आयुष्याचे गाणे

Submitted by मामी on 7 February, 2013 - 22:38

खाऊन एक संतरा
गायला त्यानं अंतरा
मोजताना तालाच्या मात्रा
जाणवला त्याला खतरा

मग,

एकतालाच्या दीडपटीत
भेळ चापली चटपटीत
तान घेऊन येता सीमेवर
गाडी पकडली लटपटीत

धागीनती नक धीं, धागीनती नक धीं
तिरकीट धा, तिरकीट धा, धीं धीं

दरवाज्याचे कुलुप उघडता
बेसुरल्या ज्या बोल-ताना
फ्रीजचे पाणी पीता पीता
मनी गुंजला गोड अडाणा

सा रे म प, नि म प, सां
सां ध नि प, म प ग म, रे सा

बडा ख्याल मग रंगत जाई
सोबत व्हिस्की आणि चकना
अलंकार एकेक उतरले
होरी, धृपद, धमार, तराणा

नादिरदिरदा नी तदानी तोम, तनन तोम
नादिरदिरदा नी तदानी तोम, तनन तोम

तानपुर्‍याच्या जुळता तारा
'गम', 'मनी', विसरून 'सारे'
सुस्तावूनी मग सुखे झोपला
उद्या सकाळी दुसरे गाणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

काव्यलेखन कविता न येणार्‍यांची कविता कैच्याकै कवि ताटुकार कविता महान टुकार कविताविश्वस्य टुकारेस्ट कविता
<<<

Lol

अरे वा !!!

महान कविता.... मामी तु ह्या कवितांचा मुशायरा काढ..... मी नक्की येइन...

आयुष्याचे गाणे आवडले
"मनी गुंजला गोड अडाणा" ईथे मनी घुमला असे करा.
कारण अडाणा ताल आहे. सूर गुंजतो. ताल घुमतो.

आवडली.

ज्यांना ज्यांना ही कविता आवडलीये त्यांच्या साहित्यिक अभिरुचीबद्दल शंका घ्यायला भरपूर वाव आहे. Proud

उमेश वैद्य, अडाणा रागही आहे. मी त्या अनुषंगानं लिहिलंय. पण तरीही सुचनेबद्दल धन्यवाद. Happy

ज्यांना ज्यांना ही कविता आवडलीये त्यांच्या साहित्यिक अभिरुचीबद्दल शंका घ्यायला भरपूर वाव आहे. Proud >>>
Lol ..... कविता आवडली नाही असा प्रतिसाद द्यायचा का मग !!!!! ..... Wink Proud
असो ....
माझा प्रतिसाद, 'कविता न समजणार्‍यांचा प्रतिसाद' समजायला भरपूर वाव आहे Proud

कविता मजेदार झालेय.
शेवटच्या कडव्यातली शेवटची ओळ (गांभीर्याने वाचल्यास) एक वेगळाच अर्थ देऊन जाते असे वाटले.

धन्यवाद, धन्यवाद. Happy

रोज सकाळचे गाणे टाकलेस... तर प्राध्यापक होशील लवकरच ! >>>> अरे बापरे, दिनेशदा, नको नको. एक आहेत तेवढे बास.

Lol

मा>>मे.... काय चालवलंयस्..भार्रीच्चेस हां..
'ज्यांना ज्यांना ही कविता आवडलीये त्यांच्या साहित्यिक अभिरुचीबद्दल शंका घ्यायला भरपूर वाव आहे'"
Rofl Rofl Rofl