ज्वेलरी मेकिंग क्लास ची माहिती हवी आहे (ठाणे,मुलुंड)

Submitted by मोहन की मीरा on 4 February, 2013 - 05:53

ठाण्यात किंवा मुलुंड मधे इमिटेशन ज्वेलरी ( दागीने) बनवण्याचं प्रशिक्षण देणारा क्लास हवा आहे. एका महिन्या नंतर जॉइन करायचा आहे. ज्वेलरी मग त्यात बीड्स, कुंदन, मोती इतर खडे इत्यादी सगळे आले....

माहिती असल्यास कृपया इथे शेअर करा....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जस्टडायल.कॉमवर विपुल आर्ट क्लासेस नावाचा श्रीरंग सोसायटीजवळचा क्लास सापडतोय. तिथे नंबर पण आहे. तिकडे सर्च कर.

धन्स.... मंजू

पण इतरही काही ऑप्शन आहेत का? मला गुगलुन फक्त हाच नंबर मिळाला होता.... कोणी माहितीत असेल तर चांगलच....

परवा देवदयानगर, उपवन ठाणे येथे 'वुई वुमन' या ऑर्गनायजेशनच्या केक डेकोरेशनच्या सेमिनारला मी गेले होते. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या इतरही कोर्सेसची यादी दिली आहे. त्यात ज्वेलरी मेकिंग आहे. मनिषा ओगले या तो कोर्स घेतील. तुम्हाला हवे असल्यास त्यांचा फोन नंबर माझ्याकडे आहे.

शिप्रा...

माझ्या विपुतुन किंवा संपर्कातुन मेल वर देणार का?

रच्याकने.....

ह्या मनिषा ओगले खुप बारीक आहेत का? बहुतेक हे नाव ऐकलेले आहे.... माझ्या ऑफिस मधे पुर्वी एक जण होती... नवरा भारत सहकारी बँकेत आहे का?

शिप्रा...

धन्स....

मी बोलले... तीच ती... तुमच्या मुळे मला माझी मैत्रिण मिळाली.... कदाचीत आपण भेटुही तिच्या कडे .... दुनिया गोल है......

मी ज्वेलरी मेकिंगचा कोर्स अर्धा केला आहे. त्यात मी दोन प्रकारचे नेकलेस केले आहेत. पण काही कारणाने मला तो कोर्स कंटीन्यु करता आला नाही. ऑनलाइन एखादी चांगली लिंक किंवा कोर्स आहे का ह्याचा कुणाच्या माहीतीत?

नक्की काय शिकवतात या कोर्सेसमधे?
ज्वेलरी मेकींग हा शब्द इतका अवाढव्य स्कोप असलेला आहे. हा जनरलाइज्ड/ कॉम्प्रिहेन्सिव्ह ज्वेलरी मेकिंगचा कोर्स किमान दोन वर्षांचा फुलटाइम तरी असायला लागेल.

नी मी विदाऊट डिग्रि म्हण ना असा कोर्स केला होता. एक मुलगी घरी शिकवत होती तिच्याकडे. तिने मला दोन सरींचा नेकलेस, स्प्रिंगचा नेकलेस शिकवला. उद्या फोटो टाकेन. बांगड्या आणि कानातल्यांचे सामान आणले होते पण मला नंतर नाही जमले. ते सामान अजून आहे माझ्याकडे. त्याचाच वापर करायचा आहे म्हणून मी यु ट्युब वर सर्च करते पण मला काही मिळत नाही.

महाराश्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री काला घोडा फोर्ट येथे फोन करा.तिथे महिला विभाग आहे व असे ट्रेनिन्ग देणार्‍यांची लिस्ट उपलब्ध आहे ते देखील अर्ध्या दिवसांचे वगैरे ट्रेनिन्ग देतात. जास्तिकरून मोत्यांचे दागिने वगैरे.

मायबोली वर वेल म्हणून आहे तिला विचारा.

मुलुंडात हंसा आर्ट्स आहे व इतरही खूप क्लासेस आहेत. शोधले पाहिजे.