स्मरण धागा - जयंती व पुण्यतिथी

Submitted by माणुस on 12 January, 2013 - 07:04

महान लोकनेते, समाज सेवक आणी समाजसुधारक यांच्या आठवणीसाठी आणी नमनासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१२ जानेवारी - आज १५० वी जयंती स्वामी विवेकानंदांची! त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण.

• So long as the millions live in hunger and ignorance, I hold every man a traitor who, having been educated at their expense, pays not the least heed to them.
• Whatever you think, that you will be. If you think yourselves weak, weak you will be; if you think yourselves strong, strong you will be.
• If you have faith in all the three hundred and thirty millions of your mythological gods, … and still have no faith in yourselves, there is no salvation for you. Have faith in yourselves, and stand up on that faith and be strong; that is what we need.
• Strength, strength it is that we want so much in this life, for what we call sin and sorrow have all one cause, and that is our weakness. With weakness comes ignorance, and with ignorance comes misery.
• Religion is realization; not talk, not doctrine, nor theories, however beautiful they may be. It is being and becoming, not hearing or acknowledging; it is the whole soul becoming changed into what it believes.
• Teach yourselves, teach everyone his real nature, call upon the sleeping soul and see how it awakes. Power will come, glory will come, goodness will come, purity will come, and everything that is excellent will come when this sleeping soul is roused to self-conscious activity.
• It is love and love alone that I preach, and I base my teaching on the great Vedantic truth of the sameness and omnipresence of the Soul of the Universe.

स्वामी विवेकानंदांच्या १५०व्या जयंतीनिमित्त त्यांचे आणि त्यांच्या विचारांचे स्मरण अत्यावश्यक आहे.

“Shivaji was one of the greatest national saviors who emancipated our society and our Dharma when they were faced with the threat of total destruction.

He was a peerless hero, a pious and God-fearing king and verily a manifestation of all the virtues of a born leader of men described in our ancient scriptures.

He also embodied the deathless spirit of our land and stood as the light of hope for our future”

- Swami Vivekananda.

१२ जानेवारी - राजमाता जिजामाता भोसले यांची आज जयंती.

स्वराज्याचे २ छत्रपती घडवणार्‍या या मातेस विनम्र आदरांजली...

श्री शंभो शिवजातस्य, मुद्रा धौरिव राजते| यदंकसेविनो लेखा, वर्तते कस्य नोपरि||

... छत्रपती शिवाजी राजे यांचे पुत्र श्री. संभाजी राजे यांची मुद्रा आकाशाप्रमाणे शोभत आहे. तिचा आधार घेणार्‍यांचा पगडा कोणावर पडणार नाही?

मराठ्यांचा दुसर्‍या छत्रपतीस मानाचा त्रिवार मुजरा...

राजीव गांधी (२० ऑगस्ट इ.स. १९४४ - २१ मे इ.स. १९९१) .राजीव गांधी ह्या सर्व भारतीयांच्या लाडक्या नेत्याची आज पुण्यतिथी.लोकमत ह्या वृतपत्रात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. तो लेख मायबोलीकरांसाठी.........
राजीव गांधी - आठवणीतला निर्मळ झरा
(21-05-2013 : 00:27:01)

जेथे जन्म आहे तेथे मृत्यू निश्‍चित आहे. ज्यांनी जगाला दिशा दाखवली -नवीन विचार दिला , लोकसेवेसाठी स्वत:ला झोकून दिले अशा नेत्यांच्या विषयी विचार केला, तर अशा असामान्य नेत्यांचे मरणदेखील असामान्य पद्धतीनेच घडल्याचे दिसून येते. अब्राहम लिंकन, बेनझीर भुत्ताे, संजय गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा मृत्यू अकाली, भीषण आणि देशसेवेसाठी काहीतरी करायचे ही इच्छा प्रबळ असताना झाला. यांच्या मृत्यूची दखल जगाने घेतली. हृदयाचा थरकाप उडविणारे आणि मनाला चटका लावणारे मृत्यू प्रामाणिक नेत्याला अमर करून जातात. राजीव गांधी यांच्या निधनाला आज २२ वर्षे होत आहेत. २१ मे १९९१ ची रात्र भारतासाठी काळरात्र ठरली. देशाने सळसळत्या रक्ताचा तरूण नेता गमावला. सुसंस्कृतपणा, अभ्यासूपणा व प्रामाणिकपणा याचा अनोखा मिलाफ घेऊन राजीवजी जन्माला आले होते. फिरोज गांधी व इंदिरा गांधींचे ते ज्येष्ठ पुत्र होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण डेहराडून येथील शाळेत, तर उच्च शिक्षण लंडन येथील इम्पिरियल कॉलेज येथे झाले. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतून त्यांनी इंजिनिअरची पदवी घेतली. भारतात परतल्यावर इंडिअन एअर लाइन्स मध्ये त्यांनी वैमानिक म्हणून काम करायला सुरुवात केली. एवढा काळ सोडला, तर पुढच्या आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टी या त्यांनी कर्तव्य म्हणून केल्या.
२३ जून १९८0 रोजी पिटस जातीच्या दोन आसनी विमानातून अवकाशात उड्डाण करताना झालेल्या अपघातात संजय गांधी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने इंदिरा गांधी यांच्यावर प्रचंड आघात झाला. विमानावरचा त्यांचा विश्‍वास उडाला. विमान म्हणजे अपघात, अशी भीती मनात बसल्याने त्यांनी राजीव गांधींना वैमानिकाची नोकरी सोडायला लावली. इंदिराजींनी ज्या प्रमाणे नेहेरूंना साथ दिली होती त्या प्रमाणे राजीवजींनी सक्रिय राजकारणात प्रवेश करून इंदिराजींना साथ द्यावी, असा दबाव पक्षात येऊ लागला. लोकभावनेची दखल घेत संजय गांधी यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अमेठी लोकसभा मतदारसंघातून राजीव गांधी यांनी १९८१ मध्ये निवडणूक लढवली व जिंकली. निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी राजीवजी देशभर कार्यक्रमाला उपस्थित राहत होते. कार्यकर्त्यांना भेटत होते . १९८४ मध्ये पश्‍चिम बंगालमधील कोलाघाटच्या दौर्‍यावर असताना इंदिराजींवरील प्राणघातक हल्ल्याची महिती त्यांना गुप्तचर अधिकार्‍याने दिली. पुढे इंदिराजींच्या दुर्दैवी मृत्यूनंतर कॉँग्रेसजनांच्या दबावापायी राजीवजींना पंतप्रधानपदाची शपथ घावी लागली. देशाला ४0 वर्षे वयाचा तरूण पंतप्रधान मिळाला.
बाते कम काम जादा या गांधी घराण्याच्या घोषवाक्याप्रमाणे राजीवजींनी कामाला सुरुवात केली. राजकारण म्हणजे सत्ता व पैसे हे कुसूत्र राजीवजींना मान्य नव्हते. त्यांनी भ्रष्टाचार दूर करण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले. प्रसंगी स्वत:च्या सरकारवरही टीका केली. ते तंत्रज्ञानप्रेमी होते. आपली टीम बनवताना त्यांनी निरनिराळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांची निवड केली. ज्यात सॅम पित्रोदा, मणिशंकर अय्यर, अरूण नेहरू, अरूण सिंग यांच्यासारख्यांचा समावेश होता. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर पायाभूत सुविधांच्या विकासावर त्यांनी भर दिला. लायसन्स राज संपुष्टात आणले. आर्थिक पुनर्रचना करण्यावर त्यांचा भर होता. राजकीय आयुष्य स्वीकारलेले राजीव गांधी व राजकीय आयुष्य स्वीकारण्यापूर्वी स्वत:चे वेगळे जग असणारे राजीव गांधी यांच्यात बराच फरक होता. नवनवीन कपड्यांची आवड असणारे - जीन्सची पँट, लेदर जॅकेट घालून वावरणारे राजीवजी परिस्थिती बदलताच आपल्या आवडत्या वस्तूंचा त्याग करून नवीन पद्धतीत रुळताना आपण पाहिले. धोतर -कुर्ता तोंडात पानाचा तोबरा भरलेले, गांधी टोपी डोक्यावर चढविलेले लोक म्हणजे राजकीय नेता, अशी ओळख तेव्हा राजकारण्यांची होती, ते प्रचलित चित्र राजीवजींनी बदलून टाकले. बंद गळ्याचे रुबाबदार कोट, थंडीत अंगावर काश्मिरी शाल, खाडीच्या कपड्यांवर स्पोर्ट्स शूज घालणे असे वेगळे; परंतु तरुणांना आवडणारे प्रयोग त्यांनी केले. राजकीय नेत्यांचे राहणीमान रुबाबदार केले.
राजकारणात राहूनही त्यांना कुठलाही मोह - आसक्ती नव्हती. परदेशात शिक्षण घेतल्याने व तेथील प्रगती - तंत्रज्ञान जवळून पहिल्याने तेथील चांगल्या गोष्टी भारतात आणण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. मोबाइल फोन, इंटरनेट, संगणक क्रांती, शिक्षणाचा प्रसार, १८ वर्षे वयाच्या तरुणांना मतदानाचा अधिकार, पंचायत राज योजना आणून त्यांनी जी दूरदृष्टी दाखविली, तिची फळे आज आपल्याला उपभोगायला मिळत आहेत. राजीव गांधींवर वारंवार टीकेचे आसूड ओढणारे विरोधी पक्षाचे नेते आज मोबाइल फोन, इंटरनेट, संगणकाशिवाय राहू शकतील काय? हा काळाने विरोधकांवर उगवलेला सूड आहे .
चंद्रशेखर आणि व्ही. पी. सिंह यांचे शक्तिहीन सरकार कोसळल्यानंतर १९९१ साली मध्यावधी निवडणुका जाहीर झाल्या. १९८९च्या पराभवामुळे २0 महिने विरोधी बाकावर बसून राजकारण करावे लागल्याने राजीवजींना खरे कार्यकर्ते व हुजरेगिरी करणारे यांच्यातला भेदही लक्षात आला. त्यांनी नव्या जोमाने कंबर कसून काँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात केली. जास्तीत जास्त माणसांनी आपल्याला पाहावे किंबहुना ऐकावे यासाठी ते पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरू लागले. श्रीलंकेत शांतिसेना पाठविल्याचा त्यांचा निर्णय बंडखोर तमिळी वाघांना पटला नव्हता. राजीवजींच्या हत्येसाठी ते इरेला पेटले होते. २१ मे १९९१ रोजी त्यांना तशी संधी मिळली. श्रीलंकेतील तमिळ वाघांचे सर्मथक तमिळनाडूत कार्यरत आहेत. तेथे तुम्ही लोकांमध्ये जास्त मिसळू नका, हा गुप्तचरांचा सल्ला राजीवजींनी मानला नाही. तमिळनाडूतील श्रीपेरंबुदूरला रात्री उशिरा सभेसाठी ते उपस्थित राहिले. तमिळी आत्मघाती पथकातील
धानू नावाची महिला हातात चंदनाच्या फुलांचा
हार घेऊन उभी होती. तिच्या कमरेला बांधलेल्या पट्टय़ात आरडीएक्सने बनविलेला बॉम्ब होता. राजीवजी जवळ येताच त्यांच्या पाया पडत असल्याचे नाटक करत -वाकत तिने कमरेला लावलेल्या बॉम्बचे बटन दाबले. एका क्षणात देशाला दु:खाच्या महासागरात लोटले.
संजय गांधींच्या विमान अपघातानंतर चार वर्षांत इंदिरा गांधींची भीषण हत्या व इंदिराजींनंतर सात वर्षांत राजीवजींची अमानुष हत्या त्यांच्या कुटुंबाने भोगली व जगाने पहिली. देशासाठी काहीतरी करायचे असताना असा मृत्यू येणे व ज्यात डॉक्टरांनादेखील करायला काहीच नसणे यासारखे दुर्दैव नाही.
भूकंपात -पुरात किंवा एखाद्या अपघातात आपले नातेवाईक गमावलेले लोक वषार्नुवर्षे या घटना विसरू शकत नाहीत. तर ज्यांच्या घरात एका पाठोपाठ एक असे अकाली गेले असतील त्यांच्या मनाची कल्पना करणे ही अशक्य आहे. आजची तरूण पिढी- राजीवजींचा मृत्यू झाला तेव्हा पाळण्यात
असेल कदाचित रांगत असेल. राजीवजींचा सुसंस्कृतपणा, शालीनता, विनम्रपणा, तरूणांविषयीची दूरदृष्टी, विकासाचा ध्यास लोकांना माहीत व्हावा व राजकारण म्हणजे घाण हा विचार नष्ट व्हावा म्हणून हा प्रपंच! हीच खरी त्या नेत्याला मनापासून वाहिलेली श्रद्धांजली!
-धनंजय जुन्नरकर
(लेखक हे सामाजिक कार्यकर्ते आहेत.)