लग्नामधे वधु-वरच्या करवलीने कशी मेक्-अप करावी?

Submitted by प्रगती जाधव on 22 January, 2013 - 01:17

आपल्याला नेट वर लग्नामधे वधु-वरच्या मेक्-अपची माहिती भरपुर मिळते, पण वधु-वरच्या करवलीने कशी मेक्-अप करावी? हे कुठेच मिळत नाही.......
कारण वधु-वरच्या करवलीची मेक्-अप ही छानच असावी लागते.....
थोडि हेर्-स्टाइल/ चेहर्याच्या मेक्-अपची माहिती टाकावि.......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षे +१

उलट करवलीने / करवला ह्याने ज्यास्त छान मेकअप /गेटाप करून आजूबाजूला घुटमळत उभे रहावे नवरीच्या....
आता नवरी-नवराचा बार तर उडालेला असतो. तेव्हा करवलीकडेच/करवला ज्यास्त बघणार... Proud

करवलीची मेक्-अप ही >>>>

काय हे मराठी? "मेक-अप" हा शब्द स्त्रीलिंगी आहे हे मला आजच समजले.... "ती" मेक-अप....आहो हेअर स्टाईल "ती" असते. मेक-अप " तो" असतो.....

करवलीने कशाला मेक-अप करायला पाहिजे? दक्षी +१

आहो करवलीचे वय काय, रंग काय, स्कीन टोन काय, उंची काय, बारीक की जाडी, हे अनेक प्रश्न सोडवल्या शिवाय काय उत्तर देणार? परत आपण कशा दिसतो हे प्रत्येक बाईला/ मुलीला माहित असते. त्या मुळे मस्त आवडेल तसा पोषाख करा, हलका मेक-अप करा, इझी रहा, हसत मुख रहा, छान दिसाल....

नवरीलाही बेताने मेक-अप करा, नाहीतर बहुतेक पहिल्यांदा मेक-अप केलेल्या नवर्‍या अतिषय विनोदी आणि हास्यास्पद दिसतात.....

दक्षे Rofl

हेच लिहायला आलेले Lol

मोकामि अस काही नाही अग
करवली पण मस्त दिसलीच पाहिजे की..... Wink

मला यातलं काही कळत नाही सो माझ्याकडून टिप्स नाहीत Happy

रिया...

अगं म्हणुनच लिहिले... "नव वधुचा मेक-अप" सारखी " करवलीचा मेक-अप" अशी काही संकल्पना नसते ग... असं कसं कोणी सांगणार की नव वधुचा हा साज केलात ना .. आता करवलीचा असा करा.... फार तर नवर्‍याचा सांगु शकु....

नव वधुचा हा साज केलात ना .. आता करवलीचा असा करा.>>> मीरा असंही असत कॅथलिक लग्नांमधे. ब्राइडच्या पोषाख आणि मेकअपशी सुसंगत ब्राइडमेड्स चा मेकअप आणि पोषाख असतो.

आणि करवली खास असते ग लग्नात तिला मेकअप हवाच. आणि ते पहिल्यांदा मेक-अप केलेल्या नवर्‍यांबद्दल तर अगदी अगदी Happy

हं! अ‍ॅग्री
पण मे बी तिला अस विचारायचं असेल की करवली ने काय पेहराव करावा Uhoh ( बस एवढाच अर्थ आणि प्रयोजन आहे का या धाग्याचं? Uhoh )

मुळात छान दिसणे हे मेक-अप वर अवलंबुन नसतेच.... मेक-अप फक्त तुम्हाला "फील गुड" होण्या साठीच वापरावा...कित्येकदा माफक मेक-अप केलेल्या वधु इतक्या गोड दिसतात....

मुळात आपलं लग्न झालय ही भावनाच तुम्हाला सुंदर दिसायला मदत करते... मेक-अप, हेअर स्टाइल... वगैरे ह्या वर वर च्या गोष्टी आहेत...

माझ्या लग्नातही मी अगदी माफक मेक-अप केला होता. केस लहान असल्याने काहीही करायचा प्रश्न नव्हताच.. त्या मुळे एकदम इझ मधे होते. एकंदर मनातल्या खुशी मुळे फोटो मस्त आले आहेत... परत फोटोग्राफर आमचा मित्रच होता त्या मुळे त्याने अगदी इझी आणि कंफर्ट झोन मधे फोटो काढले....

पहिल्यांदा मेक-अप केलेल्या नवर्‍या अतिषय विनोदी आणि हास्यास्पद दिसतात.....::::>>>> ++++++++++१११
आमच्या इथे नवरी बरोबर करवली ने पण भयानक मेक-अप केल्याने अजिबात ओळखु येत नवती

आहो.... माझ असा प्रश्न्न होता की.
नवर्या-नवरी च्या बाजुच्या लोकान्चि तयारि कशी असावि?जर ते लग्न घरातले
असेल तर?????
लग्न घरातले असेल तर मेक-अप नाही करत का?

रीया.........
तुला माझ प्रश्न्न बरोबर समजला आहे कि,
करवली ने काय पेहराव करावा?
आता सख्य्या भावाचा लग्न असेल तर बहिणीने चान्गलि तयारी करु नये?

प्रगती,
असा डिफॉल्ट उत्तर कसे द्यायचे.. पण, बघ माझी मतं देतेय...

सुंदर लाचे मिळतात एथनिक, शिवूनही मिळतात- त्यावर ओढणी घालताना स्टाईलीश घ्यावी, लूक इंप्रूव्ह होतो आणि हिल्सच्या सँडल्स किंवा ट्रॅडिशनल आऊटफिट कॅरी करण्यास आवडत असेल तर साडी हा सर्वांत सुंदर ऑप्शन आहे... त्याला साजेशी अ‍ॅक्सेसरीज घेतली की साज चढतोच.. जनरली साडी नेसली की फ्रेंच रोल छान वाटतो (सोपी आणि फास्टेस्ट हेअरस्टाईल) लांब केस असतील तर "पान" हेअरस्टाईल प्रकार फार सुशोभनीय आहे.

जितका लाईट मेक अप असेल तितके छान वाटते (स्टेजवर नवरा मुलाच्या/ मुलीच्या मागे उभे असताना फुल टाईम फोकस असतो, चेहरा चांगला दिसतो लाईट मेक अप नेच Happy ), थरांवर थर लावून मुळचा चेहरा काहीसा वेगळाच वाटतो. डोळ्यांना हलका मेक- अप उठाव आणतो, आय शॅडो, लाईनर इ.

ऑन अ सिरियस नोट नवरा नवरी सोडून इतरांनी (करवला/ली पण त्यातच) काय तयारी करावी आणि काय करू नये हा त्यांचा प्रश्न आहे, त्यासाठी कोणतीही नियमावली नाही. भारंभार मेकप आणि हेवी साडी नेसून करवली डोळ्यात आणि कॅमेर्‍यात भरेलच असं नाही. अती झालं की हसूच येतं.
त्यामुळे इतरांनीच नव्हे तर नवरा नवरीने सुद्धा स्वत:ला झेपेल इतकं, शोभेल ते आणि खिशाला परवडेल अशीच तयारी (सोंगं) करावी हे माझं मत.

प्रगती, तुम्ही एखाद्या उत्तम पार्लर मध्ये ब्रायडल पॅकेज मिळते तिथे चौकशी केलीत तर मदत होईल.
वधूचे पॅकेज लग्नाच्या दोन तीन महिने सुरू करतात. स्किन, हेअर टीथ सर्व ट्रीट मेंट उपलब्ध असतात. त्याच बरोबर किती करवल्या आहेत त्यांचे ही पॅकेज वर्क आउट करून मस्त डील पदरात पाडून घ्या. पार्लरवालीच छान साडी नेसवून देते. सवय नसल्यास त्यांची मदत होईल. सर्वांची एक थीम करता येईल. हळद, संगीत, लग्न , रिसेप्शन आधीची केळवणे व मग नंतरच्या पूजा ह्या सर्व वेळी काय कपडे मॅच्जिन्ग दागिने हे सर्व आधी कोऑर्डिनेट करून सेट बनवून बॅगेत भरा करवलीला फार काम असते तेव्हा आयत्यावेळी पिना वगैरे सापड्त नाहीत. गोंधळ होईल. नवरा नवरीच्या ड्रेसला को ऑर्डिनेटेड साडी नेसली तर छान दिसेल. तिची ऑरेंज आणि आपली जांभळी असे शक्यतो नको. दोघी वॉर्म शेड नाहीतर कूल शेड असे करता येइल. कपड्यांसाठी डिझायनर असेल तर त्यांच्या सूचना अवश्य घ्या. धिस इस द बेस्ट डे ऑफ द कपल्स लाइफ. लुक युअर बेस्ट.

मेक अप, हेअर आणि आऊटफिट ची आधी पूर्ण ट्रायल घ्या. मगच फायनल लुक ठरवा.
खूप काहीतरी वेगळा प्रयोग टाळावा.
करवली असेल तर बहुतेक वेळा तिने आधी कधीही समारंभासाठी हेवी & कम्प्लीट मेक अप केलेला नसतो. त्यामुळे दिवशी खूप अवघडल्या सारखे वाटू शकते. जनरली सर्व गोष्टी नव्या कोऱ्या असतात त्यामुळे टोचणे, गरम होणे असे होवू शकते.
Bride साठी trial असतेच पण करवलीला सुद्धा धागा काढण्या इतकी नटायची हौस असेल तर trial is must.

साधे नॅपकिन्स, पिनांचे घोस, हेअर क्लिप्स नेल पॉलिश रिमुव्हर, क्लिन्सिन्ग मिल्क, कॉटन बॉल्स हे सर्व सहज मिळेल असे एका लेडीज किट मध्ये ठेवा. व्हिडिओ शूट असल्यास फार घाम वगैरे येतो मेकप मुळे.

करा दिवा नीट धरा त्यात तेल असते ते पडून साडीवर डाग पडू शकतात. करवली मंजे मेड ऑफ ऑनरच की.

दक्षे Lol
मामी, अगदी बरोबर, दिवा नीट धरणे आवश्यक.
आपणही रान्गेत आहोत.. असे समजेल इतपत मेक अप असावा! नै का?
[रान्ग म्हणले की मला आपली शाळेतली पीटीच्या तासाची रान्ग आठवली - उभे आडवे समोर हातवारे करणारी शाळकरी कार्टी... तसेच इकडेही... पापण्यान्ची फडफड करीत उभे आडवे तिरपे समोर असे कटाक्ष टाकणारी, उगीचच कपाळावर लोम्बणारी केसाची बट अथवा शेपटा मानेला हलकासा हेलकावा देत नजरेत भरेल असा उडविणारी, दोन्ही हातानी दिवा धरलेला असूनही विनाकारण चुळबुळ करीत शेजारणीला हाताच्या कोपराने ढुशा मारणारी इत्यादी इत्यादी Wink ]

लग्नात नवऱ्यामुली इतकेच करवल्यांकडे तरुण वर्गाचे आणि त्यांच्या पालकांचे लक्ष असते हे मी अनेक लग्नात अनुभवले आहे.

करवली आहात म्हणजे मेकअपच्या बाबतीत खूप लकी आहात हे लक्षात ठेवा. कारण लग्नात नवरीमुलीच्या मेक अप मध्ये खूप लिमिटेशन्स असतात. कारण लग्न हा एक पारंपारिक सोहळा आहे आणि काही बाबतीत आपल्याला मेकअपमध्ये फार प्रयोग करता येत नाहीत.

उदाहरणार्थ लग्नात नवऱ्यामुलीला आवडत नसला तरी नॉर्मलपेक्षा किंचित गडद मेकप करावा लागतो. इमिटेशन ज्वेलरी खूप छान match होत असली तरी अजूनही लग्नात नवऱ्यामुलीने खोटे दागिने घालण्याबाबत अनेकजण नाखूष असतात. गजरा इत्यादी आवडत नसेल तरी कितीही चांगल्या हेअर स्टाईल मध्ये "तिकडच्या" बाजूचे कोणीतरी येउन गजरा खोचुनच जाते. केस मोकळे सोडावेसे वाटले तरी हार घालणे/ मंगळसूत्र घालणे इत्यादी लक्षात घेता केस मोकळे सोडता येत नाहीत, चित्रपटात कितीही दाखवले तरी तसा लेहंगा वगैरे अजून मराठी लग्नात घालत नाहीत. साडीच नेसतो आपण (त्यासुद्धा डिझायनर नाही, पारंपारिक, त्यातही शक्यतो शालू) इत्यादी इत्यादी.

त्यामुळे पुन्हा एकदा... करवली आहात म्हणजे मेकअपच्या बाबतीत खूप लकी आहात. तुम्ही काही नवीन गोष्टी ट्राय करू शकता. छान छान लेहेंगे, डिझायनर साड्या, कम्फर्टेबल असाल तर नेटची साडी, चवळीची शेंग असाल तर रेडीमेड साड्या इत्यादी नेसू शकता. छान हलकाच मेकप करा. जास्तीत जास्त यंग दिसा. जाड असाल तर खूप वर्क वाल्या फुगणाऱ्या आणि तरंगणाऱ्या साड्या नेसण्यापेक्षा मस्त अंगासरशी बसणाऱ्या वर्क वाल्या जॉर्जेट वगैरे ट्राय करा.

डोळ्यासमोर एक अंदाज म्हणून हिंदी कार्यक्रमांच्या (डीसेंट) सूत्र संचालिका ज्या प्रकारच्या कपडे व मेकप करतात त्यांना फॉलो करू शकता.

हेही पहा:

१. http://goo.gl/8VC8z

२. http://goo.gl/4BNDv

३. http://goo.gl/2n6rx

(इथे bridal वेअर लिहिले असले तरी मला बरेचसे करवलीने वापरण्यासारखे वाटले.)

अजून काही अनुभवातून आलेल्या टिप्स :

१. मेकप किंवा कपडे अगदी सुटसुटीत आणि ज्यात तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल असेच करा. लग्नात करवलीला खूप मान असतो तसं खूप काम सुद्धा असतं. इकडे तिकडे पळापळ करतांना, १० वेळा स्टेजच्या पायऱ्या चढता-उतरतांना पायात काहीही अडकेल असे नको.

२. केस मध्यम लांबीचे असतील आणि उन्हाळा नसेल तर मोकळे सोडा. नाहीतर मोकळे केस घामाने अतिशय बेजार करतात. (अगदी थंडीचा सिझन असला तरी स्टेजवर व्हिडीओ शुटींग वाले जो लाईट मारतात त्या उष्णतेने कदाचित एखादे अंडे उबु शकेल इतकं गरम होतं). Sad

३. सकाळी एकदाच जो काही मेकप कराल त्याला नंतर बदलायची/टचअप करायची संधी मिळेलच असे नाही. त्या दृष्टीने तयारी ठेवा.

४. काही लग्नांमध्ये करवलीला सुद्धा काचेचा चुडा/ बांगड्या भरतात. तो साडीवर match होत नसल्यास आधीच मोठ्या मापाचा स्वत:ला काढ-घाल करता येईल असाच भरा. आणि लग्नात साडीतल्या २ रंगांना match होईल अश्या मेटलच्या नाजूक पण चमचम बांगड्या (जास्तीत जास्त) घालायला विसरू नका.

दिवसभर भरपुर सामान जवळ बाळगावं लागणार असेल तर ड्रेस्/साडीला मॅच होइल अशी थोडी मोठी आणि सामान बसेल अशी पर्स मस्ट आहे

Pages