Submitted by प्राजु on 14 January, 2013 - 02:58
तुझ्या मागुती धावत येते दिशातुनी या दाही
अनाहूत मी वाहत जाते काळाच्याच प्रवाही
सोडुन माझ्या सावलीस मी तुझी सावली होते
तुझ्याचसाठी जगते, झिजते नकोस मागू ग्वाही
हरेक वळणावरती उरल्या सयी तुझ्या ठसठसती
कधी नशील्या वरुणीसम फ़ेसाळून फ़सफ़सती
कधी दिलासा देती अन कधी नयनी गर्दी होते
मनातल्याही मनात त्या मग करती दाटुन वस्ती..
आकाशाची किनार जेव्हा तांबुस होऊन जाते
ओघळणार्या काळोखाची दाट सायही जमते
सायीखाली मनास येते उकळी गतकाळाची
उतू जाते, सांडून जाते, चरचर करपून जाते
कसा राहसी माझ्याविण तू सांग मनापासुनी
कि तू पुसल्या खुणाच माझ्या काळावर घासुनी??
हजार मरणे मंजूर मजला तुझ्या सोबती साठी
नुसते जगणे उभे ठाकते गिळण्या आ वासुनी.
-प्राजु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा वा प्राजु आर्तता उतरलीय ग
वा वा प्राजु आर्तता उतरलीय ग पुरेपुर!
कि तू पुसल्या खुणाच माझ्या
कि तू पुसल्या खुणाच माझ्या काळावर घासुनी?? आहाहा..
मस्तच!
कधी नशील्या वरुणीसम फ़ेसाळून फ़सफ़सती.. लयीत वाचता आले नाही
कविता हा फॉर्म आपण जास्त
कविता हा फॉर्म आपण जास्त प्रभावीपणे हाताळता.
अत्यंत अत्यंत उत्कट भावप्रवाह
अत्यंत अत्यंत उत्कट भावप्रवाह उतरलाय कवितेत.
मनाच्या आरपार गेली तुझी ही
मनाच्या आरपार गेली तुझी ही कविता.. माझ्या निवडक १०त!
खूप छान
खूप छान
मनापासून आभार मंडळी.
मनापासून आभार मंडळी.
वाह !! शेवटचे कडवे खूप
वाह !!
शेवटचे कडवे खूप स्पर्शून गेले..!
आकाशाची किनार जेव्हा तांबुस होऊन जाते
ओघळणार्या काळोखाची दाट सायही जमते
की तू पुसल्या खुणाच माझ्या काळावर घासुनी??
हजार मरणे मंजूर मजला तुझ्या सोबती साठी
नुसते जगणे उभे ठाकते गिळण्या आ वासुनी.
व्वाह !
-----------------------------------------
१. मागुती की मागुनी ?
२. वरुणी की वारुणी ?
'वारुणी' असल्यास,
कधी नशील्या वरुणीसम फ़ेसाळून फ़सफ़सती
ही ओळ -
'कधी नशील्या वारुणीसम फेसाळुन फसफसती'
अशी करता येऊ शकेल.
३.तसेच,
कधी दिलासा देती अन कधी नयनी गर्दी होते
इथे दुसरा 'कधी', 'कधि' असा करायला हवा.
४. उतू जाते, सांडून जाते, चरचर करपून जाते - ही ओळ लयीत हलतेय... काही तरी करायला हवे. 'उतूस', 'सांडुन' आणि 'करपुन' असे केल्यास ?
मनापासून आभार मंडळी. रसप,
मनापासून आभार मंडळी.
रसप, सुचवण्या चांगल्या आहेत. धन्यवाद.
हजार मरणे मंजूर मजला तुझ्या
हजार मरणे मंजूर मजला तुझ्या सोबती साठी
नुसते जगणे उभे ठाकते गिळण्या आ वासुनी..... व्वा
फारच छान कविता
धन्यवाद वैशाली.
धन्यवाद वैशाली.
खुपच छान.
खुपच छान.
जबरी, जबरी.... काय क्लास
जबरी, जबरी....
काय क्लास कविता आहे..... जियो, जियो..
वाह!
वाह!
सुरेख! आवडली कविता
सुरेख! आवडली कविता
धन्यवाद मंडळी.
धन्यवाद मंडळी.
__/\__
__/\__
>> आकाशाची किनार जेव्हा
>> आकाशाची किनार जेव्हा तांबुस होऊन जाते
ओघळणार्या काळोखाची दाट सायही जमते
सायीखाली मनास येते उकळी गतकाळाची
उतू जाते, सांडून जाते, चरचर करपून जाते
खूप डीप आहे. सहीच.
व्वा !! ..... भावना छान
व्वा !! ..... भावना छान व्यक्त झाल्यात.
फक्त, एका ओळीतील 'वरुणी' हा शब्द 'वारुणी' असायला हवा का ?
सुरेख..... !!!
सुरेख..... !!!
सुंदर
सुंदर
आकाशाची किनार जेव्हा तांबुस
आकाशाची किनार जेव्हा तांबुस होऊन जाते
ओघळणार्या काळोखाची दाट सायही जमते
सायीखाली मनास येते उकळी गतकाळाची
उतू जाते, सांडून जाते, चरचर करपून जाते
कसा राहसी माझ्याविण तू सांग मनापासुनी
कि तू पुसल्या खुणाच माझ्या काळावर घासुनी??
हजार मरणे मंजूर मजला तुझ्या सोबती साठी
नुसते जगणे उभे ठाकते गिळण्या आ वासुनी.<<<
उच्च