!!!!!!

जिप्सी तू आम्हा नि ग वरच्या लोकांना फोटोग्राफीच्या टिप्स दे यार जरा. म्हणजे माझ्या सारख्या लोकांनी काढलेले फोटो जरा बरे येतील. मी काढलेले अनेक फोटो मलाच बघवत नाहीत.

उस्फूर्ती स्त्रोत- दिनेश दा

आत्ताच कंप्लीट केलेले चित्रं.. हवाईयन फ्लावर- नि ग ला समर्पित

ताक. नि ग प्रेमींनो घाब्रू नका बर्का!!.. अजून नाही टाकणार माझी पेंटिंग्स इथे Wink

श्रीकांत, अहो आपले ते बाळ म्हणायचे.
खरे तर मी पण चांगले फोटो काढतो पण हल्ली ते जिप्सीने काढलेले फोटो पाहुन पाहुन डोळे बिघडलेत Wink असे म्हणायचे. हाकानाका.

नि ग प्रेमींनो घाब्रू नका बर्का!!.. अजून नाही टाकणार माझी पेंटिंग्स इथे >>>>>>>>>>>>अग, दे, दे, अजून. वाट बघतेय. Happy

वर्षू, आपण झब्बू खेळायचा बरं.

जिप्स्या, तू त्याची पोझ बघ बरं. मुद्दाम शक्य तितक्या लांबून साखरपाणी पितोय. शक्यतो डोक्याला परागकण लागू देत नाही. या स्पर्धेत फुले एकतर शहाणी होतील ( म्हणजे बाह्यकोष कठीण करतील ) किंवा त्या पक्ष्यांची संख्या खुप वाढेल !

दिनेश दा मस्त ऑब्झर्वेशन.. कलीयुगातले पक्षीही कसले हुष्षार झालेत आजकाल..
झब्बू ?? Lol गुड आयडिया..
खरंच या निमित्ताने कित्येक वर्षांनी मीही आपला पेंटिंग चा सर्व पसारा घरभर केलाय.. हात सुळसुळतायेत अगदी काहीतरी रोज करायला..

माझ्याकडे हा पक्षी गाडीच्या आरशावर आणि काचेवर सारखा उड्या मारत होता. (त्याला त्याच्या प्रतिबींबाला भेटायचे असावे) पण खरच तो काचे पलीकडे दुसरा पक्षी आहे असे समजला असणार. जवळ जवळ ३,४ तास हाच उद्योग चालू होता त्याचा. मधेच दमला की २,३ मिनिटं कुठेतरी जाऊन यायचा की परत हाच उद्योग सुरू.

b2.jpgb1.jpg

वर्षू, खरेच. कल्पनेतच भरपूर चित्रे काढून झाली. प्रत्यक्षात किती जमतील ते बघू या. पण करताना खुप आनंद वाटतो हे मात्र नक्की.

जो_एस, इथेही चिमण्यांचा तोच खेळ असतो. ऑफिसची काच आरश्यासारखीच आहे. त्यामूळे त्यावर धडका देत असतात. माकडे पण आरश्यांनी हैराण होतात.

हो दिनेशदा, अशा मोठ्या क्लिअर काचांवर आपटून बरेच पक्षी मेले आमच्या ऑफिस जवळ. त्याना काच दिसतच नाही आणि जोरात उडत जातात आणि आपटतात. चोच डॅमेज होते, क्वचितच कोणी वाचतात.

वा वर्षू - मस्त चित्र काढले आहेस - काही दिवसांनी नि ग वर पेंटिंग्जचा खच पडणार असं दिस्तंय..... Wink Happy

तुम्हा सर्वांचे बघून मलाही सुरसुरी आलीये बघ - ये तो सिर्फ झांकी है ..... Wink Happy

horse.JPG

काही दिवसांनी नि ग वर पेंटिंग्जचा खच पडणार असं दिस्तंय....>>>>>>>>>>>>.मी पण एक फोटो, मी काढलेल्या चित्राचा टाकणार होते. पण आता नकोच. Proud

शोभा टाक गं, माझ्या चित्रापेक्षा वाईट असूच शकत नाही ते.

एकदा चोच डॅमेज झाली तर पक्ष्यांना जगणे अशक्य. मी मागे एकदा बघितले होते, पोल्ट्री मधल्या कोंबड्यांच्या चोची, मुद्दाम थोड्या कापल्या होत्या. नाहीतर त्या मारामारी करुन जखमी होत.

पेंट मधे काढला आहे का? >>>> हो - पेंट ब्रश मधेच.... फार्फार वर्षापूर्वी स्केचेस काढायचो (जमतील तशी, प्रोफेशनल नाही)- आता सवय गेलीये - पण पें - ब्र मधे हात नीट चालत नाहीये... बघू हळुहळु जमले तर अजून काढीनही .....

सवय गेलीये - पण पें - ब्र मधे हात नीट चालत नाहीये... बघू हळुहळु जमले तर >>>> हे नीट नाही Uhoh
मग नीट काय असते ते तरी पाहुदे आम्हाला Happy

अरे व्वा.. दिनेश दा च्या पेंटिंग अ‍ॅडवेंचर ने बर्‍याच जणांना प्रोत्साहन मिळालंय ..
शशांक मस्त रे.. Happy

दिनेशदा,
पेन्टिन्ग मस्तच !
काजू, बदाम कलिंगड सगळं अगदी कंपनी जवळ !
आणखी फोटो येऊ देत, हि विनंती !:स्मि::

जिप्सी,
या चिमण्या खुप कमी दिसतात, पण छान फोटो !

Pages