आज आहे नेमका शुध्दीत मी---( तरही )

Submitted by निशिकांत on 13 January, 2013 - 23:39

दु:ख विसरायास असतो पीत मी
आज आहे नेमका शुध्दीत मी

व्यर्थ आलो उच्चभ्रू वस्तीत मी
वाढलो चाळीमधे मस्तीत मी

तू जशा लिहिल्यास गजला त्या क्षणी
कैद झालो वाळल्या शाईत मी

दे सखे मिसरा तुझ्या गजलेतला
एकटेपण घालविन तरहीत मी

हात तू हातात देवुन बघ जरा
साथ देणे जाणतो यारीत मी

काय पाहुन पावला ईश्वर मला
काढले होते मला मोडीत मी

दु:ख हसण्याआड लपवावे, जुनी
यत्न करुनी पाळतो ही रीत मी

का भुतावळ घालते घिरट्या अशी?
घातले त्यांना कधी ना शीत मी

शल्य "निशिकांता"स भौतिक या जगी
चाललो नाही कधी वारीत मी

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

व्यर्थ आलो उच्चभ्रू वस्तीत मी
वाढलो चाळीमधे मस्तीत मी

तू जशा लिहिल्यास गजला त्या क्षणी
कैद झालो वाळल्या शाईत मी

दे सखे मिसरा तुझ्या गजलेतला
एकटेपण घालविन तरहीत मी

हात तू हातात देवुन बघ जरा
साथ देणे जाणतो यारीत मी

काय पाहुन पावला ईश्वर मला
काढले होते मला मोडीत मी

दु:ख हसण्याआड लपवावे, जुनी
यत्न करुनी पाळतो ही रीत मी

का भुतावळ घालते घिरट्या अशी?
घातले त्यांना कधी ना शीत मी

शल्य "निशिकांता"स भौतिक या जगी
चाललो नाही कधी वारीत मी

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

दे सखे मिसरा तुझ्या गजलेतला
एकटेपण घालविन तरहीत मी

काय पाहुन पावला ईश्वर मला
काढले होते मला मोडीत मी

व्वा व्वा!

उच्चभ्रूमधे वृत्त बिघडलेय. उच्चार करताना 'च्च' हा गुरू होत असावा कारण भ्रू मधल्या भ चा जोर च्च वर येत आहे.

काढले होते मला मोडीत मी >>> मस्त मिसरा आहे

दे सखे मिसरा तुझ्या गजलेतला
एकटेपण घालविन तरहीत मी >>> छान शेर

निशिकांतजी!
अप्रतिम तरही लिहिली आहे तुम्ही!
अभिनंदन व आपणास आमचे लवून वंदन!

आपली तरही वारंवार वाचली तन्मय होवून, जेव्हा आम्हास खालील शेर सुचले. पहाल का, कसे वाटतात ते शेर.......
हे शेर आपलेच आहेत निशिकांतजी......

पाचवीला दु:ख, असतो पीत मी!
आज आहे नेमका शुद्धीत मी!!

काय जादू लेखणीमध्ये तुझ्या?
कैद का होतो तिच्या शाईत मी?

दे तुझा मिसरा, नको काही मला....
जिंदगी सजवेन ही तरहीत मी!

एकदा देवून बघ मज हात तू.....
ना पडायाचो कमी यारीत मी!

वाट चुकली का कृपादृष्टी तुझी?
काढले जेव्हा मला मोडीत मी!

दु:ख स्मितहास्यामधे दडवायची....
पाळतो आहे जिण्याची रीत मी!

कोठुनी येते भुतावळ भोवती?
घालतो त्यांना कधी ना शीत मी!

पंढरी, निशिकांत! ह्या हृदयामधे!
चाललो नाही कधी वारीत मी!!

धन्यवाद निशिकांतजी!
आपल्या गझललेखनास आमच्या हार्दिक शुभेच्छा!
आपली मते जरूर कळवावीत, वाचायला आवडेल!
.........प्रा.सतीश देवपूरकर

पाचवीला दु: असतो पीत मी >>>>>
लहान मुले दूध पीतात हे माहीत होते.... दु:ख???
असो पाचवीला "पूज"ले असते तर जास्त सुसह्य झाला असता पर्यायी शेर

दु;ख "तिन्हिसांजेस" माझे पीत मी असा काहीसा मिसरा असता तर उत्तम झाला पर्यायी शेर असे मानले असते आम्ही

असो बकी शाई व शीत बरे आहेत पर्यायी म्हणून !!

( पण नेमकी काय गरज असते पर्यायी शेरांची हे समजलेच नाही )

_________________________________________________

असो
मूळ गझल छानच केलीत निशिकांतजी वारी हा शेर सर्वाधिक आवडला हाच /असाच खयाल आपण मागेही एकदा एका शेरामधे माण्ड्ला असल्याचे स्मरते

________________________________________________

पर्यायी शेरांकडे जमेल तेवढे दुर्लक्ष करावे ही सर्वाना विनंती

एक नावाचा कुणीतरी,
प्रतिसाद निशिकांतासाठी होता! असो.
पाचवीला दु:ख......नंतर स्वल्पविराम आहे जो आपण पाहिलेला दिसत नाही त्यामुळे भलताच अर्थ शेराचा घेत आहात असे वाटले! असो.

पण नेमकी काय गरज असते पर्यायी शेरांची हे समजत नाही <<<<<
हे आपल्यासाठी नव्हतेच!

पर्यायी शेरांकडे जमेल तेवढे दुर्लक्ष करावे ही सर्वाना विनंती<<<<<
असे म्हणताना आपण मात्र लक्षपूर्वक वाचता की, पर्यायी शेर!

प्रोफेसर,

लोकांना काहीही म्हणू दे ना, दुसर्‍यांच्या धाग्यावर कशाला भांडताय. उगाच गोंधळ वाढतो त्याने.

पाचवीला दु:ख......नंतर स्वल्पविराम आहे>>>>>>>

~क्षमस्व !शुद्धीत नसले की असे होते Wink

असे म्हणताना आपण मात्र लक्षपूर्वक वाचता की, पर्यायी शेर!>>>>>

~छे हो छे ; कुठचं काय !! तुमचे शेर कुणी धड लक्षपूर्वक वाचत नाही पर्यायी कोण वाचतय !!
(नीट वाचले असते तर तो स्वल्पवीराम दिसला नसता का मला !!;))

प्रसादपंत!
नाही रे बाबा , तुझ्यासाठी नाही!

तुझ्या मनातील खेळ सारे.......
तसे कुणाच्या मनात नाही!

प्रा.सतीश देवपूरकर