होऊन उलटे बने अवकाश झोळी

Submitted by प्रेरीत on 3 February, 2013 - 20:15

कशा व्यक्त होती माझ्या ओळी
होऊन उलटे बने अवकाश झोळी.

असलेच तम तरी दिसे चांदणे...़
जर आलेच रडू तर नभ दाटणे.
सारे कसे हाताशीच आह्रे, माझे असे घर चंद्रमौळी...

फिरली आतून जरी, पात धारधार
दुखणार नाही अशी जखम उदार!
सारे कसे अपेक्षित आहे,कृष्णाने दिलेली मला करंगळी...

जरा अर्थ यावा उद्याला आज
म्हणून झाकली मी जराशीच लाज...
सारे कसे अनाहूत आहे, तरी भारते ही कंठपोकळी...

नसे सेतूला जहाजाची जाण
कुठे अडकलेत दोन तीरांचे प्राण?
सारे कसे समाधान चित्ती, माझी प्रार्थना किती मोकळी..

कशाला विषण्णसा बसलास रे
सावलीतही पडती कवडसे बरे...
खरे सांगतो खरे बोल हे,नसे बात ही वेंधळी आंधळी...

--रोहन्ता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आभार महेश!तुम्ही दिलेली ही दाद जेवढी प्रामाणिक तेवढीच कविताही...
ंमला वाटतं की हा प्रामाणिकपणा काव्यात आला यातच खुप काही समजलं.
धन्यवाद!

संपादित.

छाने.

मुंबईची गाडी पकडून आंबेजोगाईला जात असल्यासारखे वाटले.

बाजीराव साहेब काही कळलं नाही हो...कविता चांगली नसेल तर सांगा ना तसं...>>>>.अहो हे तिसरे बाजीराव आहेत,सगळ्यांना मारत सुटलेत.मला हि दोन फटके बसलेत .त्यांना Respect द्या ,बस्स बाकी काही नाही.

कविता छान आहे .

कविता छान वाटली
यात अंतरा मुखडा असा गीत हा फॉर्म वापरताना लय-वृत्त पाळायला हवे होते तुम्हाला जमले असते नक्कीच

बहुधा तुम्हालाही जाणवले असेलच हे म्हणूनतर अपण जी ओळ शीर्षकासाठी वापरली ती तुमच्याकडून निवडली गेली असावी

होऊन उलटे बने अवकाश झोळी (गागालगागा लगा गागालगागा).......हाच इफेक्ट कवितेत मिस केला मी

असो
कविता आवडली

राजीवजी,विक्रांतजी धन्यवाद!
विक्रांतजी आपली सुचना समजली.ध. Happy
वैभव मी विचार करेन वृत्तात बसवण्याचा...
सार्‍यांच्या प्रोत्साहनांनी धीर वाढला आहे.धन्यवाद...आपल्यालाही शुभेच्छा!