मदिरेचे अभंग

Submitted by अमेय२८०८०७ on 12 February, 2013 - 04:57

वाटते जे जे प्यावे , ते ते दुसर्‍यासी द्यावे
तर्र करूनी सोडावे , सकळजन

दुजाची किंवा आपली, कधीही उघडावी बाटली
लाज कोणा वाटली, वाटो द्यावी

व्हिस्की असो वा रम, काही नसावा नियम
दोन पेगांनी संभ्रम, नाहीसा होतो

कधी प्यावे एकचित्ति, कधी मैतराच्या साथी
गुंग परि त्याने मति, होवो नये

खावे चिवड्याचे बकणे, तैसेचि काही चकणे
शेवटी पिऊन टिकणे, महत्त्वाचे

चालता चालता प्यावे, हाती 'घेऊन' चालावे
नशापाणी व्हावे, मनासारखे

ज्यांना कळे मूलमंत्र, त्यांनाची आकळे तंत्र
स्कॉच अथवा संत्रं, परिणाम देई

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेय्२८०८०७
ही तुम्ही लिहिलेली कविता आहे का?
मला ही SMS म्हणून आली आहे मागच्या आठवड्यात Uhoh
काही शब्दांच्या ऐवजी वेगळे शब्द वापरले आहेत.

१००% माझीच आहे. दुसर्‍या साईट वरही होती, तिथून कोणीतरी घेतली असेल. इथे छापताना काही शब्द बदलले आहेत. आधी चुकून चिवड्याचे ख़काणे छापले होते, बाटली ची ओळही आता थोडी बदलून लिहिली आहे. तर्र च्या ऐवजी धुन्द होतं आधी.
(स्वतःचीच मालकी सिद्ध करायला काय काय करावे लागते! )

वै. व. कु. धन्यवाद प्रतिसादाबद्दल

अमेय्२८०८०७ Happy
मला तुम्ही दुसर्‍या कोणाची कविता छापली असे अजिबात म्हणायचे नव्हते! फक्त SMS मधुन कशी काय आली ह्याबद्दल उत्सुकता होती. कविता छानच आहे!

मलाही आश्चर्य वाटतेय sms बद्दल.
तुमच्या विचारणीबद्दल राग नाही, शेवटचे विनोदाने लिहिले आहे. फक्त आता कुठेतरी दुसर्‍याच्या नावाने छापलेली दिसू नये म्हणजे मिळवली.
गैर समज नसावा.