मायबोलीकर वैभव जोशीं आणि सौमित्र यांची कविता बी.एम.एम.च्या व्यासपीठावर"

Submitted by अजय on 5 February, 2013 - 12:17

मराठी कविताविश्वातले नामवंत सौमित्र (किशोर कदम) आणि मायबोलीकर वैभव जोशी आपली कविता बी.एम.एम. (बृहन्महाराष्ट्र मंडळ)च्या आगामी अधिवेशनात सादर करणार आहेत. जुलै २०१३ मधे प्रॉव्हिडन्स, र्‍होड आयलंड इथं होणार्‍या बी.एम.एम.च्या १६ व्या अधिवेशनात त्यांचा 'एक मी आणि एक तो' हा कार्यक्रम होणार आहे. सुप्रसिध्द गझलगायक दत्तप्रसाद रानडे या दोघांच्याही कविता सादर करतील तर (संगीतकार/ संगीतसंयोजक) कमलेश भडकमकर यांचा वाद्यवृंद त्यांच्या साथीला असेल.
Ek-me-un-ek-to-FB.jpg

संवेदनशील कलावंत म्हणून कवी सौमित्र यांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवलेले आहे तर ताज्या दमाचे कवी-गीतकार म्हणून वैभव जोशी प्रसिध्द आहेत. या दोन कवींचे, त्यांच्या कवितेचे एकमेकांशी असलेले नाते 'एक मी आणि एक तो' या कार्यक्रमातून उलगडले जाते. एकमेकांच्या कवितांना पूरक आणि त्यांचे अर्थ पुढे नेणार्‍या तसेच अस्सल जीवनानुभव व्यक्त करणार्‍या कवितांची ही मैफल महाराष्ट्रात अनेक वेळा रंगली आहे. आता अमेरिकेतल्या रसिकांना बी.एम.एम.च्या व्यासपीठावर पहिल्यांदाच या मैफिलीचा आनंद लुटता येणार आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा!! अभिनंदन आणि शुभेच्छा! Happy

मी पाहिलाय हा कार्यक्रम.. दोघांचे कॉम्बिनेशन हा या कार्यक्रमाचा प्लस पॉइंट आहे..

वैभवचा फोटो 'आजचे युवा नेतृत्त्व' किंवा 'पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक' वै वाटतोय Proud

हा कार्यक्रम पाहिलेला आहे. संकल्पना वेगळीच आहे. दोघांचे काँबिनेशन त्यांच्या कविता प्रवाहीपणे रसिकांसमोर आणते. मला वाटते काव्य सादरीकरणातील नावीन्य हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. एक धागा पकडून प्रत्येकाची एक एक कविता असे पूर्वी कोणी केलेले नसावे असे वाटते.

या कार्यक्रमाची निवड होणे औचित्यपूर्ण आहे. Happy

धन्यवाद.

मी बघितला आहे हा सुंदर कार्यक्रम. कवितांच्या सादरीकरणातलं नाविन्य आणि वैभव-सौमित्र च्या भिडणार्‍या, उत्कट कविता बीएमएमच्या प्रेक्षकांची मनं जिंकतील हे नक्की. Happy

मायबोली प्रशासनाचे मनःपूर्वक अभिनंदन या कार्यक्रमाची निवड करण्याबद्दल!>>
कार्यक्रम माझ्यामते TMM ने निवडला आहे मायबोली प्रशासनाने नाही. Happy

कार्यक्रम माझ्यामते TMM ने निवडला आहे मायबोली प्रशासनाने नाही. <<< ओके Happy

मला ते समजले नव्हते. संपादीत करतो. धन्यवाद. Happy

जबरी कार्यक्रम आहे, उसगावकरांनो नक्की बघा. Happy

फोटोंच्या क्वालिटीमुळे बॅनर खरोखर गंडला आहे.

भाई,
वैभव, सौमित्र येणार आहेत.
ज्यांनी हा कार्यक्रम पाहिला आहे, त्यांनी त्यातल्या कुठल्या गोष्टी जास्त आवडल्या ते प्लीज सविस्तर लिहा. एखादी गोष्ट कमी आवडली असेल तर तसेही लिहा.

लोकहो, वैभव फारसा इथे येत नसला तरी त्याच्या शब्दांची जादू अद्याप विस्मृतीत गेली नाही. वैभवच्या कविता त्याच्याकडूनच ऐकण्याची, त्याला प्रत्यक्ष भेटण्याची संधी दवडू नका. अधिवेशनासाठी नावनोंदणी केली नसेल तर आजच करा. Happy

वैभव-सौमित्र पण येणार आहेत का? <<< हे मराठी खोचकपणे विचारलेले आहे... Proud
मी ऐकून वृत्तांत टाकीन <<< का? डोळे उघडे ठेवत नाही का तुम्ही? (कार्यक्रम ऐकताना) Proud

अभिनंदन आणि शुभेच्छा! Happy

आधीच्या या नाही, पण अशाच दुसर्‍या कार्यक्रमाचे काही इन्फॉर्मल वृत्तांत इथे आहेत, त्यावरून कल्पना यावी.

Pages