अद्भुत (भाग 6 )

Submitted by Mandar Katre on 10 February, 2013 - 02:03

6

तुझे नाव काय?

थॉमस रुडी

हे कोणते साल सुरू आहे ?

1862 , 12 डिसेंबर

तू कुठे आहेस?

मी अमेरिकेत आहे.

आजूबाजूला काय परिस्थिति आहे?

युद्ध सुरू आहे . आत्ताच आम्ही युनियन्स वाल्यांच्या पाच सैनिकांना यमसदनी धाडले.

तुझ्याबरोबर कितीजण आहेत ?

आम्ही तीस कन्फेडरेट आहोत , मी मूळचा व्हर्जिनियाचा !

किती दिवस झाले युद्ध सुरू आहे?

आम्ही फ्रेड्रिक्सबर्गला आहोत. युनियन्सचा सेनापति सैतान अँब्रोज बर्न्साईडने कालपासून हल्ल्यांना सुरुवात केली. तो कालपासून नदी पार करून आम्हाला संपवायचा प्लॅन बनवतोय. पण आमचा प्रमुख रॉबर्ट ली ने अशी काही नाकाबंदी केली आहे ,की अँब्रोजच्या नाकी नवू आले आहेत. आमचेही खूप सैनिक मारले गेले, पण आम्ही शत्रूचेही खूप नुकसान केलेले आहे.

तुमच्याजवळ काय शस्त्रे आहेत?

आमच्याकडे घोडे,बंदुका आणि भले आहेत. पण शत्रूकडे तोफाही आहेत.

आता काय झाले?

पलीकडून सतत गोळ्यांचा वर्षाव सुरू आहे. आत्ताच एक गोळी माझ्या खांद्यात घुसली ....... आई गं!

दुसरी गोळी येते आहे. ती मात्र नेमकी छातीवर ! बापरे! मी मेलो ..........

मी आता माझ्याच निष्प्राण शरीरकडे बघतो आहे. मी वर तरंगतो आहे. गोळी लागूनसुद्धा छातीत अजिबात दुखत नाही, कसे काय?

…………..

परत ये रोहन .... मी 10 ते 1 अंक मोजतो,तोपर्यंत तू परत आपल्या शरीरात ,सन 2010 मध्ये परत आलेला असशील...............

रोहनने हळूहळू डोळे उघडले. गुरुजी समोर बसले होते. सकाळचे सहा वाजले होते.

काय रोहन? कळलं ना तुझ्या पूर्वजन्माबद्दल? तुला लहानपणी छळणारा पैशाचा विचित्र विचार कुठून आला माहीत आहे का? युनियन्स म्हणजे श्रीमंत जुलमी मालक, पूर्वजन्मी तू अमेरिकेत होतास . अमेरिकन सिव्हिल वॉरमध्ये मालकांच्या अत्याचारविरुद्ध लढणार्यार कन्फेडरेट सैन्यातील एक सैनिक होतास ,त्यामुळेच तुला पैसा हा शत्रू वाटत असे...

होय गुरुजी ..माझी पैशाबद्दलची भीती कमी झाल्यासारखी वाटते आहे.

ठीक आहे. आता आजचे आपले काम संपले, आता उद्या पहाटे तीन वाजता पुन्हा आपल्याला नवीन प्रयोग करायचा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users