मोह... ( झब्बु )

Submitted by वर्षा_म on 17 January, 2013 - 23:46

बागेश्रीच्या या कवितेला झब्बू
http://www.maayboli.com/node/40342
==================================

एखाद्या शेअरने उच्चांक गाठला,
की बाजारावरची पकड सुटण्याचीच भिती जास्त!

ते भावच मोहक.
कधी उच्च्चांकाचे, कधी निचाकांचे..

कधी हा भाव इतका कमी की,
सारासार विचारांना तेव्हा सरळ बाजूला सारून कर्जाने त्याला विकत घ्यावे..

तर कधी,
खरेदी-विक्रीची आकडेमोड करुन होते...
अकाउंटचा बॅलंस संपुन जातो,
अशा वेळी बाजारातुन बाहेर पडण्याची उसनी धडपडही न करण्याचा मोह!!

मात्र हा 'मोह' आपल्यापासून वेगळा होताना घेऊन जातो... आयुष्यभराच सगळं कमावलेलं!

मग वाटतं,
असे मोहाचे क्षण टोलवता आले पाहीजेत..

म्हणजे त्यांचा आपल्याला स्पर्शही होणार नाही
पण परिणाम तर नाहीच नाही....!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणजे त्यांचा आपल्याला स्पर्शही होणार नाही
पण परिणाम तर नाहीच नाही....!>>> भन्नाट!! Lol

_/\_ स्वीकारा माते !!! Happy