खोटा वाटता है तो एक जात का..!!

Submitted by तनवीर सिद्दीकी on 8 January, 2013 - 04:13

रोजच
रोजच्यासारखच
आज सकाळी पण 'फ़जर' पढून निघालो
'जात' चाचपत ट्रेन धरली
(आतमध्ये 'सेमीडबे' असतात)
'स्टेशन'चे- 'कंपनी'चे- 'भाषे'चे- 'राज्या'चे
'राज्या'त घुसलो
रोजच्यासारखच..!!

काय दोनतीन स्टेशनचा प्रवास!!!
आज चघळायला 'बलात्कार' होता
क्षणार्धात 'स्त्री' झालो
पाचसात 'पुरुषां' पासून
स्वत:ची वैचारिक अब्रू वाचवेपर्यंत स्टेशन आले

टेम्पररी जात ट्रान्स्फर सेरेमनी आटपून
कसाबसा ऑफिसला पोहोचलो
इनजनरली तसा मी 'ओपन'
ऑफिसमध्ये घुसताच
'ओपन' माणूस ओपन माइंडने फिरून देखील
गेल्या आठवड्याच्या प्रमोशनच्या वेळेची वेळ आठवली की
'रिझर्व' ठेवलेली 'जनरल' फिलिंग येतेच
तशी आली

काम चारले
डबा चारला
'चार'ला परत स्टेशनकडे
लगबग असताना
कोपऱ्यावरच्या 'माल' पोरी 'पुरुष' म्हणून पाहिल्या
आणि
चार-चाळीसच्या 'राज्यात' घुसलो..!!
___________________

रात्रीच्याला इंडिया-पाकिस्तान आहे
तेव्हा थोड्या वेळासाठी 'इंडिया' बनून
'ईशा' वाचली की

दिवस संपणार आजचा..!!

(खोटा वाटता है तो एक जात का..!!)

तनवीर सिद्दिकी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम !!
छान लिहिता तुम्ही मायबोलीवर फारसे दिसला नाहीत मागे एकदा तुमची कविता वाचल्याचे स्मरते तीही आवडली होती

मुक्तछंद स्वतःच्या वेगळ्या अन् शैलीदार पद्धतीने हाताळता तुम्ही

आपले लेखन इथे मायबोलीवर अधिकाधिक प्रकशित करून आम्हाला असाच आनंद द्यावा ही विनंती
पुलेशु !!

आपला
-वैवकु

आभार. Happy