Submitted by तिलकधारी on 31 January, 2013 - 05:16
रचला तुझ्यावरती पुन्हा अल्लड तराणा
उडला पुन्हा परिपक्व दु:खांचा खकाणा
दारातल्या कुत्र्यापुढे पडताच पोळ्या
दारातुनी गेला भिकारी दीनवाणा
मुर्दाडतेची धाप हे आयुष्य आहे
जन्मास येणे फक्त मृत्यूचा बहाणा
बसतात काही पारवे खिडकीत माझ्या
बाकी दिवस जातो तसा कंटाळवाणा
कित्येक वर्षांनी कळाले की म्हणे ती
घेते अधेमध्ये चुकुन माझा उखाणा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा! मतला बहोत खूब. सगळी
व्वा! मतला बहोत खूब.
सगळी गझलच आवडली.
उखाण्याच्या शेरातल्या 'चुकुन' ह्या शब्दाची गंमत काही औरच वाटली.
धन्यवाद!
उखाणा "लाजवाब"
उखाणा "लाजवाब"
दारातल्या कुत्र्यापुढे पडताच
दारातल्या कुत्र्यापुढे पडताच पोळ्या
दारातुनी गेला भिकारी दीनवाणा
बसतात काही पारवे खिडकीत माझ्या
बाकी दिवस जातो तसा कंटाळवाणा
सुंदर.
यात रदीफ कुठेय.
यात रदीफ कुठेय.
रचला तुझ्यावरती पुन्हा अल्लड
रचला तुझ्यावरती पुन्हा अल्लड तराणा
उडला पुन्हा परिपक्व दु:खांचा खकाणा
बसतात काही पारवे खिडकीत माझ्या
बाकी दिवस जातो तसा कंटाळवाणा<<<
आवडले.
माबोवर स्वागत!
परिपक्व दु:खांचा खकाणा - वा वा
सुंदरच... पारवे अफलातून!
सुंदरच... पारवे अफलातून!
दमदार >> मुर्दाडतेची धाप हे
दमदार
>>
मुर्दाडतेची धाप हे आयुष्य आहे
जन्मास येणे फक्त मृत्यूचा बहाणा
बसतात काही पारवे खिडकीत माझ्या
बाकी दिवस जातो तसा कंटाळवाणा
हे shockingly beautiful!
>> बसतात काही पारवे खिडकीत
>>
बसतात काही पारवे खिडकीत माझ्या
बाकी दिवस जातो तसा कंटाळवाणा
<<
मस्त!
सुंदर गझल...
सुंदर गझल...
बहोत अच्छे ! सगळेच शेर
बहोत अच्छे !
सगळेच शेर लाजवाब!
स्वतःच स्वता:ला प्रतिसाद
स्वतःच स्वता:ला प्रतिसाद म्हणजे जरा अतीच! असो... छान आहे.
बेफिकीर.... >>>> आवडले.
बेफिकीर....
>>>>
आवडले.
माबोवर स्वागत!
परिपक्व दु:खांचा खकाणा - वा वा
<<<<<
बेफिकीर यांच्याशी सहमत.
एक च नम्बर
एक च नम्बर
गझल मस्त आहे !! उखाणाचा शेर
गझल मस्त आहे !!
उखाणाचा शेर अप्रतिम !!
खूप आवडली सर्वांशी सहमत पारवे
खूप आवडली सर्वांशी सहमत
पारवे सर्वाधिक आवडला
अख्खी गझल अप्रतीम आहेच !
खूपच सुंदर ! शेवाळलेले शब्द
खूपच सुंदर !
शेवाळलेले शब्द नसल्यामुळे अधिकच आवडली .
मस्त!
मस्त!
पारवे मस्तच!
पारवे मस्तच!
मस्त गझल !
मस्त गझल !
सुंदर गझल... बसतात काही पारवे
सुंदर गझल...
बसतात काही पारवे खिडकीत माझ्या
बाकी दिवस जातो तसा कंटाळवाणा
अप्रतिम शेर...
आवडली !
आवडली !