मराठी भाषा दिवस २०१३ - संयोजक हवेत

Submitted by रूनी पॉटर on 27 January, 2013 - 20:49

२०१३ चा मराठी भाषा दिवस महिन्यावर आला आहे. सुरुवातीची २ वर्षे संयुक्ता सदस्यांनी उत्कृष्टपणे ह्या उपक्रमाचे संयोजन केले. संयुक्ताबाहेरील मायबोली सदस्यांनी या उपक्रमाच्या संयोजनात भाग घेण्याची उत्सुकता दाखवल्याने मागच्यावर्षी मराठी भाषा दिवसाचे संयोजन सर्वांसाठी खुले केले होते. त्याचप्रमाणे याही वर्षी ते सर्व मायबोलीकरांसाठी खुले आहे. तुम्हाला जर या उपक्रमाच्या संयोजनात भाग घ्यायचा असेल तर इथे कळवा.
उपक्रमात सहभागी होणार्‍या स्वयंसेवकांना उपक्रमाच्या कालावधीत आपले खरे नाव स्वतःच्या मायबोली प्रोफाईल मधे लिहावे लागेल.
याआधीचे सगळे मराठी भाषा दिवस कार्यक्रम इथे बघता येतील.
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण !!
exactly काय करावं लागत? थोडा अंदाज द्याल का? मिटींग्स वगैरे असतील ना?

चैत्राली/नियती,

वर दिलेल्या दुव्यावर आधीचे कार्यक्रम पहाता येतील. तर संयोजक मंडळात जे मायबोलीकर असतील ते आपापसात ठरवतात कुठले उपक्रम करायचे/ कुठल्या स्पर्धा घ्यायच्या. त्या अनुषंगाने तयारी, जाहीराती आणि उपक्रमाचे आयोजन करायचे असते. इंटरनेटला अ‍ॅक्सेस असणे सर्वात महत्वाचे. बाकी माहिती मंडळात आल्यावर हळूहळू होत जाईलच.

ही बातमी लिहायला थोडा उशीर झालाय.
मराठी भाषा दिनाचे संयोजक मंडळ खालील प्रमाणे तयार झाले आहे -
मंजूडी, पौर्णिमा, सोनपरी, uju, chaitrali, नियती, अनीशा, पूर्वा.
मंडळाचे अभिनंदन आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा.