Submitted by प्राजु on 7 February, 2013 - 08:59
साद मी घालेन तेव्हा वाचवाया धाव नक्की
जाग विश्वासास त्या अन ईश्वरा मज पाव नक्की
त्रास होतो आठवांचा मग कशाला आठवावे?
तू मना आता स्वत:ला चांगले खडसाव नक्की
का तिथे कल्लोळ झाला, मी कहाणी सांगताना
ना कळे की घेतले कुठले असे मी नाव नक्की??
काल नाही, आज नाही, पण उद्याला ईश्वरा तू
सिद्द करण्याला स्वत:ला दे मलाही वाव नक्की
खेळ तू खेळी तुझी, मीही इथे केली तयारी
प्राक्तना, करणार आहे मी तुझा पाडाव नक्की!
संकटांना घाबरूनी घेतली माघार मी जर
आडवूनी तू मना बिनधास्त कर मज्जाव नक्की
स्वामिनी की कामवाली, की रती, वस्तू दिखाऊ?
एकदाचा काय आहे सांग माझा भाव नक्की..
-प्राजु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदरच.. सगळे शेर मस्त
सुंदरच.. सगळे शेर मस्त आहेत.
मात्र काही जुने खयाल नव्याने वाचून विशेष वाटत नाही हेही नक्की
स्वामिनी की कामवाली, की रती,
स्वामिनी की कामवाली, की रती, वस्तू दिखाऊ?
एकदाचा काय आहे सांग माझा भाव नक्की..<<< वा वा
chan Gazal .. Shevatcha sher
chan Gazal ..
Shevatcha sher lai bhari ..!
स्वामिनी की कामवाली, की रती,
स्वामिनी की कामवाली, की रती, वस्तू दिखाऊ?
एकदाचा काय आहे सांग माझा भाव नक्की..
अतिशय चांगला शेर!
स्वामिनी की कामवाली, की रती,
स्वामिनी की कामवाली, की रती, वस्तू दिखाऊ?
एकदाचा काय आहे सांग माझा भाव नक्की.. >>>>>> जबरी .....
सुरेखच एकदम....
सुरेखच एकदम....
भाव - उत्तम शेर आहे! मला
भाव - उत्तम शेर आहे!
मला मतलाही फार आवडला. 'नक्की' असं परत परत म्हणताना मला एक संशयाची 'हिंट' जाणवली... आणि त्यामुळे मजा आली!
खेळ तू खेळी तुझी, मीही इथे
खेळ तू खेळी तुझी, मीही इथे केली तयारी
प्राक्तना, करणार आहे मी तुझा पाडाव नक्की!
स्वामिनी की कामवाली, की रती, वस्तू दिखाऊ?
एकदाचा काय आहे सांग माझा भाव नक्की..
>>>>>सुरेख!!!!
भन्नाट ! पाडाव आणि भाव तर
भन्नाट !
पाडाव आणि भाव तर खूपच आवडले.
नाव असलेला शेर खयाल चांगला असूनही तितकासा भावला नाही.
फेसबुकवर वाचलीच आहे तिकडे
फेसबुकवर वाचलीच आहे तिकडे प्रतिसाद दिलाच आहे
इथेही खूप आवडलीच
शेवटचा शेर फार आवडला इतर
शेवटचा शेर फार आवडला
इतर शेरांमध्ये सफाई थोडी कमी वाटली.
इथेही खूप आवडलीच
>>
यात्रीजी तिथे मी एक शेर
यात्रीजी
तिथे मी एक शेर बदलून वाचला होता तो सांगीतला असतातर तुम्हाला अजून मोठ्याने हसता आले असते
का तिथे कल्लोळ झाला?...... मी उखाणा घेत होते......
ना कळे की घेतले कुठले असे मी नाव नक्की??
वा! मस्त झाली.
वा! मस्त झाली.
स्वामिनी की कामवाली, की रती,
स्वामिनी की कामवाली, की रती, वस्तू दिखाऊ?
एकदाचा काय आहे सांग माझा भाव नक्की..
विचार आवडला.
दुसरी ओळ फारच छान.
पहिली अजून चांगली करता येईल.
स्त्रीच्या हतबलपणावरचा माझा एक शेर आठवला
(ह्या शेरातही विचार मांडणीपेक्षा पुढचा आहे):
हा स्वतःवरचा तुझा विश्वास ढळणारा
सांगतो का मान्य तुजला बंधने माझी
समीर
प्राजु. आवडली गझल.
प्राजु. आवडली गझल.
त्रास होतो आठवांचा .... काल
त्रास होतो आठवांचा ....
काल नाही, आज नाही, .....
हे शेर अधिक आवडले.
"स्वामिनी की कामवाली, की रती, वस्तू दिखाऊ?
एकदाचा काय आहे सांग माझा भाव नक्की.." >>> यातला आशय खूप मस्त आहे
पण कामवाली आणि भाव हे शब्द इतर शब्द आणि आशय यांच्या बाजाशी
तितकेसे सुसंगत वाटले नाहीत. वैम. कृगैन.
शेवटचा शेर छान..! त्रास होतो
शेवटचा शेर छान..!
त्रास होतो आठवांचा मग कशाला आठवावे?
मला वाटते एखाद्या शेराची ही दुसरी ओळ म्हणून वापरली असती तर अधिक चांगली वाटली असती. (या गझलेत नव्हे.)
असो.
अजून एक सुचला शेर.. वंदिले
अजून एक सुचला शेर..
वंदिले नाही तुला मी जिंदगीच्या शेवटीही
पण तरीही पैलतीरी लाव माझी नाव नक्की !
वावा खुरसाले जमतय की वावा आता
वावा खुरसाले जमतय की वावा
आता ताव ठाव डाव गाव हाव राव असे काफिये योजून प्रयत्न करून पहा जमेल तुम्हाला
शुभेच्छा
धन्यवाद !!
धन्यवाद !!
छानै
छानै