Submitted by रसप on 13 February, 2013 - 23:58
माझा मीच न आता उरलो, तुझाच मी
तुझ्यात बघता मला, समजलो - तुझाच मी !
अनेक प्रेमाच्या शब्दांना तूच उधळले
मी तर केवळ वेचुन-वेचुन त्यांस जमवले
तू कविता मी कवी जाहलो, तुझाच मी
........... तुझ्यात बघता मला, समजलो - तुझाच मी !
जुन्या-जुन्या दु:खांनी होतो गलितगात्र मी
तू येण्याच्या आधी होतो शून्यमात्र मी
माझ्या नकळत तुला गवसलो, तुझाच मी
........... तुझ्यात बघता मला, समजलो - तुझाच मी !
इथून पुढचा प्रवास अपुला बराच आहे
तुझी साथ हा एक दिलासा खराच आहे
तुझ्या प्रकाशामधे उजळलो, तुझाच मी
........... तुझ्यात बघता मला, समजलो - तुझाच मी !
....रसप....
व्हॅलेन्टाईन्स डे, २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/02/blog-post_14.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनेक प्रेमाच्या शब्दांना तूच
अनेक प्रेमाच्या शब्दांना तूच उधळले
मी तर केवळ वेचुन-वेचुन त्यांस जमवले
तू कविता मी कवी जाहलो, तुझाच मी
........... तुझ्यात बघता मला, समजलो - तुझाच मी !.......... वा वा...क्या बात है!!!
काही शब्दांची द्विरुक्ती
काही शब्दांची द्विरुक्ती वाटली काही भरीचे वाटले
असो
कविता आवडली हे वेगळे सांगणे न लगे
इथून पुढचा प्रवास अपुला बराच
इथून पुढचा प्रवास अपुला बराच आहे
तुझी साथ हा एक दिलासा खराच आहे
तुझ्या प्रकाशामधे उजळलो, तुझाच मी
........... तुझ्यात बघता मला, समजलो - तुझाच मी !
वा.
छान
छान
मस्तच रे .....
मस्तच रे .....
अहा....सुन्दर....!!
अहा....सुन्दर....!!
छान ..... सहज, साधे
छान ..... सहज, साधे शब्द.
"इथून पुढचा प्रवास अपुला बराच आहे
तुझी साथ हा एक दिलासा खराच आहे" >>>> हे विशेषत्वाने आवडलं.
सुरेख.
सुरेख.